Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 38
प्रकाशमान होऊनी । बालक दिसले डोळयासमोरी ॥ विलीन झाले एकदमचि । क्षणात दिसले या दृश्यासी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ खेळ प्रवृत्ती निवृत्ती । मांडला येथ गुरुंनी ॥ बाह्यात्कारी दिसे प्रवृत्ती । अंतरी असे निवृत्ती ॥1॥ संसार हा आखाडा । निवृत्ती घडविण्याचा ॥ संसारातील सुख दु:ख पहा । घडविते रोज मन ॥2॥ सहवास गुरुंचा नित्य । होते प्रगती निश्चित ॥ गुरु उपदेश नित्य । कळती घटनांचे मर्म ॥3॥ प्रत्येक संसारी जीव। असतो प्रवृत्ती प्रधान ॥ तो घेता दत्तवाडी दर्शन । वेगळाच घेई आनंद ॥4॥ नित्य येता दर्शनास । हळूहळू उपासने मन ॥ प्रवृत्ती कमी होऊन । निवृत्तीकडे वळे जाण ॥5॥ निवृत्ती वाचून । अध्यात्मी न ये अनुभव ॥ संस्कारे घडे मन । निवृत्तीकडे लागे लय ॥6॥ हा सर्व प्रभाव। गुरुंचाच निश्चित ॥ सोपा नसे हा मार्ग । वाटचाल ती कठीण ॥7॥ गुरु इच्छेपुढे सर्व । लटका हा संसार ॥ उपासना अशक्य । अनुभव गुरु इच्छेत ॥8॥ कोणी म्हणेल मनात । मी करितो हे सर्व ॥ लटकेच तुझे शब्द । कांही न घडे गुरुवीण ॥9॥ उपासना गुरुच । अनुभूती गुरुच ॥ क्रम टिकवती गुरुच । प्रगती ही गुरुच ॥10॥ गुरु आज्ञे वीण । काही नसे जगतात ॥ आधीच योजना तयार । असती गुरुजवळ॥11॥ शिष्य निवडावा कोण । हे कळते गुरुस ॥ हे पाहून मग । घडविती त्याचे जीवन ॥12॥ सनक सनंदन सनातन । करिती योजना सर्व ॥ त्या योजने जगी मग । होती कार्य सर्व ॥13॥ जे संसारी मन । जाते अति टोकावर ॥ ते जरी प्रवृत्ती प्रधान । तरी होते निवृत्ती प्रधान ॥14॥ एकच विचारात मन । जाते सोडून अन्य विचार ॥ ते जर जडले प्रभूवर । घेते मग अनुभव फार ॥15॥ तुलसीदास संसारी जीव । होता प्रवृत्ती प्रधान ॥ माहेरी जाण्याची रीत । असे पुरातन ॥16॥ तुलसीदास पत्नी त्या रीती । गेली माहेरी आषाढमासी ॥ पत्नी ध्यासे दिसे ती । जली स्थली काष्ठी पाषाणी ॥17॥ अन्य न दिसे कांही । विचार एकच मनी ॥ ध्यास एकच मनी । पत्नी दिसे क्षणोक्षणी ॥18॥ त्या विचारे त्यांनी । पथ सासरचा धरिला झणी ॥ पाऊस मुसळधार जरी । पर्वा न केली त्यांनी ॥19॥ रात्र झाली तरी । मार्गक्रमण तो करी ॥ सर्व संकटे मार्गी । वाटले सुखा परी ॥20॥ लक्ष न त्याचे त्यावरी । नदी आडवी तुडूंब पाणी ॥ प्रेत येता त्यातूनी । नाव केली त्याची त्यानी ॥21॥ पत्नीने पाठविली म्हणूनी । आनंद त्याचा त्यातही ॥ सापाला दोर मानूनी । पत्नीने सोडिला समजूनी ॥22॥ पत्नी विचारे टोक मनी । संकटे तुडविली पायी ॥ साध्य वस्तू गाठण्यासी । अट्टाहास त्याचे मनी ॥23॥ संचित प्रारब्ध जीवनी । पूर्वसुकृत म्हणा त्यासी ॥ असे मन बदलण्या संधी । ती योग्य दृश्य अदृश्यी ॥24॥ पत्नी पाहूनी पतीसी । अशा भयंकर रात्री ॥ अनुताप तिचे मनी । प्रेरणा तिला अदृश्यी ॥25॥ पतीसी म्हणे त्यावेळी । केवढे कष्ट सोसिले तुम्ही ॥ नश्वर या देहासाठी । नश्वर सुख यातूनी ॥26॥ शाश्वत सुखासाठी जर । एवढा होता यत्न ॥ ईश्वर भेटता प्रत्यक्ष । शाश्वत सुख ते निरंतर ॥27॥ गुरू वाचून बदल । अशक्य असे जीवनात ॥ पत्नीच झाली गुरू मग । प्रवृत्तीतून निवृत्ती जाण ॥28॥ तुलसीदास झाले संत । तुलसी रामायण प्रसिध्द ॥ नश्वर सुख सोडून । मिळाले शाश्वत सुख ॥29॥ वाल्या हा असाचि । धनासाठी करी आटापिटी ॥ गुरू नारद उपदेशी । वाल्याचा झाला वाल्मीकी ॥30॥ प्रवृत्ती असे संसारी । ती बदलण्या शक्ती ॥ गुरू एक समर्थ जगी। निवृत्ती येते गुरूकृपे ॥31॥ ऐसे गुरू समर्थ । असता दत्तवाडीवर ॥ श्री विष्णुदास महाराज । म्हणती त्यांना सर्व ॥32॥ चौदाव्या अध्यायी । तात्या आवदे वृत्तांत कांही ॥ कथिला त्यांचे जीवंतपणी । प्रवृत्ती होती जीवनी ॥33॥ गुरू सांगती शिष्यासी । याचना नको जीवनी॥ याचना उपयोगी नाही । व्यर्थ शक्तिव्यय जीवनी ॥34॥ याचना केली जरी कोणासी । तो असमर्थ तुम्हा देण्यासी ॥ याचना जर केली देवासी। त्याला ठाऊक तुमच्या गरजेसी ॥35॥ याचनेचा उपयोग न जीवनी । अन्य देऊ न शकती म्हणूनी ॥ परमेश्वरा कळते सर्वही । मागावे कशास्तव इतरांशी ॥36॥ जे प्रारब्धे घडे जीवनी । जे सहज मिळे तेचि ॥ व्यर्थ खटपट त्यासी । उपासनेसाठी प्रयत्न जरुरी ॥37॥ हे तत्त्व जाणोनी । गुरू आज्ञा प्रमाण मानूनि ॥ उपासना केली तात्यांनी । सुख दु:खात जीवनी ॥38॥ जैसे तीळ रगडूनी । तेल निघे बाहेरी ॥ ढेप होते वेगळी। उपासना त्यासाठी जीवनी ॥39॥ उपासनेने जीवनी । शाश्वत सुख अंतरी ॥ अशाश्वत दु:ख बाह्यात्कारी । वेगळे होती दोन्ही ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj