Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 11
महादेवाने न देखता गुरुसी । स्वप्नी आले एक दिनी ॥ जटाधारी रामदासापरी । दर्शन दिधले स्वप्नी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ प्रभुराम अवतार कार्यी । जन्मा आले प्रथम रघुरायी ॥ लक्ष्मण जन्मले नंतरी । हनुमंत आले त्यांचे कार्यी ॥1॥ कृष्णा जन्मा आधी । बळीराम आले भूमीवरी ॥ शिष्य इष्ट मित्रही । जन्मा आले योजनेनी ॥2॥ प्रत्येक अवतार कार्यी । योजना अदृश्य सृष्टीची ॥ कार्या इष्ट व्यक्तीसी । जन्मा पाठविती भूमीवरी ॥3॥ योग्य वेळ जन्माची । कार्य होते त्या वेळी ॥ शत्रू भक्त दोन्हीही । जन्मा येती त्याच वेळी ॥4॥ संबंध त्याचा कोठेतरी । जन्मोजन्मीची शिदोरी ॥ संबंध या जन्मी । फल असे पूर्व कर्मी ॥5॥ शत्रुत्व पूर्व जन्मी । त्रास देण्याची वृत्ती ॥ कर्मे त्यांची त्यांनाचि । नष्ट करिती खचितचि ॥6॥ मित्रत्व पूर्व जन्मी । सेवा करिती या जन्मी ॥ कृपा मिळविती गुरूची । पट्ट शिष्य गणना त्यांची ॥7॥ अवतार कार्या पाठविती । अनेक जन्माचे सोबती ॥ गुरू आहेत अवतारी । पाठविले अनेका भूमीवरी ॥8॥ इतरांची योग्यता कमी । विसरती आपुले कार्यासी ॥ गुरू प्रेरणा प्रत्येकासी । कार्या लावती योग्य वेळी ॥9॥ निमित्त भिन्न प्रत्येकी । शिष्य केले योग्य व्यक्तीसी ॥ पूर्व जन्म संचितासी । फल देती या जन्मी ॥10॥ कोणत्या जन्माचे कर्मासी । फल येती कोणते जन्मी ॥ सोपे न हे सांगण्यासी । गुरूकृपे फल या जन्मी ॥11॥ तळमळ साक्षात्काराची। आर्तता अंत:करणी ॥ फल तेचि या जन्मी । शिष्य करिती गुरू त्यासी ॥12॥ कोण्या जन्मी कोणती । सत्कर्म कर्म विपाकी ॥ कळते अनेक जन्माची । गुरूसी भक्त कुंडली ॥13॥ बीडकरा प्रेरणा देऊनी । आणिले भांबेरी ग्रामी ॥ शिष्य केले बीडकरासी । पूर्व जन्म फल प्राप्ती ॥14॥ लोखंडकार शिष्यासी । स्वप्न प्रेरणा देता क्षणी ॥ सेवा करण्या बोलाविती । जन्म सार्थक या जन्मी ॥15॥ असे अनेक शिष्यासी । हेरून या भागी ॥ आकर्षिले त्यांना गुरूंनी । पूर्व जन्म कर्म फल ते ॥16॥ प्रत्येक शिष्या वाटते ऐसेचि । गुरू भेटी झाली कैशी ॥ चमत्कार वाटतो प्रत्येकासी। सोडिती सार्थकतेच्या श्वासासी ॥17॥ कोण कोण आले या कार्यी । गुरूसी ज्ञान सर्वही ॥ प्रेरणा देऊनी योग्य समयी । शिष्य करिती त्यासी ॥18॥ कोणाजवळ कोणती । सूक्ष्म द्रव्य असती ॥ कोणाची प्रगती किती । होईल हे कळते गुरूसी ॥19॥ योग्य समय येण्यासी । कसे वागावे कोणासी ॥ आर्तता वाढवूनी शिष्याची । देती गुरू मंत्रासी ॥20॥ कोणता मंत्र देऊनी । प्रगती होईल शिष्याची ॥ परंपरा कोणती त्याची । हे कळते गुरूसी ॥21॥ भांबेरी ग्रामी काही । शिष्य असती थोडेचि ॥ अध्यात्म प्रगती त्यांची । व्हावी ऐशी इच्छा गुरूंची ॥22॥ असती शिष्य गांवोगांवी । तळमळ असे ज्यांचे मनी ॥ उपासनेवरी असे प्रीती । साक्षात्काराची आर्तता मनी ॥23॥ निवड ऐशा शिष्याची । गुरू स्वयं करिती ॥ येतील या मार्गी । ऐसे गुरू सांगती ॥24॥ ऐसे शिष्य वृत्तासी। सांगावे वाटते मनी ॥ डॉक्टर देशपांडे सुमंतरावनामी । तेल्हारा ग्रामी असती ॥25॥ शेषराव विश्वनाथ नामी । शिक्षणा आले तेल्हारी ॥ घरची होती गरिबी । पार केली अकरावी ॥26॥ प्रवेश मिळाला आयुर्वेद शाळी । वैद्य झाले ते सहजचि ॥ वैद्यकीय व्यवसायासी । तेल्हाऱ्यावरी प्रीती ॥27॥ त्रिविध तापे तापती । तेचि होती अधिकारी ॥ ऐशी अनुभूती परमार्थी । कळते प्रत्येक शिष्यासी ॥28॥ शरीर स्वास्थ्य तैसेचि । आर्थिक ताण अति । संसारी सर्व जबाबदारी । करी त्यावरी येते सर्व ॥29॥ न दुखवावे कोणाचे मनासी । ऐसा विचार ज्याचे मनी ॥ त्याचे मना ताण अति । हा अनुभव घरोघरी ॥30॥ आजोळ ज्यांचे वानखेडी। बाबा म्हणती मामासी ॥ त्यांची निष्ठा गुरूवरी । येती कधी दर्शनासी ॥31॥ एक दिवस सहजचि । आले दर्शना वानखेडहूनी ॥ गेले गाडेगाव मठासी । बैसले गुरू जवळी ॥32॥ वानखेडकर म्हणती गुरूसी । डॉक्टर माझा भाचा जरी ॥ गोडी नाही इकडची । काय उपाय यासी ॥33॥ गुरू म्हणती बाबासी । टिपले मी कालचे स्वप्नासी ॥ दाखवितो मी तुम्हासी । इकडे येईल भाचाही ॥34॥ गुरूंच्या त्या स्वप्नी । गर्दी होती एका जागी ॥ डॉक्टर होते त्यामध्यी । गर्दीतून आले दर्शनासी ॥35॥ गुरूसी कळले त्या स्वप्नी । डॉक्टर देशपांडे कधीतरी । या समाज गर्दीतूनी। येतील शिष्य होण्यासाठी ॥36॥ चमत्कार आश्चर्य हेचि । त्याच दिनी डॉक्टर दर्शनासी ॥ मामा सांगती भाच्यासी । गुरू स्वप्न वाचले आजी ॥37॥ कांही न कळले इतरांशी । स्वप्न परिणाम डॉक्टरावरी॥ आत्मियता वाढली थोडी । ध्यास लागला काही ॥38॥ स्वप्न त्यांना एक दिनी । गुरू आले त्यांचे घरी ॥ प्रसाद दिला गुरुंनी। वाटावया सांगती सर्वासी ॥39॥

 

Sadguru Vishnudas Maharaj