Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 12
स्वप्न झाले तिसी । महाराज आले कार्यालयी ॥ खरेदी केली जागेची । पक्के केले रजिष्ट्रारानी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ योजना अदृश्य सृष्टीची । तेथे न कळे कोणासी ॥ गुरू अवतार शनिप्रदोषी । प्रकटले कार्यक्षेत्री शनिप्रदोषी ॥1॥ गुरू जन्म भूमीवरी । घेतला असे ज्या मुहूर्ती ॥ गुरू प्रकटले कार्यक्षेत्री । मुहूर्त असे तोचि ॥2॥ योगायोग म्हणा त्यासी । योजना असे अदृश्य सृष्टीची ॥ आंधळयाने आणिले गुरूसी । तर्का न जागा कांही॥3॥ जे न राहिले एक जागी । राहिले कसे भांबेरीसी ॥ शिष्य केले कांही । मार्गदर्शन प्रत्येकासी ॥4॥ भांबेरी कार्य संपताचि । आकर्षण वाटले गाडेगांवी ॥ कार्यक्षेत्र बदलूनी । दत्त मंदिर स्थापिले गुरूंनी ॥5॥ उत्साही शिष्य कितीतरी । योजना नसे तशी ॥ जीर्णोध्दार कार्य संपताचि। नारायण मठ सोडिला त्यांनी ॥6॥ तीर्थक्षेत्र निर्मितीसी । पूर्व भूमिका समजा ती ॥ चूक नसे अदृश्यी । जागा असावी मालकीची ॥7॥ योजना ती पूर्वीची । कल्पना नव्हती कोणासी ॥ अदृश्य सृष्टी कल्पना ती । ग्रहण केली स्वप्नी ॥8॥ भाऊ भिडे तेल्हाऱ्यासी । मोलकरीण त्यांच्या घरी ॥ राधाबाई ठाकरीण म्हणूनी । जिव्हाळा होता अति ॥9॥ स्वप्न झाले तिसी । महाराज आले कार्यालयी ॥ खरेदी केली जागेची । पक्के केले रजिष्ट्रारांनी ॥10॥ स्वप्न सांगता तिनी । खरे न वाटले कोणासी ॥ सूचना अदृष्य सृष्टीची । हंसू आले ऐकून स्वप्नासी ॥11॥ घडला तो चमत्कार । ठरले ते मार्गदर्शन ॥ जागा घेतली विकत । रजिष्ट्रर केले खरेदीस ॥12॥ योजना अदृश्य सृष्टीची । तयार होती किती आधी ॥ ग्रहण केले राधाबाईनी । योजना प्रत्यय सर्वांसी ॥13॥ योजना ठरता जागेची । जागा अनेक सर्वा समोरी ॥ रहित होती पक्के होऊनी । घेतली किसनबुवा वडतकाराची ॥14॥ अदृश्य सृष्टी योजना ती । प्राचीन तपोभूमी ती ॥ दोन तपस्वियांची भूमी । खरेदी केली गुरूंनी ॥15॥ पूर्व संस्कार भूमीवरी । तपस्वियांची जागा ती ॥ अनुष्ठानाची भूमी ती । यज्ञ यागाची जागा ती ॥16॥ वेदपठणाची जागा ती । तपस्वियांची इच्छा ती ॥ अनुष्ठाना अनुकूलता ही । यज्ञाला योग्य भूमी ही ॥17॥ तपस्वियांची इच्छा ती । गुरू संकल्पे तृप्ती त्यांची ॥ अनुकूलता तपस्वियांची। कार्य सुलभता अदृष्यी ॥18॥ तीर्थक्षेत्र निर्मिती । गुरू कार्य असे जीवनी ॥ आनंद तपस्वियांसी । साहाय्य करिती गुरूकार्यी ॥19॥ अतृप्त इच्छा दोघांची । पूर्ण केली गुरूंनी ॥ साहाय्य त्यांचे कार्यी । गुरू घेती अदृश्यी ॥20॥ निर्णय गुरूंचा गाडेगांवी । जागा पाहिजे मालकीची ॥ सार्वजनिक जागा कलियुगी । उपयोगी नसे उपासनेसी ॥21॥ उपासना करण्यासी । निवांत जागेची जरुरी ॥ अधिकार न कोणासी । स्वयं प्रेरणा उपासनेसी ॥22॥ वाव न राही इतरांसी । उपासकाचीच पाहिजे गर्दी ॥ निवांतपणा उपासनेसी । प्रगती साधेल भक्तांची ॥23॥ उपासने शक्ती निर्मिती। सत् कार्ये होती सहजचि ॥ विद्युत केंद्र शक्ती । जोडता येईल सत्कार्यी ॥24॥ प्रेरणा संदेश कोठेही। संदेश येईल कोठूनही।दूरदर्शन कार्यही । करेल ही उपासना शक्ती ॥25॥ प्रकाश केंद्र हेचि । ज्ञान प्रकाश मिळे येथूनी ॥ अंधकार जाईल दूरी । अज्ञान न राहील कांहीं ॥26॥ सत्ययुग निर्मिती । भ्रम होईल दूरी ॥ दांभिकता न राहे काही । खरा धर्म कळेल सर्वा ॥27॥ पैशाने न मिळे काही । स्व प्रयत्नाची जरुरी॥ पैशाने न अडे काही । प्रभू समर्थ सर्व देण्यासी ॥28॥ मन प्रबल जगी । इच्छेने होते सर्व निर्मिती ॥ इच्छाशक्ती सृष्टी निर्मिती । इच्छामात्रे मानव निर्मिती ॥29॥ गुरू इच्छा प्रबल शक्ती । ब्रह्मा शक्ती असे जवळी ॥ नवीन तीर्थक्षेत्र निर्मिती । इच्छा असे पूर्ण गुरूची ॥30॥ गुरू ब्रह्मा म्हणूनी । प्रत्यय प्रयोग समोरी ॥ ओळख नव्हती एकाचीही । पैसा नसे जवळी ॥31॥ निर्माण केले तीर्थक्षेत्रासी । अभिनव प्रयोग म्हणती ॥ उत्पन्न काय विचारिती । उत्पन्न नाही उत्तर त्यासी ॥32॥ चालते कसे म्हणून । विचारणा करिती सर्व ॥ जावयाहूनी अधिक। व्यवस्था होई सर्वांची ॥33॥ येणारा जाणारा कोणी । गेला नाही चहा वाचूनी ॥ कोण करितो खर्चासी । यक्ष प्रश्न सर्वा समोरी ॥34॥ वर्गणी करिता कां तुम्ही । विनंती करिता कां कोणासी ॥ चालवितो का धनिक कोणी । मासिक वार्षिक निधी कांही ॥35॥ धनिकाचे लग्नापरी। उत्सव कसे करिता तुम्ही ॥ कोडे हे येणाऱ्या जाणाऱ्यासी । सुटणे अशक्य सर्वांसी ॥36॥ इच्छा मात्रे होते सर्वही । हा विश्वास नसे जगी ॥ तो विश्वास आणण्यासी । प्रयोग हा दत्तवाडीस ॥37॥ आमंत्रण पत्रिका नाही । उत्सवा कसे सर्व येती ॥ प्रेरणा त्यांच्या मनी । यथाशक्ती कार्य करिती ॥38॥ इच्छा होता गुरू मनी । प्रेरणा मिळे योग्य मनी ॥ स्वयं प्रेरणे कार्यासी । सांगण्या नसे कोणा जरुरी ॥39॥ बोल नसे गुरूवरी। ज्याचे फल त्याचे जवळी ॥ प्रेरणा उपासनेची भक्तासी । फल जबाबदारी त्याची ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj