Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 4
गुरुकृपे धन प्राप्ती । पूर्वे कर्मेचि व्याधी ॥ पूर्वजन्म कर्मेदोषी । हरली बीडकरांची ॥



श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ संस्कार अंत:करणी । जे भेदू शकती ॥ परिणाम त्यांचे जीवनी । झाले ते पुसू न शकती ॥1॥ अन्य विचार न रुचती । अध:पात तो वाटे मनी ॥ सत्य कळे एकचि । समेट नाही तत्त्वी ॥2॥ ऐसे वातावरण संस्कारी । निर्मिण्या गुरु एकचि ॥ योग्य शिष्य निवडती । ऐसे गुरु दुर्मिळ जगी ॥3॥ श्री विष्णुदास निवडती शिष्यासी । वास ज्यांचा पंढरपुरी ॥ चर्चा संत मंडळीसी । ज्ञान अलोट जवळी ॥4॥ ऐशा बीडकरा अनुभूती । भ्रमण करितां महाराष्ट्रभरी ॥ दिसे ज्ञानासी व्यवहारी । प्रत्यक्ष कृती गुरु जीवनी ॥5॥ गुरु नसता संन्यासी । वृत्ती असे संन्यासी ॥ नसे द्रव्य संग्रह वृत्ती । ऐसे सर्व अनुभविती ॥6॥ न मागे तयाची । रमा होय दासी ॥ ऐसे अनुभव सर्वासी । उणे न पडे कधी कांहीं ॥7॥ एक शिष्य गोविंदराव कुळकर्णी । बीड जिल्हा रहिवासी ॥ बीडकर महाराज ही ख्याती । शिष्य त्यांचे खानदेशी ॥8॥ घरदार जमीन घरी । एक पुत्र त्यांसी ॥ बंधू आप्त असती । सोडिले संसारासी ॥9॥ ज्ञान मार्गे ईश्वरप्राप्ती । ध्येय डोळयापुढती ॥ क्रम प्रवचन कीर्तनी । भ्रमण तीर्थक्षेत्रा जीवनी ॥10॥ तळमळ एक अंत:करणी । गुरु करणे मोक्षासाठी ॥ प्रेरणे अट त्यांची । होती गुरु करण्याची ॥11॥ कीर्तन ज्यांचे चरणी । करिता होय कुंठित मती ॥ त्यांचे चरणा मिठी । देईन तरण्या भवसागर ॥12॥ सीता स्वयंवरा उभी । अट होती एक तिची ॥ जो छेदिल शिवधनुष्यी । त्यास वरीन जीवनी ॥13॥ ऐशा दिव्य अटी । साक्षात् परब्रह्म जोडिला पती ॥ ऐशा भव्य अटी । गुरु परब्रह्म मिळाले मोक्षासी ॥14॥ भ्रमण तीर्थक्षेत्री । कीर्तने गांवोगावी ॥ संशोधन गुरु मोक्षासी । खंड नाही त्या कामी ॥15॥ प्रवचन कीर्तनी । अनेक गांवा मुक्कामी ॥ मुक्काम असतां भांबेरीसी । भजन कीर्तन गुरुमठासी ॥16॥ प्रारंभ होता त्यासी । शब्द न फुटे मुखी ॥ उभे राहण्या शक्ती । नव्हती दोन्ही पायामध्यी ॥17॥ धरिली चरण मिठी । मोक्ष गुरु हेचि निश्चिती ॥ आजपर्यंत कधी । आले न ऐसे अनुभवासी ॥18॥ सामर्थ्य गुरुचे जगी । अनुभविले त्यांनी जगी ॥ मंत्र देण्या कबुली । सोडिती चरण मिठी ॥19॥ आनंदाश्रू नयनी । सार्थकता अनुभविली ॥ धन्यता वाटली जीवनी । मंत्र घेता बीडकरासी ॥20॥ धन्य झाले जीवनी । हे कळे अनेक घटनेसी ॥ आर्थिक प्रश्न मनी । सुटला गुरु मंत्राने ॥21॥ जाता प्रवासा कोठेही । व्यवस्था होई आर्थिक दृष्टी ॥ ही पहिली अनुभूती । आली शिष्य बीडकरासी ॥22॥ कुबेर ज्यांचा भांडारी । द्रव्य देण्या नसे कमी ॥ भाव मात्र अंत:करणी । श्रध्दा निष्ठेची जरुरी ॥23॥ निष्ठा सर्व करी । निष्ठा शेतकऱ्याची गुरुचरित्री ॥ अलोट असे गुरुवरी । धान्य पिके शतगुणी ॥24॥ गुरु सांगती त्यासी । कापी आता कडब्यासी ॥ विरोध सर्वांचा त्यासी । डगमगला नाही मनी ॥25॥ कापिले सर्व पिकासी । गुरु येण्या आधी । ऐशी निष्ठा गुरुशब्दी । फळ त्याचे तैसेचि ॥26॥ पीक आले शतगुणी । धन धान्या समृध्दी ॥ जैशी ज्याची मती । तैसी मिळे त्यासी सिध्दी ॥27॥ आश्चर्य बीडकर मनी ॥ द्रव्याची पडता कमी ॥ द्रव्य मिळे तेवढेचि । ऐशी गुरुमंत्रात सिध्दी ॥28॥ गुरुचरणी सर्व सिध्दी । जाती आधि व्याधी दूरी ॥ पूर्व जन्म दोषासी । घालविण्या असे शक्ती ॥29॥ लागता गुरुचरणी । व्याधी गंगाभारतीची ॥ न राहिली काही । जरी महारोग शरीरी ॥30॥ ऐशी कथा गजानन चरित्री । शेगांवी होते ते विदेही ॥ करिती पट्टशिष्य त्यासी । पाठविती मलकापूरासी ॥31॥ बीडकर सदा प्रवासी । लुंगी असे एक अंगी ॥ प्रवास सतत पायी । वाहनी न करिती कधी ॥32॥ आश्चर्य घडले गुरुमंत्री । किमया झाली वेषी ॥ धोतर सदरा टोपी । प्रवास सदा वाहनी ॥33॥ खाण्या पिण्या प्रवासी । कधी न पडले कमी ॥ नम्र होता गुरुचरणी । पुसली दुष्टाक्षरे त्यांची ॥34॥ दुष्टाक्षरे दरिद्रतेची । होती सुदामा ललाटी ॥ साफ केली सर्वही । सुवर्ण नगरी श्रीकृष्ण दर्शनी ॥35॥ तैसेचि झाले निश्चिती । भेट होता गुरुची ॥ धुवोनी पूर्व कर्मासी । दैन्य नाही आता निश्चिती ॥36॥ प्रवास सतत क्षेत्री । शरीराशी ताण अति॥ व्याधी उद्भवल्या शरीरी । भोग म्हणा त्यासी ॥37॥ पोटाची व्यथा भारी । दुखणे पोटाचे कधी ॥ कळत नाही लवकरी । इलाज करिती तैसाचि ॥38॥ उद्भवली नळ व्याधी । ताठती नळ कधी ॥ वेदना असह्य पोटी । तगमग होई अति ॥39॥ झोप मग कैशी । रात्र रात्र तैसेचि ॥ भोजन नाही काही । अन्न नसे पोटी ॥40॥ भोजना बैसता पानी । मुखी घालता दोन घासासी ॥ नळ ताठती एकाएकी । भोजन राहे अपुरे ॥41॥

 

Sadguru Vishnudas Maharaj