Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 46
पुन्हा दिसे नरसिंह सरस्वती । क्षणात विष्णुदास दिसती ॥ असे घडले सततचि । गणती नसे त्या अनुभूतीची ॥


श्री गणेशाय नम: । श्री. गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ गुरुराया लेखणी माझ्या हाती। तरी लेखक नाही मी ॥ प्रेरणा सर्वस्व तुझी । स्फूर्तिदाता तूचि ॥1॥ पूजा पवमान करिता । उदकशांतीचे वेळाा । प्रेरणा ही आज मला । सुरवात करा या अध्यायी ॥2॥ समाधी अध्याया प्रेरणा ही । प्रत्यक्ष येऊनी दिली ॥ तशीच ही अनुभूती । तुझे तुला ठाऊकी ॥3॥ तुझी अगाध शक्ती । चैतन्य उरले जगी ॥ अचैतन्य नाही कांही । चैतन्याचे डोही चैतन्य तरंग ॥4॥ भक्ताची श्रध्दा निष्ठा । कळे त्या चैतन्य तरंगा ॥ तेथे गुरु आस्तिंत्व मना । प्रेरणा कळे त्या भक्ता ॥5॥ महादेव नळकांडे गाडेगांवात । श्रध्दावान आदर्श शिष्य ॥ स्वयं प्रेरणे गुरु मंत्र । भाग्यवान असा शिष्य ॥6॥ ज्यांना असे अनुभूती पूर्वीच। वडिलांना आयुष्यदान ॥ गुरुंनी दिले बावीस दिन । त्यांचे पत्नीचे चिंतनी गुरु ॥7॥ पत्नी सौ. सत्यभामा। नित्य करिते दत्त सेवा ॥ दत्तवाडीत उद्योग करिता । आनंद उत्साह त्यांना ॥8॥ आळसा नसे थारा । उस्फूर्त तो गुरु जिव्हाळा ॥ खंड नसे नित्यक्रमा । त्या भक्ता मनी प्रेरणा ॥9॥ प्रेरणे त्यांना मार्गदर्शन । करा तुम्ही उदकशांत ॥ डॉक्टर देशपांडे गृहात । जेथे गेला माझा पंचप्राण॥10॥ डॉक्टर व मनोहर देव । दोघेही म्हणती महादेवास ॥ आम्ही करितो उदकशांत । तुम्ही नका करु कांही ॥11॥ श्रध्दा पूर्ण महादेवाची । प्रेरणे गुरु शब्दी ॥ ते सांगती दोघासी । मीच करेन सर्व ॥12॥ डॉक्टर देशपांडे गृहात । मनोहर जरी मानस पुत्र ॥ महादेव हातात कंकण । त्यांनीच केले उदकशांत ॥13॥ ब्राह्मण चार मंत्रास । फलाहार त्या सर्वास ॥ ब्राह्मण भोजन नंतर । यथासांग उदक शांत ॥14॥ भाग्य त्यांचे थोर । गुरु प्रीत्यर्थ उदक शांत ॥ श्रध्दा निष्ठा दोघांत । आरती कवित्व हे एक फल ॥15॥ अपेक्षा रहित कर्म । अध्यात्मात त्यालाच फल॥ अपेक्षा जर मनात । त्याचीच होते पूर्ती फक्त ॥16॥ मजसी कां नाही प्रेरणा । त्याचे दिले गुरुने उत्तरा ॥ करा सत्यभामा सारखे मना । होईल तुम्हा मार्गदर्शन ॥17॥ गुरुचे ते अचूक निदान । आम्हा कसे कळेल ॥ गुरुंना हे सर्व ज्ञान । देती ते ज्याचे त्यास ॥18॥ श्रध्दा निष्ठा न बाजारात । ती पाहिजे पूर्ण मनात । त्यानेच घडे पुण्य । गुरु इच्छा त्यात प्रमाण ॥19॥ सेवा घडो माझेकडून । अशीच द्या बुध्दी शिष्यास॥ अनुभूतीयुक्त मन । होऊ दे शिष्याचे तयार ॥20॥ गुरु सर्वव्यापी शक्ती । अनुभूती आज कित्येकासी ॥ भक्ता मार्गदर्शन स्वप्नी । ही प्रत्यक्ष अनुभूती ॥21॥ शिष्य सुभाष देशपांडेसी । चिंतेने व्यापले अहर्निशी ॥ पुत्र व्रतबंध सोहळी । स्वप्नी जाऊनी त्यांसी सांगती ॥22॥ मी आहे बरोबरी । सोहळा होईल उत्तमचि ॥ चिंता, भय संपूनी । कार्य झाले निर्विघ्न ॥23॥ शिष्य यशवंत देशपांडेचा पुत्र । आजारी पडे वारंवार॥ सांगती सौ. अंजली मातेस । गुरु स्वप्नी जाऊनी ॥24॥ श्री गुरुचरित्र अध्याय । पठण कर चौदाव्यास ॥ अष्टोत्तर शत संख्येस। सांगती स्वप्नी येऊन ॥25॥ पठण करिता चौदाव्यासी । आजार गेला निघूनी ॥ ही असे अनुभूती । सर्व शिष्या गुरु सन्निधी ॥26॥ गुरु स्वप्नी सांगती मजसी । स्तोत्र संमती घ्या देवाची ॥ संमती मनोहर देवाची । स्तोत्र प्रती काढिल्या ॥27॥ दत्तवाडीत अर्पण गुरुचरणी । केल्या पहिल्या पुण्यतिथीसी ॥ कारंजास जाता दर्शनासी । श्री. अभिषेक केला मंदिरी ॥28॥ रुद्र एकादशनी करुनी । ठेविले स्तोत्र गुरुचरणी ॥ श्री. नरएिसह सरस्वती मूर्ती । दिसली तेज:पुंज अति ॥29॥ लांब चेहरा नाक सरळ । डोळी अत्यंत तेज ॥ आश्चर्य घडले क्षणात । डोळे माझे उघडे जरी ॥30॥ विष्णुदास गुरु डोळयासमोरी । मिशा पांढऱ्या होऊनी ॥ लांबोळा चेहरा झाला चौकोनी । नाक डोळे बदल चेहरी ॥31॥ पुन: दिसे नरसिंह सरस्वती । क्षणात विष्णुदास दिसती ॥ असे घडले सततचि । गणती नसे त्या अनुभूतीची ॥32॥ बाहेर जाऊन येताच । मूर्ती दिसली विष्णुदासाचीच ॥ स्तोत्र अर्पण करिता प्रत्यय । आम्ही आहो एकचि ॥33॥ ही अनुभूती स्तोत्र अर्पणी । पावती ती स्तोत्राची दिली॥ किमया ही अदृश्य सृष्टीची । चमत्कार देखिला डोळे भरुनी ॥34॥ ही अनुभूती येता समोरी । माझे मलाच कळे ना कांही ॥ क्षणाक्षणा अनुभूती। प्रत्येक चमत्काराची अनुभूती ॥35॥ '' अनुभवावीण लेखणी । चालवू नका मास्तर तुम्ही'' ॥ घटना अनुभूती प्रत्यक्षी । तत्त्वाची ही अनुभूती॥36॥ गुरुराया शब्द दिला तुम्ही । पाळला पूर्णपणे तुम्ही ॥ अश्रू येती नयनी । घडले कसे हे जीवनी ॥37॥ मोडके तोडके म्हणो कोणी । बोबडे बोल गोड करिसी ॥ संचित नसता कांही । क्रियमाण केले तुम्ही ॥38॥ मूर्ख म्हणा जगी तुम्ही । आहे गुरुकृपा ही खरी ॥ मी ना विद्वान ना कवी । उपासक तुमचा मी ॥39॥ माझे भाग्य थोर । केले कवी मज ॥ गुरु प्रेरणे कवित्व। हा जीवनात अनुभव ॥40॥ मजसी गुरुंचा शब्द । अनुभवावीण नको लिखाण ॥ अनुभूतीरहित ज्ञान । तोच असे बुध्दिभार ॥41॥ अनुभूतीयुक्त बुध्दी होत । ते ओतप्रोत ज्ञान ॥ गुरुंचे अगाध ज्ञान । शिष्या आजही अनुभव ॥42॥

 

Sadguru Vishnudas Maharaj