| अध्याय क्र. 33
|
 |
ब्रह्मरेख दैन्य जीवनी । गुरुकृपा त्यांचे घरी ॥ पुसती ब्रह्मरेख ही । समृध्दी आली घरी ॥ |
श्री गणेशाय नम : । श्री गुरुभ्यो नम :। श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम:। श्री सरस्वत्यै नम :॥ मानवा हवे काय जीवनी । दारिद्रय नको जीवनी ॥ मृत्यूची भीती सतत मनी । उपासना दोन्ही टाळण्यासी ॥1॥ पोथी पुराणी फलश्रुती । उदाहरणे आधारे मिळती ॥ ते पुरावे श्रेष्ठ मानूनी । उपासना करितो तो जगी ॥2॥ परि कां न ये अनुभूती । उपासना पडते कमी ॥ किंवा उदाहरणे आहेत खोटी । प्रश्न येतो हा मनी ॥3॥ बाह्यांगी उपासना तगडी । व्रत त्याचे नियमीत जरी ॥ मन विरल नसते परी । अनुभूती न येई खरी ॥4॥ बाह्यांगी ज्ञानीयाचे ज्ञानानी । कर्मीयाचे कर्मानी ॥ समाधान होत नाही । विकल्प कारण त्यासी ॥5॥ गुरुमूर्ती देईल अपार । असे अभिवचन ग्रंथात ॥ संशय रहित निर्धार । पाहिजे निष्ठा भाव मानसी ॥6॥ गुरु सांगती प्रवचनी । वरील तत्त्व शिष्यासी ॥ मग सांगती सर्वांसी । आवाक्यात नाही दोन गोष्टी ॥7॥ दारिद्रय मृत्यू दोन्ही । मानवी शक्तीच्या न हाती ॥ म्हणूनी उपासनेचा उपयोग नाही । हा निर्णय नसे बरोबरी ॥8॥ अन्नाचे होते रक्त शरिरी । ह्याचे ज्ञान नसे प्रत्येकासी ॥ तरी खाल्लेल्या अन्नातूनी । रक्त बनते सहज॥9॥ बुध्दीचे आवाक्यात नसूनी । प्रक्रीया घडते शरीरी ॥ तैसे विकल्परहित उपासनेनी । विरलता येते मनी ॥10॥ विरल मन कार्य करी । प्रबल शक्ती साहाय्य करी ॥ गुरु शक्ती दूर करी । अकाल मृत्यू दारिद्रयासी ॥11॥ सिध्दस्थान दत्तवाडी । निर्माण केले गुरुनी ॥ अंतर्मनाने शिष्यासी । होते पूर्ण फल प्राप्ती ॥12॥ तंतुक गुरुचरित्री । सेवा करी श्रध्देनी ॥ प्रांगण नित्य झाडी । लीन सदा गुरुचरणी ॥13॥ वृत्ती त्याची कशी । गुरुशी सर्वस्व मानी ॥ सर्व आप्त शिवरात्रीसी । दर्शना गेले शैल्य पर्वती ॥ 14॥ माझे शिव गुरुचि । भाव ज्वलंत मनी ॥ दर्शना नेले त्यास गुरुनी । गुरु दिसती पिंडीवरी ॥15॥ सेवा करिता मनी । भाव असेल तसा ॥ तरीच येईल प्रत्ययी । श्रध्दा निष्ठा कार्य निर्धारी ॥16॥ गुरु सिध्द पुरुष । सिध्द स्थान हे निश्चित ॥ अनुभव प्रत्येक शिष्यास । श्रध्दा निष्ठा योग्यता जशी ॥17॥ बीडकरा गुरु शब्द कानी । 'आले काय' म्हणूनी ॥ गुरु नसता दत्तवाडीसी । गुरु शब्द ऐकले त्या स्थानी ॥18॥ एकशे आठ गुरुचरित्र । अखंड पारायण करण्यास ॥ मिळाली प्रेरणा दत्तवाडीत । पूर्ण झाले बीडकरा अनुभूती ॥19॥ उपासनेची इच्छा मनी । मार्गदर्शन क्षणोक्षणी ॥ दु:ख दैन्य हरती । हा अनुभव ज्याचा त्यासी ॥20॥ मनोहर देव शिष्याची । श्रध्दा निष्ठा ज्याचे मनी ॥ पूजा त्रिकाल मठासी । दत्तवाडीसी निर्धारे ॥21॥ पहिली प्रचिती त्यासी । विवाह झाला थाटानी ॥ दारिद्रय अति घरी । परी घडले वेगळे ॥22॥ पक्के घर शिष्यासी । किुंमत ठरवा तुम्ही ॥ दहा एकर झाली शेती । श्रीमंत तो त्यातही ॥23॥ सोने, घर, शेती भाग्यी । स्टील ताट वाटया घरी ॥ सिध्दस्थान दत्तवाडी । मनोहर देवाचे दारिद्रय हारी ॥24॥ आवाक्यात जे नाही । ते देण्या समर्थ गुरुचि ॥ ब्रह्मरेखा पुसण्याची । शक्ती असे गुरुपाशी ॥25॥ ब्रह्मरेखा गरिबीची । पुसली कशी गुरूंनी । दुसरी कथा सांगण्यासी । इच्छा होतसे मानसी ॥26॥ अंबाजोगाईचे पुजारी । पाठक असे आडनावी ॥ काशीनाथ देवीदास नामी । येती दत्तवाडी दर्शनासी ॥27॥ गुरूंची अंबाजोगाई वारी । हा क्रम त्यांचे जीवनी ॥ उतरती पाठका घरी । अनुभव त्यांचेच शब्दी ॥28॥ पद्यरूप इच्छा अदृश्यी । माझे न त्यात काही ॥ अतिशयोक्ती नसे काही । वास्तविकता ती सर्व ॥29॥ सांगती पाठक अनुभवासी । गुरू आले प्रथम घरी ॥ त्या दिवशीची स्थिती । वर्णन ते करिती ॥30॥ ज्वारी नव्हती घरी। इतर धान्याची तीच गती । भाडयाचे घरी वस्ती । सर्व शेती कुळामध्यी ॥31॥ लोखंडकार गुरू सोबती । आले होते पहिले वेळी ॥ ज्वारी आणावी बाजारातूनी । वरण भाकरी करावी ॥32॥ भोजन द्यावे गुरुसी । गोड केली भाकरी ॥ प्रेमे गुरुची तृप्ती । तेणे बदलली आज स्थिती ॥33॥ गुरु पाय लागता घरी। दर्शन घडले गुरुचे घरी ॥ भोजन करिता घरी । महाप्रसाद गुरूकृपा सर्व क्षेत्री ॥34॥ अपयश गेले दूरी । दारिद्रय दैन्य कसे घरी ॥ कमीपणा न कशातही । यश आले सर्व क्षेत्री ॥35॥ वडिलोपार्जित शेती । एकशे चाळीस एकर जरी ॥ हक्क नव्हता त्यावरी। भांडणात संपला पैसा ॥36॥ गुरू पाय लागता घरी । भांडणात यश भाग्यी ॥ शेती मिळाली त्यासी । गुरुकृपा ही सर्वही ॥37॥ संपूनी वडिलोपार्जित कचेरी । निकाल त्यांचे कडुनी । सुंदर घर त्यांचे नावी । भाडयाचे घराची न जरुरी ॥38॥ टुमदार घर होऊनी । पैशाची आज न टंचाई ॥ मान्य मान्यता जनी । सदगुरु कृपा ही खरी ॥39॥ कुळ कायदा असूनी ॥ शेतकऱ्यांसी दिली मती॥ वश झाले पाठकासी। मोबदला दिला त्यांनी ॥40॥
|