Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 2
शुभ मुहूर्त पाहूनी । करिती नामकरण विधी ॥ माता हर्षे उच्चारी । ''गुरुनाथ'' ऐसे नामासी ॥



श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: । गुरुकृपा श्रेष्ठ जगी । काळाचीही नाही भीती ॥ भविष्य समर्थ शिष्यासी । वदला एक ज्योतिषी ॥1॥ मृत्यू तुझा जवळीं । उद्या न येशी भिक्षेसी ॥ गुरुकृपा त्यावरी । बैसविती घोंगडीवरी ॥2॥ मृत्यू टळला त्या दिनी । भिक्षेसी पाठविती त्या घरी ॥ आश्चर्य वाटले ज्योतिषासी । गुरुकृपा होती खरी ॥3॥ बंद माझी असतां नाडी। ठोके नसतां छातीसी ॥ प्राण आणिला गजाननरुपी । गुरुकृपा ही खरी ॥4॥ प्राणदानाची शक्ती । प्रेरणा कवित्व लिखाणी ॥ स्वप्नी हाती लेखणी। जागृती लिखाण कागदी ॥5॥ अदृश्य सृष्टी ऐसी । दृश्य दिसती लिखाणांची ॥ बुध्दी न चाले कांही । योग्यता नाहीं कांही ॥6॥ तुटला संबंध मातृभाषी । तीस वर्षापासूनी ॥ गणित विज्ञानी प्रीती । विद्यार्थी शिक्षक जीवनी ॥7॥ वाचनात नाही गोडी । वेद पुराणे नाही वाचिली ॥ शुध्दता नाही लिखाणी । अर्थ न कळती दृश्याची ॥8॥ प्रत्यक्ष घडले जीवनी । स्फूरण होई मनी ॥ लिखाण झाले कागदी । गुरु पदे कांही ॥9॥ अदृश्य सृष्टी दृश्य दिसती । प्रेरणा देती लिखाणाची ॥ आश्चर्य हे जीवनी । कवित्वाची केली उत्पत्ती ॥10॥ गुरू कृपा ही निश्चिती। नवल वाटे माझे मजसी ॥ गुरू प्रेरणे आनंद मनी । धन्यता वाटे मनी ॥11॥ मन चंचल अति । चुका होती किती तरी ॥ मार्गदर्शन गुरूचे जरी। मलिनता मनी भारी ॥12॥ गुरू संदेशे जीवनी । मुक्ती निश्चित याचि देही ॥ संदेह विकल्प मनी । चुका अनेक चंचल मनी ॥13॥ गुरूभक्ती पडता कमी । जगणे व्यर्थ जगी ॥ पुन: चूक होण्या आधी । मरण बरे जगी ॥14॥ ऐसा विचार सतत मनी । मन बेचैन भारी ॥ श्री व्यंकटेश स्तोत्र पठणी । दृश्य एक श्री दत्त मंदिरी ॥15॥ शंकर गण उभे समोरी । माझेच रुप अदृश्य सृष्टी ॥ बसविले त्यांचे जवळी । लिखाण करविले माझेकडूनी ॥16॥ मथितार्थ त्या समयी । मृत्यू नाही आजी ॥ लिखाण करी आधी । गुरु जीवन या जगी ॥17॥ प्रेरणे त्या दृश्यासी । पूर्ण झाली पहिली प्रचिती ॥ निमित्त मात्र असे कोणी । प्रेरणा पूर्ण गुरुची ॥18॥ अनुभव क्षणोक्षणी । वाहक असे त्यांचा मी ॥ भाषा दोष माझे जरी । प्रेरणा गुण त्यांचेचि ॥19॥ इच्छा मात्रे सृष्टी निर्मिती । इच्छा मात्रे चाले सृष्टी ॥ प्रेरणा शकुन संमती । वृत्तांत दिला लिखाणी ॥20॥ बुध्दी असतां कोती । वृत्ती नाही तैसी ॥ प्रेरणा अचूक मुद्दी । स्मरण निश्चित क्षणी ॥21॥ प्रेरणा ऐसी क्षणोक्षणी । क्रम कैसा लिखाणी॥ कथा असावी कोणती । काय बोध त्या कथेसी ॥22॥ ऐसी गुरुची लीला । अगाध आहे जाणा ॥ रमू दे त्यातच मला । वर्णण्या गुरू लीला ॥23॥ योग्यता नसतां कांही । अगाध शक्ती गुरूची ॥ गुरू उपकार अति । अश्रू येती नयनी ॥24॥ संसार पक्का मनी । बैठक ती उंटावरची॥ आस्थिंरता त्या बैठकी । चंचल मन संसारी ॥25॥ उंटाच्या एक एक पदी । बदले ास्थिंती स्वाराची ॥ संसारी एक एक क्षणी । विचले मन विचारी ॥26॥ मन करी ास्थिंर । गाऊ दे गुरू - गान ॥ लागो एकचि ध्यास । शरण गुरूचरणा ॥27॥ येता भानू उदया । नाही स्थान अंधकारा ॥ संदेही विकल्पी मना । संपवी गुरूकृपा जाणा ॥28॥ अशक्य ते शक्य । गुरूकृपे होई शक्य ॥ अशक्य संतती पुत्र । गुरूकृपे होई पुत्र ॥29॥ अशक्य पद्य रचना । शक्य करी गुरूकृपा ॥ अशक्य स्फुरण प्रेरणा । शक्य करी गुरुकृपा ॥30॥ दृश्य सृष्टीहून अदृश्य । सृष्टी मोठी जाण ॥ योजना असे तेथ । सिध्द पुरुषाजवळ ॥31॥ योजना सिध्द पुरुषांची । एक एक आत्मा कार्यासी ॥ जन्मा पाठविती पृथ्वीवरी । सोबत कार्य निश्चिती ॥32॥ ऐशा योजने जगी । सत्पुरुष येती कार्यी ॥ बोलती स्पष्ट शब्दी । खंबीरता त्यांचे जीवनी ॥33॥ 'आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ॥ बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया' ॥34॥ ऐसे सत्पुरुष कार्य । अवताराचे ते कार्य ॥ ते तेज ब्रह्म जाण । सोने शंभर नंबरी जाण ॥35॥ घराण्यात ज्या जन्म । त्याचे वर्णन कैसे जाण ॥ समर्थ रामदास जन्म । तेवीस पिढया होते तप ॥36॥ तैसेचि गुरुकुल वंशी । उपासना परमेश्वराची ॥ मधला पुत्र प्रत्येक पिढी । दत्तमार्गी ब्रह्मचारी ॥37॥ पिता दत्तात्रेय नामी । वेद पठण नित्य घरी ॥ अमृत वंश वृक्षी । ब्रह्म फळ येई ॥38॥ योजना सनकादिकाची । जन्म त्या वंशी ॥ आनंद लक्ष्मीबाई मातेसी । कुल उध्दरण्या पुत्रा शक्ती ॥39॥ जन्म होता पृथ्वीसी । रेखा ब्रह्मदेवाच्या, ललाटी ॥ जीवनी क्षणाक्षणा निश्चिती । कार्याची शिदोरी जवळी ॥40

 

Sadguru Vishnudas Maharaj