Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 24
उपासना फल त्यासी । गुरुकृपा त्यावेळी ॥ लग्न ठरविले गुरुंनी । ठाऊक नसे कोणासी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ शिष्य निर्माण करण्याची । गुरूजवळी असे शक्ती ॥ सर्वस्व अर्पण शिष्यासी । त्यातून शिष्य निर्मिती ॥1॥ उपासना करा कितीही । वाया न जाई कधी ॥ उपयोग त्याचा कधी तरी । होईल हे निश्चिती ॥2॥ योजना अदृश्य सृष्टीची । योग्य काळी फल त्यासी ॥ या जन्मी फल काही । पुढील जन्मी फल निश्चिती ॥3॥ जीवन बदले योग्य वेळी । मार्गदर्शनासी गुरुशक्ती ॥ कोणते संचित फळासी । न कळे मनुष्यास ॥4॥ पूर्व जन्म सुकृती । योग्य फळ पाहूनी॥ भेटले नारद वाल्यासी । वाल्याचा झाला वाल्मीकी ॥5॥ प्रत्येकाच्या जीवनी । संचित फल संधी ॥ मार्गदर्शन योग्य वेळी । पूर्व जन्म पुण्यफल संधी ॥6॥ गुरूमार्गदर्शन त्यासी । संधी मिळे जीवनी ॥ उपयोग करणे शिष्या हाती । दवडू नये अशी संधी ॥7॥ सतत न येई संधी । ईश दयाळू मनी ॥ प्रगती करण्या संधी । गुरू असती मार्गदर्शनासी ॥8॥ उमलण्या संचित कळी । येण्या फल त्या पुष्पी ॥ योग्य शिष्य पाहूनी। गुरू देती सर्वस्व त्यासी ॥9॥ दयाळू गुरू अंत:करणी । प्रेम अति शिष्यावरी ॥ पुत्राहूनी अधिक प्रेमासी । करिती योग्य शिष्यावरी ॥10॥ ऐशा योग्य शिष्यासी । शिष्यत्व ही गुरू निर्मिती ॥ शिष्यत्व निर्मिण्यासी । सर्वस्व देती गुरू त्यासी ॥11॥ गुरू स्तर सोडूनी । काही न देती शिष्यासी ॥ पाहूनी शिष्य स्तरासी । गुरू देती शिष्यासी ॥12॥ असे योग्यता कांही । शिष्य टिके गुरूजवळी ॥ वरपंगी देखावा अंगी । गुरूसी कळे तळमळ किती ॥13॥ तयारी शिष्याची जशी । गुरू देती अधिक त्याहूनी ॥ प्रेम पुत्रापरी शिष्यावरी । ऐशा कथेसी प्रेरणा आजी ॥14॥ मनोहर देव नामी । पुजारी दत्तवाडीसी ॥ भांबेरी रहिवासी । वडील पुजारी राममंदिरी ॥15॥ बाळाभाऊ देव म्हणूनी । मांत्रिक म्हणूनी ख्याती ॥ पुत्र झाले आठ त्यासी । वाचला नाही एकही ॥16॥ जादुगार त्यांचे समोरी । असमर्थ जादु करण्यासी ॥ इतकी मांत्रिकता त्यांची । पुत्र संतान न राहे वंशी ॥17॥ निराश झाले जीवनी । माता दु:खी अति मनी ॥ काय करावे न कळे त्यासी । व्यर्थ म्हणती विद्या सर्व ॥18॥ शरण गेले देवमास्तरासी । ज्यांनी स्थापिले राममूर्तीसी ॥ देवमास्तर आत्मज्ञानी । कळली यांची कृती ॥19॥ ते म्हणती बाळाभाऊसी। सोडा तुम्ही या विद्येसी ॥ रामासी विनंती करूनी । एक फळ देतो तुम्हासी ॥20॥ बाळाभाऊ म्हणती देवासी । सोडली विद्या आताचि ॥ पुत्र न वाचला एकही । ही विद्या कुचकामाची ॥21॥ पुत्र द्या मला एक तुम्ही। सोडतो मी या विद्येसी ॥ नरकवास या प्रयोगी । सुटका करा पापातूनी ॥22॥ देवमास्तर म्हणती त्यासी । पुत्र दिधला एक तुम्हासी ॥ कधी न करा या प्रयोगासी । रामकृपे फळ तुम्हासी ॥23॥ खरे झाले शब्द तेचि । पुत्र झाला बाळाभाऊसी ॥ ईश कृपे पुत्र वंशी । वंशदीप राहण्या जरूरी ॥24॥ अट त्याची एकचि । मांत्रिक प्रयोग नको एकही ॥ कटाक्षे पाळता त्यासी । पुत्र वाढू लागला वंशी ॥25॥ देवमास्तर सांगती त्यासी । राम मंदिरी राहा तुम्ही ॥ पूजा करा रामाची। बाळाभाऊ झाले पुजारी ॥26॥ योगायोग म्हणा त्यासी । गुरु आले भांबेरीसी ॥ ओळख झाली बाळाभाऊची । संबंध येई राम मंदिरी ॥27॥ गुरु येता तेल्हाऱ्यासी । शिक्षणा ठेवती मठासी ॥ पुत्र मनोहर नामी । मुक्काम सदा दत्तवाडीसी ॥28॥ सत्यभामा मातेसी । आनंद अति मनी ॥ गुरुकृपा जाणीव मातेसी । बोलली आनंदे एक दिनी ॥29॥ सदा खराब पुत्र प्रकृती । विष दिले कोणी पुत्रासी ॥ पोट व्यथा तेव्हा पासूनी । गुरुकृपे न राहिली काही ॥30॥ कुंडली पाहूनी सांगती । शिक्षण नाही यासी ॥ गुरुकृपा पूर्ण त्यावरी । पास झाला दहावी ॥31॥ पास होता दहावी । ध्यास एक मनी ॥ ब्रह्मकर्म शिकण्यासी । जावे येथून कोठेतरी ॥32॥ गुरुवरी श्रध्दा अति । न गेला संमती वाचूनी ॥ अकोट जाता शिक्षणासी । अनुभव घेतला तेथे ॥33॥ परत येता दत्तवाडी । गेला तो खामगावी ॥ व्यवस्था पाहूनी सर्वही । परत आला त्याच दिनी ॥ 34॥ अनुभव घेतला त्यांनी । प्रेरणा त्यास एक दिनी ॥ सप्तशती वाचा तुम्ही । पाठ केला दत्तासमोरी ॥35॥ अनुभूती त्यावेळी। आशीर्वाद मिळेल सर्वही ॥ दुसरा अनुभव त्या आधी । प्रगती कशी या क्षेत्री ॥36॥ आरती नित्य सायंकाळी । संचार झाला अंगी ॥ प्रगती गुरु सहवासी । अनुभव त्याला पदोपदी ॥37॥

 

Sadguru Vishnudas Maharaj