Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 44
माझे रुप त्यांचे शेजारी । लिखाण करीत होते कागदी ॥ भाव हाचि मरण न आजी । गुरु स्तुती लिखाण करा तुम्ही ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ वाद विकल्प शंका मनी । येऊ नये वाचका चिकित्सकासी ॥ हा उद्देश असे प्रेरणी । कळसूत्री बाहुलीपरी ास्थिंती माझी ॥1॥ आज गद्यरुप लिखाणी । इच्छा झाली सतत मनी ॥ दत्तवाडीस जाता मार्गी । पद्य सतत माझ्या मुखी ॥2॥ अर्थ त्याचा केला मी एकचि । हेही लिहा पद्यरुपी ॥ स्वप्नी मनी नसे जे कांही। ते अनुभवे लिहिले सर्व ॥3॥ उपासना करिता कांही । चुका काही गुरु पदी ॥ त्याने जीवनाची झाली माती । मरण बरे हा विचार मनी ॥4॥ लिखाण दृश्य सतत अदृश्यी । अर्थ न कळला कांही ॥ विचारण्याची हिंमत न मनी । कर्ता करविता गुरु एकचि ॥5॥ गजानन उपाख्य राजू व्रतबंधी । व्यंकटेश पूजनाची समाधानी ॥ लिखाण दृश्यी प्रत्यक्ष अनुभूती । झोप उडाली एक रात्री ॥6॥ सतत प्रेरणा कवित्वाची । कधी जे नसे मनी स्वप्नी ॥ जे घडले प्रत्यक्ष जीवनी । सुरु झाले कवित्व लिखाणी ॥7॥ साफल्य झाले जीवनाचे । गुरुराया आपुल्या दर्शनाने ॥ कवित्व पूर्ण होऊनी पहिले । झोपता तरी प्रेरणा होती सुरु ॥8॥ व्रतबंध सोहळा पद्यरुपी । लिखाणा सुरुवात ती झाली ॥ पूर्ण होता त्या सर्वासी। झोप आली मला त्या दिनी ॥9॥ आश्चर्य जीवनात घडले । पांच पदे नंतर दहा पदे ॥ चमत्काराचे पद्य अकरावे । वाटले आता संपली लिखाणे॥10॥ हुरहुर सतत जीवनी मनी । जगुनी उपयोग काय जगी ॥ भुयारी व्यंकटेश स्तोत्री । मग्न असतां एक दिनी ॥11॥ अदृश्य सृष्टी चमत्कारचि । शंकर गण त्या दिनी ॥ निळे रुप शिंगे त्यासी । उभे राहिले पादुका जवळी ॥12॥ माझे रुप त्यांचे शेजारी । लिखाण करित होते कागदी ॥ भाव हाचि मरण न आजी । गुरु स्तुती लिखाण करा तुम्ही ॥13॥ टाक होता माझे हाती । वही होती मांडीवरती ॥ लिखाण कार्य जीवनी । करणे आहे सार्थकतेसी ॥14॥ प्रेरणा प्रबल कशी । सहज सर्व घडविती ॥ कृष्णराव कुळकर्णी । आले सहज माझ्या घरी ॥15॥ बीडकर घटना त्यांनी । सांगितल्या दोन तासभरी॥ गुरु भांबेरी वृत्तांत सर्वही । कथिला प्रेमे मजजवळी ॥16॥ एक एक आश्चर्यचि । सहज घडले प्रेरणा अदृश्यी ॥ विश्वनाथ पाटील शिष्यांची। भेट झाली दुकानी ॥17॥ पाणी पिण्या इच्छा मनी । सहज आले माझे घरी ॥ जीवनातील गुरु अनुभूती । सांगती ते डोळे भरुनी ॥18॥ भांबेरी वृत्तांत ऐकला कांनी । पुढची योजना अदृश्यी ॥ सहामाही परीक्षा निरीक्षणी । सहज प्रेरणा त्या वेळी ॥19॥ सुरु असता निरीक्षणासी। लिखाण झाले उभे उभेचि ॥ पूर्ण झाले दोन दिवसी । पालखी होती त्या दिनी ॥20॥ पालखी सुरु असता रात्री । भाऊ भिडे पाहिजे म्हणूनी॥ प्रेरणा मिळाली मजसी । डॉक्टर संबंध भांबेरी क्षेत्री ॥21॥ त्या रात्री घरी येऊनी । डॉक्टर वृत्तांत लिहूनी ॥ पूर्ण केले भांबेरी वृत्तासी । त्याचेच तीन अध्याय झाले नंतरी ॥22॥ गुरुकृपे यजमान गुरुंचे यज्ञी । त्यावरी झाली पदे त्यावेळी ॥ बीडकर शिष्यांनी मजजवळी । सांगितल्या तीन अनुभूती ॥23॥ तोच प्रेरणे देऊनी मजसी। संग्रह झाला गद्य रुपी॥ गुरु जीवनातील गोष्टी । लिखाणी होत्या कांही पूर्वी ॥24॥ कल्पना नव्हती मजला कांही । लिहिले होते सहजचि ॥ ग्रंथ लिखाण नव्हते स्वप्नी। अदृश्य सृष्टी योजना वेगळी ॥25॥ सर्व सहज घडले अदृश्यी । लोखंडकार एक दिनी ॥ निघाले गावात येण्यासी। माझी वेळ तीच नेमकी ॥26॥ सायकलवर आणिले त्यांना मी । सहज विषय निघाला म्हणूनी ॥ वृत्तांत कथिला सर्व त्यांनी । तो लिहून ठेवण्या इच्छा मनी ॥27॥ गद्यात लिहिण्या सुरु करिताचि । पद्यात लिहिले गेले सर्वही ॥ ही योजना कां माझी । कर्ता करविता तो समर्थ जगी ॥28॥ होता या लिखाणासी । प्रेरणा गुरु गाथा लिहण्यासी ॥ पहिला अध्याय कसा कोठुनी । सुरु करण्या प्रश्न मनी ॥29॥ चार पाच अध्यायाची। गुरु गाथा होईल वाटले मनी ॥ गुरु स्वहस्ते मिळाली वही । श्री मुन्शी पत्र प्रत करण्यासी ॥30॥ अडीचशे पानाची ती वही । वाचली मी सर्व ती ॥ बीडकर हस्ताक्षरात कांही । लिखाण होते त्यामध्यी ॥31॥ गुरु जीवनाची बालपणाची । सुरुवात होती त्यात काही ॥ सुरवात करावी कोठूनी । कळले मला त्या क्षणी ॥32॥ लिहून घेतले ते सर्वही । सुरुवात झाली गुरु गाथेसी ॥ त्या पुढील घटना मी । ऐकली होती गुरु मुखातूनी॥33॥ सुरु करिता मंगल चरणासी । क्रम कसा कळेना मनासी ॥ पूजा करिता घरी देवाची । क्रमवार दृश्य स्मरणासाठी ॥34॥ क्रम सांगतो मी सर्वासी । पूजनीय गुरु महाराज प्रारंभी ॥ श्री गजानन महाराज नंतरी । तिसरे श्री व्यंकटेश कुलस्वामी ॥35॥ श्री शंकर नरसिंह सरस्वती । नरहरी प्रेरणी पूर्ण केले अध्यायासी ॥ दुसरा तिसरा आराखडा कांही । चार पाच चमत्कार लिहण्यासी ॥36॥ प्रेरणा मिळाली भिन्नचि। दोन तीन लिहण्यासी ॥ पूर्व चरित्र संपता मनी । प्रश्न आता काय लिहू मी ॥37॥ परीक्षा निरीक्षण वेळी । बीडकर अध्याय प्रेरणा मनी ॥ लिहिल्या गेला कागदी । फिरता फिरता शाळेत ॥38॥ बीडकर पूर्वजन्म दोषही । स्वप्नी दृश्य मज समोरी ॥ क्रमानेच जरी प्रेरणा ही । मनी योजना किती तरी ॥39॥ कधी वाटले मजसी । भांबेरी वृत्तांता नंतरी ॥ ठेवावा सहावा सातव्यासी । अदृश्य सृष्टी तत्पर अति ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj