Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 22
गुरुचरित्र चौदावा अध्यायी । अनुष्ठान करा तुम्ही ॥ नित्य चौदा वेळी । चौदा दिवस वाचा तुम्ही ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्रध्दा असो किती । याचा विचार नाही ॥ परमेश्वर शक्ती अशी । तो देतो सर्वांसी ॥1॥ श्वासोश्वास घेण्यासी । मुक्तपणा जगी ॥ देणे विशाल अंत:करणी । ईश धर्म तोचि ॥2॥ श्रध्दा असते प्रत्येकाची । श्रध्दावान म्हणावे कोणासी ॥ धनवान कोण जगी । प्रत्येका जवळ धन काही ॥3॥ निर्धन नाही कोणी । तो धनवान व्यवहारी ॥ पांच, दहा, लाख जवळी । धनवान तो आपुल्यापरी ॥4॥ श्रध्दावानाची तीच गती । श्रध्दा पांच, दहा मिनिट मनी ॥ तास, दिवस अखंड कोणाची । श्रध्दावान ते ठरती सर्व ॥5॥ परमेश्वर मोठा त्याहूनी । श्रध्दा विचार सोडूनी ॥ अखंड देतो सर्वांसी । विशालत्व ईश अंगी॥6॥ देणे श्रध्देपरी भक्तासी । विशालत्व होते त्यात कमी ॥ गुरु देती किती पटींनी । हिशोब नाही त्याचा कांही ॥7॥ गुरुजवळ अगाध शक्ती । तुम्ही घ्या कांही त्यातूनी ॥ गंगा आली तुमचे घरी । त्यातून घ्या यथाशक्ती ॥8॥ विहिरीत पाणी कितीतरी । ओढतो जितकी असते शक्ती ॥ अथांग गुरुशक्ती । भक्त ग्रहण करी यथाशक्ती ॥9॥ अपेक्षा पूर्तीसाठी । श्रध्दा असे आपुली ॥ निष्काम श्रध्दे मिळे सर्वही । अपेक्षेत फलश्रुती कटकटी॥10॥ गंगावन तोटक्या केसासी । पावडर कुरुप चेहऱ्यासी ॥ सापेक्ष श्रध्दा अपेक्षा पूर्तीसी । श्रध्दा नसे ती खरी ॥11॥ अपेक्षा अर्ज लिहीण्यासी। श्रध्दा कागद जरुरी ॥ इच्छा, अपेक्षा पूर्तीची । श्रध्दा नसे ती खरी ॥12॥ अपेक्षा रहित श्रध्दा खरी । त्याचे फल मिळे केव्हाही ॥ इच्छा, प्राण, निर्धार शक्ती । मिळे काही अदृश्य सृष्टीतुनी ॥13॥ त्रिविध शक्ती गुरुजवळी । भक्तासी साहाय्य त्यातूनी ॥ शक्ती वाढविण्या मनी । उपाय सांगती भक्तासी ॥14॥ भक्त कार्य कितीतरी । साधले गुरु मार्गदर्शनी ॥ ऐसे वृत्तांत काही । ऐकु आपण या अध्यायी ॥15॥ अगाध ती गुरुशक्ती । नुसत्या शब्दे फल प्राप्ती ॥ अनेक भक्तांना अनुभूती । होईल म्हणता कार्ये झाली ॥16॥ कोणाला तीर्थ अंगारा देऊनी । कोणाला जप सांगूनी ॥ कोणाला प्रदक्षिणा सांगती । कोणा अध्याय पठणासी ॥17॥ भक्त कार्य ऐकता क्षणी । उपाय कोणता त्यासी ॥ निश्चित परिणाम समोरी । कळे गुरुसी अदृश्यी ॥18॥ कळे फलश्रुती काळही । श्रध्देवरी त्याची गती ॥ निर्धार शिष्या मनी । फल निश्चित समयी ॥19॥ चंचलता शिष्या मनी । चंचलता फल कार्यासी ॥ दृढ श्रध्दा गुरु शब्दी । फल त्याचे लवकरी ॥20॥ कोल्हटकर जळगांवी । पत्नीस स्वप्न एक दिनी ॥ गुरु आणि दत्त दोन्ही । सांगती संदेश स्वप्नी ॥