| अध्याय क्र. 36
|
 |
पहिली गुरु पौर्णिमा । शिष्या घरी जाणा ॥श्रध्दे निष्ठे वाचून हा । योग्य येणे अशक्य पहा ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: । नवीन मंदिर निर्माण । कां केले गुरुनी येथ ॥ विचार मनात जनात । उत्तर गुरु देती त्यास ॥1॥ मंदिर ते मंदिर । नाही राहिले आज ॥ त्याचे उद्देश जनात । नाही कृतीत आज ॥2॥ स्फूर्ती स्थान ते आज । नवीन श्रध्दा केंद्र जाण ॥ निर्माण करण्या जरुर । नवीन मंदिराची जरुर ॥3॥ नवीन ग्रंथ आज । लिहिण्याची असे जरुर ॥ जुने विचारा नाही धार । नवीन विचाराची जरुर ॥4॥ काळ बदलता जगात । जुने स्पष्टीकरण व्यर्थ ॥ काळाप्रमाणे स्पष्टीकरण। तत्त्व तेच नवीन धार ॥5॥ भांडे घासता होते चक्क । तत्त्व अधिष्ठान तेच ॥ नव विचारे चैतन्य । निर्माण होते समाजात ॥6॥ त्याचीच आज नितांत । गरज असते समाजास ॥ विचारात असतां नावीन्य । नवीन भरते सामर्थ्य ॥7॥ प्रेरणा शक्ती निर्माण । केली गुरुनी आज ॥ कार्ये होतील त्यातून । त्याचेच प्रतीक जाण ॥8॥ छत्रपती शिवाजी ग्रंथ । झाला असे निर्माण ॥ कार्य त्याचे एकच । मलिनता करणे दूर ॥9॥ धर्म, संता जन । निाष्क्रिंय ठरविती आज ॥ त्याचे करण्या निरसन । अशा ग्रंथाची जरुर ॥10॥ अशा ग्रंथाचे प्रेरक । सांगा कसे निाष्क्रिंय ॥ असे त्याच्यात ओतप्रोत । समाज, राष्ट्र, देश प्रेम ॥11॥ खरे संत सत्पुरुष । त्यांचे जीवन त्यागमय ॥ स्वार्था नसे तेथे वाव । जिव्हाळा फक्त मनात ॥12॥ वृत्ती करिता नि:स्वार्थ । प्रेम त्यागे होते कार्य ॥ प्रेम त्यागातून । जगी घडला इतिहास ॥13॥ ते असे तप सामर्थ्य । सामर्थ्य घडवी कार्य ॥ अवलोकिता समर्थ कार्य। कळते दत्तवाडी कार्य ॥14॥ काळाप्रमाणे सर्व । घडते आहे कार्य ॥ ते सांगू कसे सर्व । निरिक्षणे कळेल कार्य ॥15॥ दत्तवाडी उपासना कार्य । चालू आहे अखंड ॥ भक्ती ही कशास । कळले आहे कंा भक्तांस ॥16॥ न कळलेले जन बहुत । कळले ते कृतीत ॥ आणणे आहे कठीण । त्याला लागे काळ ॥17॥ गुरु सांगती शिष्याला । कशास्तव भक्ती उपासना ॥ उपासका अंगी येण्या । तेज आणि सामर्थ्य ॥18॥ पशू नाही आपण । माणूस असू जाण ॥ आपुला दुरुपयोग । करु न शके कोणी जाण ॥19॥ ही खात्री पटण्यास । दिव्यत्व आणि सामर्थ्य ॥ करावे संपादन । व्हावे शक्तिशाली आपण ॥20॥ उपासना हेतू हाच । मुख्य असे जाण । देव मिळण्याहून । श्रेष्ठ दिव्यत्व संपादन ॥21॥ नाहीतर करिती जन । भंडारे भीक मागुन ॥ करिती वेळी अवेळी मग। सत्याची टवाळी जाण ॥22॥ वरपंगी टाळ वाजवूनी । सत्याची करिती टाळाटाळी ॥ ईश्वरा हे मान्य नाही । सामर्थ्यी हे न कांही ॥23॥ दिव्यत्व सामर्थ्य तेज । असे गुरु अंगी जाण ॥ दत्तवाडी शक्तिशाली क्षेत्र । गुरुंनी केले निर्माण ॥24॥ त्याची प्रचिती वेळोवेळी । येते अनेक शिष्यासी ॥ त्या शक्तीतूनी संचार कधी । अदृश्य शक्ती कार्य ते ॥25॥ एक गुरुवार दिनी । बसलो असता औदुंबरातळी ॥ पवमान करिता पादुकी । दर्शना आली एक बाई ॥26॥ 'अरेरे त्रास नको देऊ' । ऐसे वदली ती संचारी ॥ ''प्रेरणा देऊनी मजसी । आणिले माझे गुरुंनी ॥27॥ येथे दत्त दर्शनासी ॥ आहेत उभे ते बाहेरी॥ तुम्ही या दर्शनासी । मी घेतले दर्शनासी'' ॥28॥ अदृश्य दृश्ये पाहूनी । ती म्हणे त्या सर्वासी ॥ तुम्ही सर्व येऊनी । घ्या दत्त दर्शनासी ॥29॥ दर्शन पादुकांचे घेऊनी । विनंती तिची दत्तासी ॥ प्रसाद द्या दत्ता मजसी । त्रास नका देऊ ॥30॥ ती म्हणाली संचारी । झाड आले म्हणूनी॥ फांद्या नका राहू तशाचि। त्यांना करी ती विनंती ॥31॥ संचारी तिने आपली । ओळख दिली करुनी ॥ भूत पिशाच्च नाही । आत ते कसे येई ॥32॥ भूत पिशाच्च दत्तवाडीसी । येणे अशक्य बजावूनी ॥ देवी संचार हाचि । ठाणे आहे म्हणूनी ॥33॥ ठाणे दत्ताची वस्ती । ास्थिंरता या क्षेत्री ॥ म्हणून संचार अंगी । स्पष्ट झाले शब्दी ॥34॥ पैठणची ती देवी । हे कळले संचारी ॥ करिता एकनाथाशी विनंती । ओळख दिली करुनी ॥35॥ म्हणे शेवटी संचारी । उभे गुरु भिंतीशी ॥ दर्शना या अंतरी । विनंती तिची गुरुसी ॥36॥ 'अरेरे त्रास नका देऊ । प्रसाद द्या दत्ता मजसी ' ॥ ऐसे शब्दे प्रसाद घेता । संचार संपला त्या दिनी ॥37॥ ती होती एक बाई । लक्ष्मण मिस्तरी बंधू पत्नी ॥ संचार झाला अंगी । अध्यात्म क्षेत्री अनुभूती ॥38॥ देवी संचार अंगी । ठाणे आहे म्हणूनी ॥ आली म्हणे दर्शनासी । प्रत्यय या घटनी ॥39॥ ठाणे निर्माण केले गुरुनी । ठाणे म्हणजे दत्ताची वस्ती ॥ त्रिकाल जिथे आरती । तेथे दत्ताची वस्ती ॥40॥
|