| अध्याय क्र. 23
|
 |
वाजंत्री त्या कार्यक्रमी । गुरु स्वागत केले त्यांनी ॥ गुरु येता घरी । पुत्र ठेवीती चरणी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ अशक्य ते शक्य । गुरुकृपे होय शक्य ॥ अशक्य पुत्र संतान । गुरुकृपे पुत्र रत्न ॥1॥ गुरुनाथ दर्शन । शिष्य मानती योग थोर ॥ जीवन आपुले सफल । झाले म्हणती आज ॥2॥ गर्भ काय दर्शन घेऊन । पोथी वाचून मिळे कां पुत्र ॥ यज्ञाने राहिल कां गर्भ । ऐकले नाही म्हणती आजवर ॥3॥ टीकाकाराचे न धरवे तोंड । प्रश्न आम्हास कां न पुत्र ॥ श्रध्दा न तेवढी गुरुवर । पुत्र नाही तुम्हास ॥4॥ एकही वस्तू न मिळे मोफत । प्रत्येका पूर्ण दाम जरुर ॥ थोडेही दाम कमी जर । वस्तू न दे दुकानदार ॥5॥ जन्मोजन्मीचे देणेदार । त्यांना चुकवण्या गुरु तयार ॥ वस्तू आणिती तेथून । निष्ठा पाहिजे गुरुवर ॥6॥ श्रध्दा वाढण्या मनात । निष्ठा होण्या बलवान ॥ उपासना एक उपाय । सातत्य पाहिजे उपासनेत ॥7॥ उपासना करी सर्व । पहिल्या वर्गात टाकता नांव ॥ त्यातून तो पास होत । पदवीधर होई त्यातून ॥8॥ सुरु करिता उपासनेस । प्रगती होते त्यातून॥ इच्छा फल त्यातून । मार्गदर्शन मिळे सहज ॥9॥ ऐसा अनुभव ज्यास । तो कोठेही करेल अनुष्ठान ॥ सर्वाभूती परमेश्वर । मनाचेच असे हे कार्य ॥10॥ अनुभूती हे जीवन । मिळे ते उपासनेतून ॥ सेकंदा सेकंदा मार्गदर्शन । ऐशा मनाची जरुर ॥11॥ एक अनुभव प्रत्यय । सांगती चर्चेत शिष्यास ॥ गाणगापूर तीर्थक्षेत्र । आला एक संन्याशी तेथ ॥12॥ फाटके कपडे अंगावर । उपाशी दोन दिवसापासून ॥ बसला एका कोपऱ्यात । कोणी न विचारिले त्यास ॥13॥ पालखी समयी शिष्य गर्दीत । प्रेरणा मंदिर प्रमुखास ॥ प्रश्न 'जेवायचे कां तुम्हास' । उत्त्तर 'उपाशी दोन दिवसापासून ॥14॥ 'भोजन करा आज' । उत्तर 'स्नान न केले आज' ॥ जेवण नाही स्नानावीण । स्नान रात्री अशक्य' ॥15॥ नदी पात्र दूर । रस्त्यात दगड अंधार ॥ झोपा म्हणती येथ । झोपले रात्री मंदिरात ॥16॥ निकड कामाची म्हणून । बोलावू आले प्रमुखास ॥ निघून गेले तेथून । एकटा संन्याशी तेथ ॥17॥ पुजारी आले तेथ । हाकलून लावले तेथून ॥ स्नाना गेला संगमात । अनुष्ठान आरंभिले तेथ ॥18॥ स्वप्न मंदिर प्रमुखास । बोलवा मंदिरी संन्याश्यास ॥ आला पुजारी संगमास । मंदिर प्रमुखाचा निरोप घेऊन ॥19॥ तैसेचि करण्या मार्गदर्शन । झोपले असतां रात्रीस ॥ स्वप्न झाले संन्याशास । जा तुम्ही मंदिरात ॥20॥ येई उपासने अनुभूती । अनुभव सांगती शिष्यासी ॥ अनुभूती संबंध मनासी । संबंध नसे स्थान पोथीसी ॥21॥ उदाहरण सांगती त्यासी । प्रसिध्द अति टेंबे स्वामी ॥ दिगंबरा दिगंबरा भजनी । साक्षात्कार घडले कितीतरी ॥22॥ अनेक भक्तांची ास्थिंती । पारायणे केले कितीतरी ॥ साक्षात्कार नाही कांही । मन आस्थिंर कारण मुख्यचि ॥23॥ मन बैठक उपासनेसी । प्रगती तुमची त्यातूनी ॥ कर्म फल मिळे त्यातूनी । ऐसा उपदेश शिष्यासी ॥24॥ गुरु शक्ती अनुभूती । येते नम्र शिष्यासी ॥ मार्ग दाखविती शिष्यासी । तपफल गुरु कृपेचि ॥25॥ वाढवूनी इच्छा शक्ती । पुत्रफल शिष्यासी ॥ सांगण्या वृत्तांतासी । प्रेरणा मार्गदर्शन पूर्ण ॥26॥ क्रम जो चालला आजवरी । त्यात न माझे काही ॥ मार्गदर्शन क्षणोक्षणी । गुरूकृपेचे फल हेच ॥27॥ राजाभाऊ जोशी नामी । शिष्य एक वानखेडासी ॥ पाच बंधू शेती घरी । शालिनी पत्नी त्यांची ॥28॥ घरची ास्थिंती चांगली । शिक्षक पेशा जीवनी ॥ वीस वर्षे झाले लग्नासी । संतती नव्हती काही ॥29॥ पुत्र पाहिजे घरी । वंश दीपाची जरुरी ॥ समाधान नसे मनी । डॉक्टरांचे न चाले काही ॥30॥ चिंता अनेका मनी । पुत्रावाचून सर्व व्यर्थचि ॥ निपुत्रक दोष मानती । नवस सायास देवासी ॥31॥ नम्र भावे गुरुसी । शरण जाती निष्ठेनी ॥ त्यांना यश निश्चिती । हा अनुभव शिष्यासी ॥32॥ राजाभाऊ एक दिनी । लग्ना गेले भांबेरीसी ॥ परत जाता घरी । दर्शना आले मठासी ॥33॥ इच्छा पुत्र प्राप्तीची । प्रश्न केला गुरुसी ॥ उपाय सांगा यावरी । इच्छा पूर्ण होण्यासी ॥34॥ गुरु विचारिती प्रश्नासी । बेचाळीस रुपये दुकानी ॥ चुकविले कां तुम्ही । होय उत्तर त्यासी ॥35॥ पैसे चुकविता क्षणी । औषध घेणारा तुमचे जवळी ॥ उभा होता कां दुकानी । उत्तर होय त्या प्रश्नासी ॥36॥ बैलाचा पाय पडूनी । जखम असे त्याचे पायी ॥ उपाय चालू त्यावरी । ऐसे स्पष्टीकरण त्यासी ॥37॥ गुरु असती मठासी । घटना त्या वानखेडी ॥ अंतर्दृष्टी ही कशी । अंतज्र्ञाने कळले सर्व ॥38॥ आश्चर्य वाटले राजाभाऊसी । श्रध्दा जडली गुरुवरी ॥ विकल्प न राहिला मनी । अपार शक्ती गुरुंची ॥39॥ श्रध्दा पाहूनी शिष्याची । गुरु म्हणती त्यासी ॥ तुमचे होईल कार्यासी । उपाय सांगतो त्यावरी ॥40॥
|