Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 45
पद्मासन घालुनिया । बैसविले गुरुराया ॥ घेता अंत्यदर्शना । ध्यानस्थ दिसती शिष्या ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ बहुविध जीवा आश्रय ज्याचा । विशाल आश्रम गुरुरायाचा ॥ दत्तवाडी क्षेत्र निर्मात्याचा । आधार असे शिष्य मंडळीला ॥1॥ जीवनी किती शिष्यांचा । आजार गुरुनी हरला॥ स्पर्श करिता शिष्या । व्याधी गेली लया ॥2॥ केवळ उच्चारिता शब्दा । गडांतर झाले बेपत्ता ॥ ऐकता शिष्य धावा । रुप बदलून केले कार्या॥3॥ स्वशरीराची काय कथा । आजार हा पचविला ॥ कित्येक वर्षे झुंझता । आजारही थकला ॥4॥ कशाची ही किमया । संकल्प राणा होता ॥ श्री दत्त अवतार हा । संकल्पाने संपविला ॥5॥ तप सामर्थ्य अंगा । श्रीगुरुचरित्र पारायणा ॥ कोण सांगेल संख्या । छंद होता त्याचा ॥6॥ एक दिनी एक पारायणा । बैठक एकचि असता ॥ मांडी न बदलता । एक मांडी एक पारायण ॥7॥ दत्त्तवाडीत उपासना । बावन दिवस बावन पारायणा ॥ उपवास बावन दिना । अनंत चतुर्दशीस सांगता ॥8॥ एक एक अनुष्ठानी । एक एक कुकर्मा धक्का ॥ सर्व शिष्यांच्या सारख्या । देती गती ते कर्मा ॥9॥ ऐशा गुरुंचा शेवटचा आजार । इन्जक्शनचा नित्यक्रम ॥ डॉ. वसंतराव जोशी तत्पर । प्रेमे केले सेवा कार्य ॥10॥ श्रध्दा निष्ठा न शब्दां । तो प्रेम जिव्हाळा वेगळा ॥ गुरुभाव जसा । तसा त्यावरी कृपा वर्षाव ॥11॥ माघ मास येता । हृदय विकार गुरुंना॥ गुरुंना नेती अकोला । डॉ. देशपांडे प्रेमे घरा ॥12॥ आठ दिवस अकोल्याला । वसंतराव त्यांचे सेवेला ॥ दवाखाना बंद त्या वेळा ॥ अकोल्यात करिती मुक्कामा ॥13॥ मनोहर देव, पुरुषोत्त्तम महाजन । असती त्यांच्या सेवेस ॥ बोलणे बंद त्या वेळास । दर्शन क्रम शिष्यांचा ॥14॥ तेल्हारा दत्तवाडीत जाता । आराम वाटला थोडा ॥ रामनवमी व गळतीचा । उत्सव झाला त्या वेळा ॥15॥ बोलणे सुरु करिता । आहार थोडा वाढला ॥ सुधारणा वाटे मना । सर्वांचा आनंद वाढला ॥16॥ पौर्णिमेसी एकदम क्षीणता । अकोल्यासी जाण्या असे योजना ॥ नकार गुरुंनी दिधला । घरीच प्राण पाहिजे गेला ॥17॥ डॉक्टर संमतीने अकोला । प्रवास सुरु झाला ॥ गुरु विचारिती त्या वेळा । घर किती दूर सांगा ॥18॥ भरती न करा इस्पीतला । आग्रह घरी न्या मला ॥ आठ जून एकोणीसशे नव्वदला । शुक्रवार रात्रौ आठ वाजता ॥19॥ संपूनी वटसावित्री पौर्णिमा । जेष्ठ वद्य प्रतिपदा असता ॥ डॉ. किशोर देशपांडेचे घरा । प्राण सोडिला त्या मुहूर्ता ॥20॥ अहो गेला गेला । संकल्प राणा गेला ॥ क्षेत्र दत्तवाडी निर्माता। शिष्यांचा आधार गेला ॥21॥ सर्वत्र हाहा: कार जाहला । खिन्न सर्वाच्या मुद्रा ॥ कसे झाले कळेना । अश्रू सर्वांच्या नयना ॥22॥ घेऊन क्षणात निर्णय । पोहचविले दत्त्तवाडी परिसरात ॥ वार्ता कळता क्षणात । जमले अनेक भक्त गण ॥23॥ औषधी उपाय काय कामा । गुरु संकल्प राणा गेला ॥ संकल्पे प्राण गेला । दत्त अवतार संपविला ॥24॥ सर्व शिष्या संदेश दिला । कळता आले दर्शना॥ दिगंबरा दिगंबरा जप करण्या । संदेश होता गुरुंनी दिला ॥25॥ पद्मासन घालूनिया । बैसविले गुरुराया ॥ घेता अंत्यदर्शना । ध्यानस्थ दिसती शिष्या ॥26॥ हार पुष्पासह सर्व । घेती भक्तिभावे दर्शन ॥ भांबेरी, गाडेगांव, थार । माळेगांव, बेलखेड शिष्य ॥27॥ अमरावती,नागपूर । आकोट, अकोला, अकोलखेड ॥ मेहकर, मुंबई, शेगाव । खामगांव, अनेक गावचे शिष्य ॥28॥ त्र्यंबकेश्वराचे भुजंग । बीडकर महाराज आले वेळेवर ॥ कृपा अनंत शिष्यावर । कळले ते आले सर्व ॥29॥ रविवार हा समाधी दिन । सूर्योदयी त्या मग ॥ भारावलेली सर्व मन । स्नान करिता घेती दर्शन॥30॥ मनोहर देव हस्ते संकल्प । गुरुंना बसविती चौरंगावर ॥ एक एक शिष्य मग । स्वहस्ते घाली स्नान ॥31॥ पुरुषसूत्तेफ् अभिषेक । गुरु शिरी केला जाण ॥ बाळशास्त्री सूक्त म्हणत । शिरी धार असे जाण ॥32॥ धोतर शर्ट उपवस्त्र । घालूनी बैसविले पालखीत ॥ पालखी होती तयार। आधले दिनी शोभिवंत ॥33॥ सागवान बल्ली मजबूत । आसन असे तयार ॥ शृंगारीले होते ते सर्व ॥ हार कपडयाने पालखीस ॥34॥ चंदन अत्तर हार पुष्प । पूजन केले गुरुचे जाण ॥ स्त्री पुरुष स्वतंत्र रांग । गुरुंचे घेतले दर्शन ॥35॥ शेवटचे होते दर्शन । शेवटचे होते पूजन ॥ डोळे भरुन घेता दर्शन । अश्रू पूर्ण नयन ॥36॥ 'समर्थ श्री. विष्णुदास । महाराज की जय' म्हणत ॥ टाळ मृदंगासह । निघाली गुरुची पालखी॥37॥ एकवीस वर्षे आजवरा । पालखी सोहळा पाहिला ॥ आज वेगळाच हा । पालखी सोहळा पाहिला ॥38॥

 

Sadguru Vishnudas Maharaj