Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 21
गुरु स्वागत मुख्य कार्यी । व्रतबंधन समाधान मनी ॥ मनोरथ पूर्ण झाल्याची । प्रसन्न वृत्ती सर्वांची ।


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ अनुभवे कळले ज्याचे त्यासी । गुरूनाथ पूर्ण ब्रह्म असती ॥ ज्याची श्रध्दा असे जैसी । तैसी येते त्यासी प्रचिती ॥1॥ चर्चेमध्ये आवड गुरूसी । इच्छा तीव्र एक मनी ॥ प्रगती व्हावी शिष्याची । शंका न रहावी कोणती ॥2॥ शिष्य प्रश्न एक दिनी । पोथी वाचतो नित्य जरी ॥ एकाग्रता नसे पठणी । अन्य विचार कां मनी ॥3॥ उत्तर नवीन शिष्यासी । क्रम चालू ठेवा तुम्ही ॥ सवय करा एकाग्रतेची । हळूहळू एकाग्रता चित्ती ॥4॥ उत्तर परिचित शिष्यासी। तुम्हा गरज न वाटे एकाग्रतेची ॥ निकड न वाटे अध्यात्माची । आवड नसे ईश्वराची ॥5॥ अन्य विचारांची आवडी । विचार सतत ते मनी ॥ पोथी वाचता न जाती ॥ विचार ते डोक्यातूनी ॥6॥ चिंता व अन्य विचारी । आवरण असे भोवती ॥ कडे त्याचे आपल्यासी । सहज येती विचार ते ॥7॥ जीवनी मनोनिग्रह असावा कांही । उद्योग विचार उद्योग समयी ॥ त्याची न अन्य वेळी जरूरी । ऐसी सवय नाही जीवनी ॥8॥ म्हणूनी एकाग्रता होत नाही । अन्य विचार पोथी समयी ॥ जे असती सतत मनी । ते जाण्या अभ्यास जरुरी ॥9॥ बोलत असता एक दिनी । मी सांगीतले गुरुसी॥ दृश्य जे दिसले गजाननसी। कोठे दिसले ते विचारिती ॥10॥ गुरू देती उत्तरासी । देव दिसले काय माडीवरी ॥ ते दिसले कां रस्त्यावरी । स्थळ बंधन न दृश्या कांही ॥11॥ जशी माडीवर माडी । मजल्यावर मजले इमारतीसी ॥ बांधती एकावर दुसऱ्यासी । अध्यात्मी प्रथा वेगळी ॥12॥ दालने अनेक अध्यात्मी । भक्त असेल ज्या दालनी ॥ दृश्य दिसती त्या दालनी । भक्त ास्थिंती कळते त्यातूनी ॥13॥ कोण कोणत्या दालनी । हे कळते गुरूनाथासी ॥ प्रगती त्याची त्यातूनी । करिती भिन्न मार्गी ॥14॥ एक मजला तोडूनी । दुसरा बांधती अध्यात्मी॥ नियती खेळ जरी । अगाध लीला गुरूंची ॥15॥ माझ्यात नाही काही । अनंत दोष रोमरोमी ॥ योगायोग भिन्नचि । आलो गुरू परब्रह्मबागी॥16॥ अगाध लीला बागेची । दालने बदलली गुरूंनी ॥ योजना ती नियतीची । गुरूंची झाली भेटी ॥17॥ गुरू परब्रह्म मूर्ती । कृपा लीला दाखविती ॥ एकाग्रता शब्दोशब्दी । गुरूकृपा खरोखरी ॥18॥ गुरूकृपा मजवरी । वर्णण्या पलिकडे सर्वही ॥ पुत्राहूनी अधिक मजसी । दिधले कितीतरी जीवनी ॥19॥ दाखविले अदृश्य दृश्यासी । मार्गदर्शन स्तोत्र मंडलासी ॥ मार्गदर्शन नित्य उपासनेसी । पुत्र दिला भाग्यासी ॥20॥ पितृगण तृप्त करूनी । दर्शन दिले गुरूंनी ॥ विष्णू महेश गणपती । दत्तमूर्तीतूनी प्रकटती ॥21॥ नाही योग्यता माझी । परी गुरूकृपेने सर्व काही ॥ वर्णण्या आनंद मनी । पुत्र जीवन गुरू कृपा ती ॥22॥ संबंध त्यात माझा जरी । ती सर्व गुरू योजनाचि ॥ निमित्त मात्र असे मी । गुरूंच्या त्या योजनी ॥23॥ आज ही उद्या ती । कोणासही घेऊनी हाती ॥ मांडती परब्रह्म खेळासी । ऐसी गुरुची अगाध शक्ती॥24॥ सार्थकता निश्चित जीवनी । वर्णण्या प्रेरणा गुरुची ॥ अनुभव गुरुचरणी । गुरुकृपा हीच खरी ॥25॥ श्री गुरु चरित्र तत्त्व आज । लोपले ब्राह्मण्य जीवनात । न वाटे कांही महत्व । यात नाही म्हणती कांही ॥26॥ प्रत्यक्ष त्यात काय शक्ती । ते दाविण्या कलियुगी ॥ एक एक प्रयोगी। प्रत्यय देती शिष्यासी ॥27॥ पुत्र प्राप्ती मजसी । जन्म वैशाख चतुर्थीसी ॥ नामकरण विधी आधी । रडणे न थांबे कांही ॥28॥ गजानन नामा संमती । रडणे थांबले अनुभूती ॥ सर्व नातलग त्यावेळी । हजर होते बारशासी ॥29॥ तब्येत बिघडली मातेची । गुरुसी संदेश भुयारी॥ पितृॠण कारण त्यासी । प्रत्यक्ष स्वप्न भगिनीसी ॥30॥ पणतु होऊनी मजसी । जेवू न घातले मला तुम्ही ॥ सरुबाई येऊनी स्वप्नी । वदली नातीला रात्री ॥31॥ गुरुनी पितृॠणासी । स्पष्ट केले स्वप्नी ॥ अन्न वस्त्र देऊनी । तृप्त केले पितरांसी ॥32॥ श्राध्द प्रथा तेथूनी । सुरु झाली घरी ॥ पितृस्थान शुध्दीसी । योजना ती गुरुंची ॥33॥ कुलदैवत गणोजा देवी । दर्शना नेता गजाननासी ॥ गुरु होते बरोबरी । जावळे विसर्जन गणोजासी ॥34॥ व्रतबंधा आधी । पुरुष सूक्त संथा गुरुमुखी ॥ प्रेरणा व्रतबंधासी । करा म्हणती आठवे वर्षी ॥35॥ गर्भधारणा दिनापासूनी । आठ वर्षे मोजा म्हणती ॥ सव्वा सात वर्षे जन्मापासूनी । योग्य व्रतबंधासी ॥36॥ तात्यांना प्रेरणा मनी । स्वत: सांगती गुरुसी॥ या वर्षीचे कपाशीतुनी । व्रतबंध इच्छा मनी ॥37॥ गुरु प्रेरणा ती । पीक अधिक त्या साली ॥ व्रतबंध सोहळयासी । व्यवस्था ती गुरुंची॥38॥ खर्च अंदाज गुरुसी । पीक तेवढे शेतामध्यी ॥ गुरु इच्छा प्रेरणेनी । कार्य केले अदृश्यी ॥39॥ तिथी गुरु संमतीनी । ठरली दत्तवाडीवरी ॥ बटूची इच्छा मनी । कीर्तन व्रतबंध दिनी ॥40॥ गुरु म्हणती त्या वेळी । करीन मी कीर्तनासी ॥ अट एक त्यात माझी । कीर्तना विरुध्द नको कोणी ॥41॥ एक जरी विरोधी । करणार नाही कीर्तनासी ॥ अट नव्हती साधी । गुरु इच्छे होणार सर्व ॥42॥ विचार सतत मनी। गुरु येणार कार्यासी ॥ प्रथम येणार कार्यी । कमी नको स्वागती ॥43॥ व्रतबंध कार्यक्रम जरी । गुरु पूजा मुख्य मनी ॥ प्रेरणा ओवळण्यासी मंदिरी । होकार सर्वांचा त्यासी ॥44॥

 

Sadguru Vishnudas Maharaj