21॥ श्री गुरु चरित्र पोथी । हा प्रसाद देतो तुम्हासी ॥ भेटा मजला दत्तवाडीसी। तेल्हारा मठासी या तुम्ही ॥22॥ स्वप्न सांगता त्यांनी । गुरु देती प्रसाद पोथी ॥ परत जाता आनंद मनी । धन्यता अनुभविली मठासी ॥23॥ तीन प्रमुख घटनांसी । पाहू या अध्यायी ॥ नाना पाटील पत्नीची । सुरु केली नाडी माहुरासी ॥24॥ त्यांचे बहीण जावाई । वसंत रामचंद्र लोखंडे नामी ॥ घर त्यांचे करंज ग्रामी । नायब तहशीलदार असती ॥25॥ प्रामाणिक तुम्ही कितीही । तारतम्याची जरुरी ॥ ढील सोडता थोडी । फायदा घेती लोक जगी ॥26॥ अध्यात्मी व व्यवहारी । जपणे असे जरुरी ॥ अति दुसऱ्यावरी विश्वासी । त्याची होते फजिती ॥27॥ कार्यालयीन घोटाळयाचा झणी । आळ आला लोखंडेवरी ॥ काय करावे प्रश्न समोरी । एक गुरुवाचूनी नाही कोणी ॥28॥ सविस्तर वृत्तांत गुरुसी। निवेदन केला त्यांनी ॥ गुरु मार्गदर्शन त्यासी । चिकाटीची असे जरुरी ॥29॥ गुरु सांगती लोखंडेसी । स्वत: करावे पठणासी ॥ जिव्हाळा ज्यांचे मनी । त्यानीच करावे पठणासी ॥30॥ पतीसाठी पत्नी । माता पित्यासाठी पुत्र पुत्री ॥ पत्नीसाठी पती । चाले संकट निवारण्यासी॥31॥ अंत:करण मन संवेदनी । निर्माण होती लहरी ॥ कार्य करिती त्या जाऊनी । आदळती त्या कार्यासी ॥32॥ प्रबल इच्छा शक्ती । प्राण शक्ती ओतूनी ॥ निर्धार शक्ती निर्मिती । कार्य होई सहज गती ॥33॥ चित्र गुरु समोरी । कार्य होईल निश्चिती ॥ गुरुचरित्र पोथीमध्यी । चौदावा अध्याय संकटी ॥34॥ चौदा वेळ नित्य पठणी । चौदा दिवसाचे मंडल जरी ॥ छत्तीस हजार पठणासी । तुमच्या कार्या जरुरी ॥35॥ दोन हजार पूर्ण होताचि । कार्या सुरवात हळुवारी ॥ अनुकूलता अनुभूती । येईल तुम्हासी त्यावेळी ॥36॥ मन प्रबल ज्या प्रमाणी । कार्य सुकर त्या प्रमाणी ॥ योग्य काली फल प्राप्ती । सुरु करा पठणासी ॥37॥ योग्य मुहूर्ती त्यांनी । सुरु केले पठणासी ॥ चौदावा अध्यायाची । पूर्ण केली हजार आवर्तने ॥38॥ निराशा गेली दूरी । बल वाढले मनी ॥ सांगु या अधिकाऱ्यासी । दोष न आपला कांही ॥39॥ सांगता अधिकाऱ्यासी। चौकशी झाली कांही ॥ लोखंडे जरी त्या खाती । आरोपी न केले त्यासी ॥40॥ दोन्ही गुन्हयाची चौकशी । आरोप न त्यांचे नांवी ॥ निकाला अंती दुसरी कोणी । सापडली गुन्हेगार व्यक्ती ॥41॥ मन बल वाढवूनी । सोडविले आरोपातूनी ॥ बदली व्हावी वाटले त्रासांनी । बदली झाली त्यांची ॥42॥ बढती झाली लोखंडेची । नोकरी जाण्याची टळली पाळी ॥ ऐसा अनुभव लोखंडेसी । पठण सुरु असे अजूनी ॥43॥ मना शक्ती मिळे त्यातूनी । ऐसे सांगती निर्धारी ॥ गुरु मार्ग दर्शनी । अदृश्य सृष्टी कार्यासी ॥44॥

 

Sadguru Vishnudas Maharaj