Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 20
प्रथा या उत्सवाची । सुरवात ती पालखीची ॥ माघ शुध्द पौर्णिमेसी । अवर्णनीय वातावरणी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: । गुरू वाचूनी नाही मुक्ती । गुरू शक्ती घडवी सर्व जीवनी ॥ योग्य गुरू मार्गदर्शनानी । सार्थकता जीवनी निश्चिती ॥1॥ धर्म शिकवण सर्वांसी । सण व्रत नित्य संसारी ॥ त्याने संबंध जुळतो ईशासी । हे कळले गुरू संगती ॥2॥ वाचा श्रध्दे दिनरात पोथी । अभिषेक प्रेमे करा देवासी ॥ देवत्व निर्माण त्यातूनी । हे कळले गुरू संगती ॥3॥ जीवन हा खेळ दोन घडी । ईश संकल्पे घडे सर्वही ॥ सार्थकता ईश संकल्पी । हे कळले गुरू संगती ॥4॥ दृश्य सृष्टीहूनी मोठी । असे अदृश्य ईश सृष्टी ॥ तिथे योजना होती । हे कळले गुरू संगती ॥5॥ तप सामर्थ्ये गुरुंनी । मठ स्थापिला तेल्हारी ॥ सामर्थ्य अदृश्य सृष्टी । एकवटले दत्तवाडीवरी ॥6॥ उपासने उपासकासी । दिसती अदृश्य देवही ॥ ज्याला दृश्ये न दिसती । ते न मानती त्यासी ॥7॥ अदृश्य शक्ती कांही । आहे या भूमंडळी ॥ हे दाखविण्या भक्तासी । योजना आखती प्रयोगी ॥8॥ अदृश्य सृष्टीचे देवासी । आकार धारण करण्या शक्ती ॥ फोटो येती अदृश्याची । हा अनुभव दत्तवाडीवरी ॥9॥ तिळ गुळ देती संक्रांतीसी । हलवा करिती देण्यासी ॥ प्रेमे वागावे सर्वांनी । ही मूळ कल्पना त्या सणी ॥10॥ प्रेम वाढो तिळातिळांनी । दिवस वाढे जैसा पळांनी ॥ श्रध्दा वाढण्या भक्ता मनी । चमत्कार संक्रांतीसी ॥11॥ हलवे दागिने किरिट देवासी । फोटो घेण्या गुरु सांगती ॥ संक्रांत कर दिनी । पौर्णिमा पौषमासी ॥12॥ फोटो घेता भुयारी । उत्कृष्ट फोटो सायंकाळी॥ निघाली गुरुसह दत्तमूर्ती । पूजे योग्य ती अति ॥13॥ गुरु सांगती त्यासी । प्रतिमा घ्या औदुंबरी ॥ घेता प्रतिमा पादुकाची । प्रतिमा अदृश्य देवाची ॥14॥ गुरु दैवताचे दैवताची । नृसिंहाची प्रतिमा ती ॥ औदुंबरी आस्तिंत्व म्हणूनी । प्रतिमा निघाली त्यांची ॥15॥ औदुंबर पादुका जवळी । सर्व देवांची वस्ती ॥ हे दाखविले देवांनी । प्रतिमा प्रत्यक्ष येऊनी ॥16॥ औदुंबरी श्री दत्तमूर्ती । ही ख्याती गाणगापूरी ॥ गाणगापूर झाले दत्तवाडी । हा प्रत्यय भक्तासी ॥17॥ निर्गुण पादुका लेपासी । देती गाणगापूर पुजारी ॥ आला बीडकर हाती । मागितला नव्हता त्यांनी ॥18॥ येता निर्गुण लेप दत्त्तवाडीसी । स्थापिती निर्गुण पादुकासी ॥ प्रत्यक्ष गाणगापूर लेपासी । गुरु प्रेरणे आणिले दत्त्तवाडीसी ॥19॥ अदृश्य सृष्टी त्यासी । ठाणे म्हणूनी संबोधिती ॥ अडुसष्ट दत्तजयंतीसी । कीर्तना येण्याची सर्वा घाई ॥20॥ सर्व कामे उरकूनी । शिष्य निघती पाथर्डीवासी॥ नारायण धोबी यामध्यी । सर्व चालले कीर्तनासी ॥21॥ पत्नी नारायण भक्ताची । राहिली गावी एकटी ॥ आटोपता सर्व कामासी । श्रध्दे निघाली कीर्तनासी ॥22॥ सोबत न राहिली एकही । तळमळ कीर्तन ऐकण्याची ॥ रात्रीची वेळा ती । चंद्रप्रकाश पौर्णिमा म्हणूनी ॥23॥ रस्ता कोणता म्हणूनी । साशंक झाली मनी ॥ माया अदृश्य सृष्टीची । साकार झाली त्या स्थळी ॥24॥ गुरु भक्ता मार्गदर्शनासी । उभी राहिली समोरी ॥ हिरवे पातळ अंगावरी । हिरव्या बांगडया हाती ॥25॥ भव्य कुंकू कपाळी । कापूर उदबत्त्ती सुवास शरीरी ॥ ऐशी भव्य स्त्री त्या रात्री । बोलली शांताबाईसी ॥26॥ कीर्तना चलणे जर तुजसी । दाखविते मी दत्तवाडी ॥ ठाणे आहे दत्तवाडी । चाल माझे बरोबरी ॥27॥ भव्य माता समोरी । मागे चालली शांताबाई ॥ दत्तवाडी दरवाजासी । गुप्त झाली ती स्त्री ॥28॥ हकिकत सांगूनी गुरुसी । कीर्तन ऐकले एकाग्री ॥ दूर झाल्या सर्व व्याधी । स्त्री परिणाम मनावरी ॥29॥ माया म्हणे 'ठाणे' दत्त्तवाडी । दत्त्तवास या स्थळी ॥ दत्तात्रेय ठिकाण म्हणूनी। ठाणे शब्द अर्थ हा ॥30॥ श्रध्दा तिची गुरुवरी । एकटी आली चार कोस कीर्तनासी ॥ निष्ठे मार्गदर्शक गुरुचि । व्याधी न राहिल्या शरीरी ॥31॥ गुरु मार्गदर्शक म्हणूनी । अनुभव एक रामभाऊसी ॥ जोशी उपनावी पाथर्डीवासी। येती सतत गुरू दर्शनासी ॥32॥ प्रमिलाबाई पत्नी त्यांची । असे सेवेत सदा गुरू मठासी ॥ लग्ना येता तेल्हारी । उद्या जा म्हणती गुरू त्यासी ॥33॥ जाऊ नका आज तुम्ही । झोपा इथे रात्रभरी ॥ जा उद्या सकाळी । स्वच्छ होते आभाळ त्या क्षणी ॥34॥ रामभाऊ म्हणती गुरूसी । आता पोहचतो आम्ही ॥ निघाले ते मठातूनी। भविष्य कळले गुरूसी ॥35॥ सूचना दिली भक्तासी । ऐकले नाही त्यांनी ॥ आकाश भरले ढगांनी । होते त्यावेळी गाडेगांवी ॥36॥ सोडता गाडेगावासी । वारा सुटला सो सो करूनी ॥ पाऊस वर्षला मार्गी । महत् प्रयासे गेले जस्त गांवी ॥37॥ मुक्काम केला जस्त गावी । त्रास झाला प्रवासी ॥ भविष्य सूचना गुरुंची । ऐकली नाही त्यांनी ॥38॥ फजिती झाली मार्गी । पोहचले नाही पाथर्डीसी ॥ वागावे गुरू शब्दी । नियम केला रामभाऊनी ॥39॥ गुरू शब्द सामर्थ्य किती । हे कळते या घटनी ॥ भविष्य कळते गुरूसी । हा बोध सर्व भक्तासी ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj