| अध्याय क्र. 9
|
 |
भास नसे त्यासी । प्रत्यक्ष गुरु दिसती ॥ अदृश्य रुपे येती । साथ करिती त्यांची ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: । या दृश्य सृष्टीहूनी । अदृश्य सृष्टी असे मोठी ॥ सूचना मिळती कार्यासी । कार्या प्रारंभ करिती ॥1॥ कल्पना नसता आधी । मिळे सूचना एकदमचि ॥ कार्यही होई त्याच क्षणी। विलंब न चाले कांही ॥2॥ उपासना करिता क्षणी । ऐशा सूचना वेळोवेळी ॥ कार्यकारण नसे ठाऊकी । अनुष्ठान कर्तव्या प्रेरिती ॥3॥ योजना पूर्ण अदृश्य सृष्टीची । मार्गदर्शने जो करी भक्ती ॥ प्रगती त्याची निश्चिती । पूर्ण भार त्याचा ईश्वरावरी ॥4॥ ईश्वर त्यासी सांभाळी । ईश्वराला चिंता त्याची ॥ ईश्वर येई धावूनी । योग्यता असे जर भक्ताची ॥5॥ मार्गदर्शन क्षणोक्षणी । घटना घडती त्या संदर्भी ॥ कार्यारंभ भांबेरी क्षेत्री । शिष्य अनेक झाले त्या गावी ॥6॥ शिष्या मार्गदर्शन कार्यी । बेचाळीस मास संपताचि ॥ गाडेगांवची सुरु झाली । अधून मधून गुरु भेटी ॥7॥ एक ऐशा मुक्कामी । गुरुसी आमंत्रण अनेका घरी ॥ गुरु मुक्काम वाढूनी । राहू लागले नारायण मठी ॥8॥ गाडेगांव गावा बाहेरी । एक मठ अति पुरातनी ॥ शिकस्त होता सर्वही । व्यवस्था नव्हती कांही ॥9॥ मठाची जागा जरी जुनी । योजना होती उत्तमचि ॥ नदी किनारा समोरी । वृक्ष छाया जवळी ॥10॥ विहीर मोठी तेथ । धर्माळ भरती रोज ॥ शांत मठ बाहेर । योग्य जागा उपासनेसी ॥11॥ जागा केली साफ ती । गुरु राहू लागले तेथेचि ॥ सुरु झाली दुरुस्ती । गुरु शब्दे सर्व करिती ॥12॥ गुरु रमले गाडेगांवी । भजन चाले त्या जागी ॥ पंढरपूर झाले तेचि । जणू गाडेगांव पंढरी ॥13॥ गुरु शब्द मुखातूनी । बोलले ते होई ॥ शिष्य अति उत्साही । सहकार्य सर्व गांवी॥14॥ उत्साही पाहूनी वृत्ती । आनंद गुरु मनी ॥ वाटे रहावे येथेचि । कार्य क्षेत्र उत्तम ॥15॥ गुरु म्हणती शिष्यासी । भुयार करु या मठी ॥ होकार भक्ता मनी । मुहूर्त ठरविला कार्यासी ॥16॥ नव वर्ष दिनी । कुदळी लागली भुयारासी ॥ गुढी पाडवा मुहूर्ती । कार्यारंभ केला सर्वांनी ॥17॥ अलोट उत्साह मनी । सर्व गांव खोदण्यासी ॥ कोणी भरती माती । कोणी फेकिती बाहेरी ॥18॥ सहकार्य दिले सर्वांनी । कार्य झाले त्याच क्षणी ॥ आनंद उत्साह मनी । पूर्ण केले कार्यासी ॥19॥ खोदणे संपता क्षणी । योजना भुयार बांधण्याची ॥ विटा आणिल्या लवकरी । सुरु केले बांधकामासी॥20॥ चैत्रमास संपण्या आधी । भुयार झाले बांधूनी ॥ उत्सुकता प्रत्येका मनी । कार्य व्हावे लवकरी ॥21॥ मूर्ती स्थापनेसी। जागा एक बांधली ॥ गुरु नित्य अनुष्ठानासी । जागा असे त्या जवळी ॥22॥ दर्शन इच्छूक भक्तासी । श्री दत्तमूर्ती येते दृष्टी ॥ गुरु न दिसती कोणासी । गुरुसी दिसे मूर्ती ॥23॥ ही व्यवस्था त्या भुयारी । गुरु अनुष्ठान स्थळी ॥ धुनी होती पहिलेची । अवशेष प्रमाण त्यासी ॥24॥ गुरु आरंभ करिती । अनुष्ठान त्या स्थळी ॥ स्थळ तेचि आले प्रत्ययी । होता एक कोणी तपस्वी ॥25॥ सत्पुरुष कधी कोणी । होऊन गेला नारायण मठी ॥ धुनी होती त्याची । अनुष्ठान आसन तेचि ॥26॥ स्वप्नी तपस्वी विचारे गुरुसी । हिंदी भाषा होती त्याची ॥ '' कैसे बैठते हो । तुम इस स्थानपर ॥27॥ यह आसनपर । बैठनेका क्या अधिकार'' ॥ न घेता अनुमती । गुरु बैसले त्या आसनी ॥28॥ अपमान वाटला त्यासी । त्रास झाला गुरुसी ॥ अनुष्ठान केले गुरुंनी । वश केले त्या साधूसी ॥29॥ सांगती गुरु त्यासी । कार्य असे आपलेचि ॥ आसन असे आपलेचि । यात विरुध्द नाही कांही ॥30॥ अदृश्य सृष्टीतूनी । घेतल्या गुरुंनी लहरी ॥ बोलले तेच त्यासी । जे असे तपस्वी मनी ॥31॥ सहकार्य घेतले त्यांचेही । सुलभता झाली कार्यी ॥ विरोध सर्व संपवूनी । आपुलकी केली निर्मिती ॥32॥ गुरु झोपती मठात। निर्भय होते मनात ॥ झोपती तेथे येऊन । अदृश्य आत्मे कांही ॥33॥ आनंद त्यांचे मनी । जीर्णोध्दार झाला म्हणूनी ॥ ऐसे एक दिनी । झोपला एक गुरुजवळ ॥34॥ घोंगडी होती जवळी । उंच असे काळे वर्णी ॥ चौकशी करितां त्यांची । गुरुची झाली खात्री ॥35॥ आपलेसे करुनी सर्वांसी । सर्वांचे घेतले सहकार्यासी ॥ अदृश्य तपस्वी शक्ती । ते सहकार्य गुरुसी ॥36॥ चार भिंतीतट दुरुस्ती । सर्व मंदिरी डागडुजी॥ चमत्कार हा गाडेगांवी । मठ झाले पंढरी ॥37॥ मूर्ती नव्हत्या भुयारी । फोटो ठेविला त्या स्थळी ॥ श्री दत्तात्रेयाची मूर्ती । स्थापावी दत्तजयंतीसी॥38॥ प्रेरणा मिळाली सर्वांसी । मूर्ती करावयासी ॥ जयपूरा पाठविले एकासी । ओम मूर्ती श्री दत्ताची ॥39॥ मूर्ती होईल दत्ताची । मार्गशीर्षा आधी ॥ योजना झाली सर्वही । मूर्ती आणण्या पाठविती ॥40॥ तयारी झाली पूर्ण ती । सिध्दता मूर्ती स्थापण्यासी ॥ गुरु पाठविती शिष्यासी । पोहचले ते जयपूरासी ॥41॥ भेटले मूर्तिकारासी । मूर्ती नव्हती तयार त्याची ॥ तार दिला गाडेगांवासी । मूर्ती नाही तयार म्हणूनी ॥42॥
|