Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 14
अनुभूती त्यांना त्याची । गुरुदर्शन नित्य ध्यानी ॥ गुरु व्यकटेश दत्तमूर्ती ॥ तिन्ही रुपे ध्यानी एकेवेळी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ पूर्व संचित पाठी । जन्मा येतो मनुष्य प्राणी ॥ भोग भोगतो या जन्मी । जन्मोजन्मीची ठेव ती ॥1॥ जन्म होता भूवरी । षत्रड्रिपू येती बरोबरी ॥ सोडती न त्याला कधी । तारतम्य वापरण्या जरूरी ॥2॥ षत्रड्रिपू जिंकिले ज्यांनी । संत सत्पुरुष नाव त्यासी ॥ ऐशा गुरूकृपे जगी । भवसागर तरतो मनुष्य प्राणी ॥3॥ मनुष्य येतो भूवरी । पूर्व जन्म मित्रत्व जवळी ॥ शत्रुत्व पूर्व कर्मी । वागतो तसे प्रत्येकासी ॥4॥ पत्नी कन्या पुत्र । त्याचीच एक प्रतिकृती ॥ ईश्वर योजना ती । मनुष्या हाती नसे कांही ॥5॥ मनुष्या हाती एकचि । शरण जावे गुरूसी ॥ सेवा करूनी त्यांची । सार्थकता करावी जीवनी ॥6॥ उपासना कर्तृत्वी । ईश्वर सान्निध्य साथी ॥ आर्तता असे अति । साक्षात्कार घडे या जन्मी ॥7॥ संचित भोग भोगण्यासी । प्रयत्नाची ना जरूरी ॥ सुख दु:ख दोन्ही । येई वाटयाला यथा समयी ॥8॥ दु:ख करण्या कमी । गुरूवाचूनी नाही कोणी ॥ समाज दाखवी आपुलकी । संकटी येतो ईश्वरचि ॥9॥ नम्रता पाहिजे गुरूकृपेसी । लीन होण्या नसे तयारी ॥ अहंकार प्रबल देही मनी । जन्मताचि असे शिदोरी ॥10॥ मनुष्या अहंकार अति । मीच करितो वाटे त्यासी ॥ संसार करितो मी । पैसा मिळवितो मी ॥11॥ सर्व कार्य करितो मी । सर्वांना पोसितो मी ॥ मी पण रोमरोमी । ईश दूर त्या पासूनी ॥12॥ ईश योजना सर्वही । तुझे न यांत काही ॥ तू निमित्त करण्यासी । ईश्वर करितो सर्वही ॥13॥ कुंभार फिरवी चाकासी । माशी बसे त्यावरी ॥ तिला वाटे फिरविते मी । तैशी मनुष्याची गती ॥14॥ छत्रपती शिवाजीशी । अहंकार झाला मनी ॥ बांधितो किलरूा मी । पोसितो सर्व मजुरांसी ॥15॥ रामदास गुरू ज्ञानी । आले शिष्याजवळी ॥ बोलाविले मजुरासी । फोड म्हणती या दगडासी ॥16॥ फोडिता खडकासी । बेडूक निघाले त्यातूनी ॥ गुरू विचारिती शिष्यासी । कोणे पोसिले बेडकासी ॥17॥ अहंकार गेला विरूनी । धरले गुरू चरणासी ॥ मी पोसितो वाटे मजसी । मी निमित्त करण्यासी ॥18॥ पोसितो माझेच प्रजेसी । इतरांना न देतो काही ॥ कार्य करितो माझेचि । इतरांच्या कार्या नसे मती ॥19॥ योजना सर्व ईश्वरी । माझे कर्तृत्व त्यात कमी ॥ ईश्वरी सत्तेवाचूनी । एक क्षणही न टिके जगी ॥20॥ व्यर्थ न जावो जन्मफेरी । ही विनंती ईश्वराजवळी ॥ उपासना नित्य गुरूंची । उपाय असे त्यावरी ॥21॥ नित्यक्रम चालविण्यासी । शक्ती देती गुरूदेवचि ॥ योजना ही पूर्ण त्यांची । ढवळाढवळ न चाले काही ॥22॥ ऐशा शिष्या मिळवूनी । प्रगती करिती शिष्याची ॥ कार्य करण्या तीर्थक्षेत्री । पूर्व योजना अदृश्यी ॥23॥ मनुष्य तर्क न चाले काही । बुध्दी पडते अति कमी ॥ ऐसेचि घडले कांही । बीजा रोपण भांबेरीसी ॥24॥ आकोटचे रहिवाशी । आले राहण्या तेल्हाऱ्यासी ॥ योजना ती पहिली । गेले न दुसऱ्या गावी ॥25॥ गोविंद आवदे नामी । पहेलवान त्यांना म्हणती ॥ चार बंधू ते असती । व्यायाम नित्य आखाडी ॥26॥ डबलबार रोमन रिंगी । प्रवीणता अमरावतीसी ॥ हनुमान व्यायाम मंदिरी । हनुमानावरी निष्ठा त्यांची ॥27॥ पिता लक्ष्मण जरी । दत्तक ते माधव काकासी ॥ आजोबा रामचंद्र नामी । परंपरा बादरायण गोत्री ॥28॥ सत्तरी जरी आजी । नित्य सूर्य नमस्कार सकाळी । संबंध अदृश्य सृष्टी । न कळे कोणा आधी ॥29॥ दर्शना जाती भांबेरीसी। स्वप्न सांगण्या एकदिनी ॥ वाटले जावे भांबेरीसी । सांगती स्वप्न गुरूजवळी ॥30॥ दीप ज्योत मालवली स्वप्नी । मनावरी ताण अति ॥ गुरू समजाविती तात्यासी । त्यात नाही काही ॥31॥ अनुताप होता मनी । पुत्र दु:ख होते मनी ॥ पत्नी वियोगे अशांती । बेचैनी असे अंत:करणी ॥32॥ काही करावे वाटे मनी । गुरू प्रेरणा तात्यासी ॥ गजानन वारी करा तुम्ही । संकट होईल दूरी ॥33॥ गुरू विचार मनी । धैर्य खचेल स्पष्ट शब्दी ॥ उपाय प्रेरणा यावरी । अनुष्ठानाची असे जरूरी ॥34॥ संकट होते मोठेचि । उपाय लागेल तसाचि ॥ आज असे या भागी । गजाननी भिस्त भारी ॥35॥ गुरू प्रेरणा एक दिनी । करा एकवीस पारायणासी ॥ गजानन विजय ग्रंथी । ताण झाला मनी कमी ॥36॥ पारायण एक बैठकी । शक्य नव्हते म्हणूनी ॥ एक पारायण तीन दिनी । सुरू केले सुमुहूर्ती ॥37॥ सुरू करिता पारायणासी । दुसरी प्रेरणा तात्यासी ॥ गुरू करा विष्णुदासासी । पहिला गुरू जरी तुम्हासी ॥38॥ सुरू असता पारायणासी । सुरू होती गजानन वारी ॥ विचारिले गुरूला त्यांनी । गुरूवार मुहूर्त सांगती ॥39॥ स्नान संध्या पारायण करूनी । गेले ते नारायण मठासी ॥ आणखी काही जण बरोबरी । एक एका मंत्र देती ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj