Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 13
भांबेरीकर झाले मानकरासाठी । रक्षण्या आपुल्या भक्तासी ॥ दोष न लागु दिला काही । जिव्हाळा अंत:करणी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ मनुष्य ही देवाची प्रतिकृती । ब्रह्मा विष्णू महेश शक्ती ॥ उत्पत्ती ास्थिंती लय तिन्ही । असती प्रत्येक मनुष्याठाई ॥1॥ देवाची ती अंशकृती । गुण देवांचे त्या प्रमाणी ॥ गुरु ही पूर्णाकृती । पूर्ण गुण गुरु अंगी ॥2॥ ब्रह्मा गुण निर्मिती । तीर्थक्षेत्र गुरु निर्मिती ॥ प्रत्येक गुण ास्थिंती । असे पूर्ण गुरू जवळी ॥3॥ मनुष्य विचित्र निर्मिती । सर्व शक्ती त्याचे जवळी ॥ इच्छा मन ही किलरूी । लागे प्रत्येक दालनी ॥4॥ शोध जितके विज्ञानी । ती स्वयंभू मनुष्या शक्ती ॥ वस्तू निर्माण विज्ञानी । अदृश्य सृष्टीतुन वस्तू निर्मिती ॥5॥ तार संदेश विज्ञानी । संदेश शक्ती मनुष्याठाई ॥ भक्त संदेश घेण्यासी । गुरूजवळी असे शक्ती ॥6॥ विज्ञान युगी परिास्थिंती । रेडिओ असे घरी ॥ कळ फिरविता तुम्ही । वार्ता लाभ तुम्हासी ॥7॥ लाविता विशिष्ट लहरी । त्या गांवाहूनी वार्ता कानी ॥ संबंध गुरूचा अदृश्यी । संदेश मिळे कोठूनही ॥8॥ मनुष्य मेंदू हाही । रेडिओ असे शिरी ॥ मन कळ लावूनी । लागे कोणत्याही गावी ॥9॥ मन कळ ही शक्ती । ताबा लागे मनावरी ॥ कळ जोडण्या शक्ती जरूरी । लागे ती शक्तीतूनी ॥10॥ गुरू असती एकचि । मन इच्छे ते प्रत्येका जवळी ॥ संदेश कळे सर्वांकडूनी । ऐसी शक्ती गुरूजवळी ॥11॥ ऐसा अनुभव एकोणसाठी । आला असे शिष्यासी ॥ त्या अनुभवाआधी । पूर्व वृत्तांत ऐकू काही ॥12॥ रामचंद्र मानकर नामी । शिष्य एक भांबेरी ग्रामी ॥ घरी जरी होती शेती । ती न राहिली काही ॥13॥ शिलाई मशिन घरी । उदर निर्वाह शिलाईवरी ॥ परिास्थिंती नाजूक अति । ती न राही सारखी ॥14॥ जेवढी मिळेल शिलाई । चरितार्थ चालविती त्यावरी ॥ शिलाई न मिळे ज्या दिनी । पैशाची टंचाई त्या दिनी ॥15॥ संतकृपा त्यांचेवरी । पूर्व सुकृत म्हणा त्यासी ॥ ओळख त्यांची गुरूची । नित्य जाती दर्शनासी ॥16॥ भांबेरी गांवी शिष्य यादी । त्यात असे नोंद मानकराची ॥ स्पष्टपणा त्यांचे शब्दी । त्याने ही ओळख त्यांची ॥17॥ गुरू मंत्र घेण्यातही । मानकर होते आधी ॥ स्वच्छता साात्त्विं वृत्ती । असे त्यांचे घरी ॥18॥ चमत्कार घडला एक दिनी । कपडे न आले शिवण्यासी ॥ शिलाई नाही काही । शिलरूक नव्हती पूर्वीची ॥19॥ नोटा ठेवण्याची पध्दती । असे दुकान नोंदवहीमध्यी ॥ डायरी म्हणती त्यासी । पहावे चाळून वाटले त्यासी ॥20॥ विज्ञान युगी पध्दती । वस्तुतूनी वस्तू निर्मिती ॥ ज्या वस्तू पृथ्वी आकाशी । त्यातूनी निर्मिती दुसरी ॥21॥ भिन्न प्रथा अध्यात्मी । सर्व असे आकाशी अदृश्यी ॥ प्रत्येक द्रव्य त्यामध्यी। एकत्र करिती मंत्रानी ॥22॥ एकत्र करूनी अदृश्य द्रव्यी । दृश्य वस्तू निर्मिती ॥ चैतन्यातूनी वस्तू निर्मिती । हे तत्त्व असे अध्यात्मी ॥23॥ ॠषिमुनी अनुभवे पूर्वी । निर्माण केल्या वस्तू कांही ॥ दिल्या यज्ञ यागातूनी । वस्तू राजे महाराजांसी ॥24॥ महाभारत युध्द प्रसंगी । असे नोंद काही शस्त्रांची ॥ राम रावण युध्द वर्णनी । मंत्रे आग्निंबाण निर्मिती ॥25॥ वातास्त्र पर्जन्यास्त्र सर्व । निर्मिती अदृश्य सृष्टीतून ॥ वातावरण द्रव्य मिळवून । मंत्र प्रभावे वस्तू निर्मिती ॥26॥ चैतन्य मंत्र शक्तीतूनी । एकत्र येती द्रव्य अदृश्यी ॥ इष्ट वस्तू त्यात निर्मिती । ऐशी गुरुजवळी शक्ती ॥27॥ चमत्कार म्हणती कोणी । प्रथा सिध्दी म्हणण्याची ॥ तुम्ही म्हणा त्याला काही । अनुभव तसा मानकरासी ॥28॥ पैसा नसे खर्चण्या जवळी । पाहू म्हणती कोठेतरी ॥ पुन: पाहिली वही निरखूनी । सापडले नाही काही ॥29॥ पुन: पुन: वाटे मनासी । असेल काही कोठेतरी ॥ वहया चाळल्या सर्वही । काही न सापडले त्यासी ॥30॥ मनी विचार एकचि । व्यवस्था काय आजची ॥ शिष्य दु:खी पाहूनी । गुरू कळवळले हृदयी ॥31॥ शिष्य दु:ख निवारण्यासी । व्यवस्था केली कांही ॥ प्रेरणा दिली मानकरासी । पहा पुन: डायरी ॥32॥ असेल त्यात काहीतरी । पाहिली वही तिसऱ्यानी ॥ कोरी करकरीत दोनची । नोट होती त्यामध्यी ॥33॥ एक एक पान निरखूनी । चाळली दोन वेळा वही ॥ नोट नाही सापडली । आता आली कोठूनी ॥34॥ तिही होती नोट कोरी । कधी न त्यांनी ठेवली ॥ अति आश्चर्य मनी । गुरूसी सांगितले त्यांनी ॥35॥ उत्तर न मिळाले त्यासी । कळले त्यांना त्यावेळी ॥ गुरूची किमया ही । गुरूकृपे व्यवस्था ती ॥36॥ नोट नसता वहीमध्यी । तयार झाली कशी ॥ कळली त्यांना गुरूशक्ती । अदृश्य द्रव्यातूनी वस्तू निर्मिती ॥37॥ असती हे अवतारी । मानव रुपे जरी दिसती ॥ अनुभव दुसरा मानकरासी । आला एकोणसाठसाली ॥38॥ गुरू निघाले तीर्थक्षेत्री । मुक्काम होता हृषीकेषी ॥ पहिली दत्तजयंती रामनवमी । संपता ही घटना घडली ॥39॥ तार संदेश मिळे विज्ञानी । बिनतारी संदेश मिळे गुरूसी ॥ यंत्र तार नाही गुरूजवळी । संदेश मिळाला गुरूसी ॥40॥ गुरू असती एकचि । शिष्य अनेक गुरूसी ॥ मनकळ लागता गुरूची । संदेश मिळे प्रत्येक घरूनी ॥41॥

 

Sadguru Vishnudas Maharaj