Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 5
अनेक योगी दर्शन अनुष्ठानी । तसेच स्वप्न सोनाजी मंदिरी ॥ प्रकटले सोनाजी समोरी। सांगती सेवा करा विष्णुदासाची ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ गुरु सर्वज्ञ जाणुनी । निष्ठा असे जरी गुरुवरी ॥ ज्ञान दीप मिळे तेथुनी । परब्रह्म दाविती दृष्टीपुढी ॥1॥ गुरु ही विद्युत शक्ती । जोडा अंत:करण त्यासी ॥ विद्युत दीप आत्मशक्ती । लागेल या जन्मी ॥2॥ सर्व दीप जोडती । काही लागती काही जाती ॥ उच्च तार त्यामध्यी । दीप देई प्रकाश जगी ॥3॥ नसे प्रकाश तुटक्या तारी । अंध:कार होई वितळता ती ॥ निष्ठा तार प्रबल जरी । जीवन सार्थक निर्धारी ॥4॥ वीज चमकता आकाशी । टोकदार कुऱ्हाड अंगणी ॥ टाकण्याची रीत खेडोपाडी । वीज येई टोकावरी ॥5॥ विद्युत येई टोकावरी । ही वृत्ती जशी निसर्गी॥ एक निष्ठा टोक मनी । स्वंय गुरु येती त्या मनी ॥6॥ भास्कर पाटला नेण्यासी । शेगाव गजानन महाराज जाती ॥ विहिरीत आणती पाणी। चमत्कारे शिरले गुरु भास्कर मनी ॥7॥ एकटे सोडिले संसारासी । चमत्कार पाहिला सर्वांनी ॥ निष्ठा होती पूर्व जन्मीची । त्या निष्ठे गुरु आले आकोलीसी ॥8॥ भास्कर राहिला सेवेसी । आजन्म गजानना जवळी ॥ ऐशी निष्ठा ज्यांची । ते न येती पुन: पृथ्वीवरी ॥9॥ शास्त्रज्ञ नवीन रीती । वीज वाहक लावती इमारतीसी ॥ टोक असे त्यासी । वीज येई त्या मध्यी ॥10॥ टोके इजा न होई इमारतीसी । टोक नसता त्यासी॥ इजा होई इमारतीसी । हा नियम दिसे निसर्गी ॥11॥ तैसेचि असे अध्यात्मी। निष्ठेचे टोक कार्य करी ॥ निष्ठा टोक नसे जरी । निर्धार न राहे मनी ॥12॥ विकल्प येती मनी । विश्वास न बसे कशावरी ॥ निष्ठा तार खराब जरी । फ्युज जाई त्याच क्षणी ॥13॥ फ्युज जाता वाटे त्यासी । यात नाही काही ॥ एक उपाय यावरी । निष्ठा वाढवा तुम्ही ॥14॥ उपासने निष्ठा वाढी । लाभ मिळे गुरुभक्तीतूनी ॥ ऐशी निष्ठा शिष्या मनी । गुरु स्वयं जाती त्या मनी ॥15॥ ऐशा लोखंडकारा आणण्यासी । प्रत्यक्ष गेले गुरु सोनाळयासी ॥ स्वप्नी जाऊनी त्या रात्री । आणिती सेवे सखारामासी ॥16॥ ती कथा ऐकता मनी । कळे गुरु शक्ती महती ॥ निष्ठा असे कोणे मनी । हे कळते विष्णुदासासी॥17॥ महाराज बीडकर जरी । त्यांचेही हे गुरु असती ॥ लोखंडकार साधू जरी । प्रेरणे येती सेवेसी ॥18॥ पूर्व जन्म पुण्य हेचि । ॠणानुबंध पूर्वीचाचि ॥ आपणा न कळे कांही । प्रत्यक्ष घडले तैसेचि ॥19॥ भांबेरी गांवाहूनी । कीर्तन ठरले सोनाळी ॥ सोनाळा गांव असे खेडेचि । जळगांव तालुक्यामध्यी॥20॥ तेल्हाऱ्याच्या पश्चिमेसी । असे पांच कोसावरी ॥ त्या गांवचे रहिवासी । लोखंडकार असती ॥21॥ असे सोनाळा गांवी। सोना महाराजांची समाधी ॥ नित्य पंचपदी त्यांची । गाती प्रसन्न मनी ॥22॥ कीर्तन करिती मंदिरी । भजनाची त्यांना आवडी ॥ सतत असे विचार मनी । सेवा करावी सत्पुरुषाची ॥23॥ पूर्व जन्मीची देणगी । सत्पुरुषाच्या सेवेची वृत्ती ॥ कधी भेटेन सत्पुरुषासी । ही तळमळ अंत:करणी ॥24॥ गाडगे महाराज येती । सोनाळा गांवी एक दिनी ॥ बोलणी करिती त्यांच्यासी । मी येतो तुमच्या सेवेसी ॥25॥ संमती गाडगे महाराजांची । जाती त्यांच्या हर मुक्कामी ॥ कीर्तन असे ज्या गांवी । त्या गावी सखाराम जाती ॥26॥ कधी पैदल कधी मोटारी । असा क्रम होता काही ॥ कळले त्याचे वडील बंधूसी । गेले ते एका मुक्कामी ॥27॥ संसार टाकिला कोणावरी । म्हणती चला आता घरी॥ बंधूनी आणिले त्यासी । परत सोनाळा ग्रामी ॥28॥ योजना अदृश्य सृष्टीची । भिन्न होती निश्चिती ॥ त्याने नाही झाली । सेवा गाडगे महाराजाची॥29॥ पूर्व जन्म ॠणी । होते सबंध दुसरेचि ॥ योजने त्या सृष्टीशी । गुरु गेले कीर्तनासी ॥30॥ गुरु करावे कोणासी । हे न कळे शिष्यासी ॥ कोणा करावे शिष्यासी । हे कळे गुरुसी ॥31॥ त्यात जन्मोजन्मीची । असे पूर्ण दृष्टी ॥ संबंध असे वृत्तीसी । बाह्यवेषी नाही काही ॥32॥ पूर्व जन्म सुकृतेचि । सुरु होता कीर्तनासी ॥ टाळ सखारामा हाती । साथ करिती गुरु कीर्तनी ॥33॥ पहिली भेट ऐशी । सूचना होती त्यासी ॥ सेवा करा तुम्ही । साथ करा गुरु जीवनी ॥34॥ ऐकता कीर्तनासी । रोमांच उठले अंगी ॥ चित्र उभे समोरी । हेचि सत्पुरुष निश्चिती ॥35॥ आजपर्यंत होते मनी । सेवा करावी सत्पुरुषाची ॥ पूर्ण झाले ते आजी । मिळाले फल त्याचे आजी ॥36॥ रहावे सदैव सहवासी । लोळावे वाटे चरणी ॥ ओळख नसतां काही । योग्य नाही बोलणे जगी ॥37॥ मार्गदर्शन होण्या आधी । भेटू नये कोणासी॥ ऐशी अध्याात्मिंक रीती । त्याने शक्यता नसे फसण्याची ॥38॥ कोणासी संबंध पूर्वी । योजना काय या जन्मी ॥ तीव्र इच्छा होता मनी । मार्गदर्शन होई निश्चिती ॥39॥ मुक्काम असता सोनाळी । नाही सोडिले गुरूसी ॥ विचारण्या धैर्य कमी । विचारिले नाही काही ॥40॥ गुरू परतल्यावरी। स्वप्न झाले सखारामासी ॥ तुमची इच्छा जी मनी । सेवा करा सत्पुरुषाची ॥41॥ असती सत्पुरुष हेचि । सेवा करा तुम्ही यांची ॥ पूर्व सुकृत हेचि । समर्पी जीवन गुरूचरणी ॥42॥

 

Sadguru Vishnudas Maharaj