Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 31
कोठे उत्कृष्ठ उपासक ठाऊकी । गुरुंनी जाऊनी अंतरी । अल्सरी हात फिरवूनी । नष्ट केले अल्सरासी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ नाही ज्ञान नाही भक्ती । सिध्दी कशी सांगा तुम्ही ॥ सिध्दी असती गुरु अंगी । ही प्रचिती कितीतरी ॥1॥ सिध्दी म्हणूनी त्यांची । नाही पाहिली महती ॥ सिध्दी स्वरुपी गुरुंची। प्रचिती पाहू इच्छा मनी ॥2॥ अठरा सिध्दी नांदती । गुरु सामर्थ्य कलियुगी ॥ अष्ट श्रेष्ठ महासिध्दी । दहा असती गुणजन्य सिध्दी ॥3॥ पाच असती क्षुद्रसिध्दी । अवगत असती योगीयासी ॥ आणिमा महिमा लघिमा तिन्ही । या देहा संबंधी सिध्दी ॥4॥ अणिमा अति सूक्ष्मरुपी । तन्मात्रा ध्यानी होते प्राप्ती ॥ विश्वरुप आत्मा ध्यानी । महत्स्वरुपी महिमा सिध्दी ॥5॥ अणिमा पंचमहाभूत सूक्ष्मरुपी । महिमा पंचमहाभूत महत्रुपी ॥ लघिमा धारण लघुरुपी । देह सिध्दी योगे प्राप्ती ॥6॥ आत्मा नियंता होता इंद्रियासी । प्राप्त होते प्राप्तनामक सिध्दी ॥ ही असे चवथी सिध्दी । इंद्रियासह तत् विषय प्राप्ती ॥7॥ प्राकाश्य शृत दृष्टता पाचवी । परलोकातील ज्ञान त्यातूनी ॥ सहावी प्रभूता सिध्दी । जडजीवावर सत्ता त्यांची ॥8॥ ईश गुणधर्म वश होती । ती सातवी वशिता सिध्दी ॥ ऐच्छिक सुखाची होई प्राप्ती । कामपूर्ती सिध्दी आठवी ॥9॥ अष्ट सिध्दी या असती । महासिध्दी म्हणती त्यासी ॥ दहा गुणजन्य सिध्दी । क्षुधा तृषादि षट्उर्मी ॥10॥ कदा न पिडीती शरीरासी । ती 'अनुर्मि' प्रथम सिध्दी ॥ दुसरी दूर श्रवण सिध्दी । दूरदर्शन तिसरी असे ॥11॥ मनो वेगे जाई इच्छित स्थळी । ती मनोजव चवथी सिध्दी ॥ इच्छित रुप धारण करी । ती कामना सिध्दी पांचवी ॥12॥ सहावी परकाया प्रवेश सिध्दी । सातवी इच्छामरण सिध्दी ॥ आठव्या द्वारे ईश क्रीडा दर्शन होई। देवासह करिती क्रीडा प्रत्यक्ष ॥13॥ नववी संकल्प सिध्दी । दहावी निरंकुश आज्ञा सिध्दी ॥ पंच असती क्षुद्र सिध्दी । पहिली त्रिकालज्ञ सिध्दी ॥14॥ शितोष्णादि द्वद्वी सत्ता द्वितीयी । पर चित्त विचार जाणती ॥ ही तिसरी क्षुद्र सिध्दी । अग्नि, वायु, उदक, विष ॥15॥ परिणाम न करी शरीरावर । ही स्तंभन नामक चवथी जाण ॥ पाचवी अजिंक्यता नामक । सर्वत्र असे अपराजित ॥16॥ श्रीमद् भागवती श्रीकृष्ण संवादी । उपदेश केला उध्दवासी ॥ सिध्दी हा धाेंडा म्हणती । अडथळे ते अध्यात्मी ॥17॥ आड येती देवरुप प्राप्तीसी । मोक्षकाल जातो दूरी ॥ लागू नये सिध्दीचे नादी । ही पथ्य असे मुमुक्षूसी ॥18॥ सर्व सिध्दी गुरुपदी । उपयोग न त्याचा क्षणोक्षणी ॥ देखावा नाही कांही । उपासक मी, गुरु म्हणती ॥19॥ प्रशांत महासागरी । खळखळाट नाही कांही ॥ खळखळाट उथळ पाण्यासी खोल पाण्या नाही कांही ॥20॥ गुरु दत्तवाडीसी असूनी प्रत्यक्षी । विजु आवदेला घरी ॥ पडू न दिले पायऱ्यावरुनी । उतरविले कडेवर घेऊनी ॥21॥ नागोराव पंच अनुभूती । म्हातारा होऊनी गुरुनी ॥ सामान ठेवले मोटारी । रुप बदलण्या शक्ती ॥22॥ भांबेरीकर मानकरासाठी । हमाल श्रीपादासाठी ॥ गुरु साडेतीन हाती । शक्ती त्यांची सर्व व्यापी ॥23॥ कोणी म्हणती गुरु ही व्यक्ती । शक्ती एकवटलेली त्या देही ॥ समजू नका तुम्ही व्यक्ती । तिथे कार्या सर्व देव शक्ती ॥ 24॥ शक्ती संचय त्या देही । अद्भूतता दिसे अनुभवी ॥ अगाध लीला त्यातूनी । अनुभूती अनेक शिष्यासी ॥25॥ ज्ञानी शिष्य बीडकरासी । ''आले काय '' विचारिती परगांवाहूनी ॥ फाटक उघडता दत्तवाडी । शब्द पडले बीडकरा कानी ॥26॥ गुरु नसता दत्तवाडीसी । शब्द कोठुनी आले म्हणती ॥ 'होय' उत्तर दिले त्यांनी । गुरु व्यापक अनुभूती ॥27॥ महादेव नळकंडेसी । गुरु नसता मठासी ॥ स्नान करण्याचा ध्वनी । मंत्र शब्द पदनाद कानी ॥28॥ राहूनी गुरु दत्तवाडीसी । दृश्य अनेक गुरु दृष्टी ॥ ऐकती गुरु शब्दासी । हा अनुभव कित्येकासी ॥29॥ ऐसी शक्ती ज्याचे जवळी । त्या मनी तळमळ भारी ॥ करविती शिष्याची प्रगती । करविती उपासनेसी ॥30॥ संकल्प वर्णन कोण करी । कार्य चाले संकल्पी ॥ दत्तवाडी क्षेत्र निर्मिती । ही पूर्ण संकल्प सिध्दी ॥31॥ अनुष्ठान जे दत्तवाडीसी । गुरु संकल्पे चालती ॥ पूर्ण होती गुरु संकल्पी । पर्जन्य निश्चित संकल्पी ॥32॥ दत्तजयंती उत्सवी । पर्जन्य येतो कधी कधी ॥ गुरु संकल्प एक साली । टीन मंडप उभारण्यासी ॥33॥ भव्य खांब त्या साली । भव्य हॉल दिसे दृष्टी ॥ थक्क झाले पाहूनी । गुरु संकल्पी ही शक्ती ॥34॥ अनंत चतुर्दशीसी । ताडपत्री मंडप मनी ॥ उभा झाला तसाचि । मोठे घरच गुरु संकल्पी ॥35॥ सिध्दी अनुभव ज्याचे त्यासी । मती माझी मंद अति ॥ वर्णन कसे सांगा तुम्ही । तुम्ही ठरवा घटना सिध्दी ॥36॥ दोन ताप गुरु शरीरी । मुरलीधर पाटील दर्शनासी ॥ चर्चा चालली अखंडी । आवाजी न कळले कोणासी ॥37॥ दोन ताप असूनी । चार तास चर्चेसी ॥ आली कोठूनी शक्ती । मन सामर्थ्य निश्चिती ॥38॥ ही व्यक्तीगत अनुभूती । जाहीर अनुभूती सर्वांसी ॥ सर्व शरीर शक्ती । कमी झाली आजारानी ॥39॥ त्राण नव्हता काही । ठरले कीर्तन आकोल्यासी ॥ शब्द सर्व शिष्य मुखी । ठरविले कसे कीर्तनासी ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj