| अध्याय क्र. 40
|
 |
होते ते कर्म खडतर । सर्व देशपांडे कुटूंब ॥ वाचले हे आश्चर्य । गुरुंनी घेतले सर्वांचे कर्म ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ परब्रह्म सूर्य पाहण्या । श्रध्दा चक्षू उघडी आता ॥ विकल्प ढग सारण्या । वाहू दे निष्ठा वारा ॥1॥ गुरु परब्रह्म असता । उशीर कसा तुझ्या कार्या ॥ जेथे कर्म रेषा बदलण्या। शक्ती असे गुरु अंगा ॥2॥ अद्भूत शक्ती असता । प्रत्यय देती क्षणाक्षणां ॥ काय काय सांगू आता । शब्द बुध्दीला न थारा ॥3॥ वारा येतो नित्य नवा । अनुभव येतो नित्य नवा ॥ न इति न इति म्हणतां । सांगणे संपेल कसे जाणा ॥4॥ वर्णावे सदा तुझे गुणा । असे वाटे नित्य मना ॥ शक्ती अनुभव नित्य नवा । अनुभवावे वाटे नित्य मना ॥5॥ एक दिनी रात्री चर्चा । व्याप आज वाढला मोठा ॥ गुरु म्हणती शिष्याला । व्याप हा व्याप न वाटावा ॥6॥ सर्व खटाटोप हा । आपल्या समाधाना करितां ॥ दुसऱ्या करिता कसा । प्रत्येकात भाग आपला॥7॥ जो जो येथे आला । त्या सर्वात आपण असता ॥ मग तो वेगळा कसा । व्याप कसा मग सांगा ॥8॥ आई मुलाबाळाकरितां । सर्व कांही करिते नां ॥ आनंदी ती असते सदा । प्रत्येक व्यक्तीच्या कार्या ॥9॥ तिचा अंश प्रत्येकात असे । उरलेले खाण्यात आनंद असे ॥ आनंद तिच्या रोमरोमी असे । ही वस्ताुस्थिंती असे ॥10॥ हाच खरा परमार्थ असे । गुरु प्रत्येक शिष्यात असे ॥ अंशरुपात नित्य वसे । ते आपले सर्वा मानती॥11॥ तद्वत् परमेश्वर अंश । प्रत्येकात असे निश्चित । गुरु असता परब्रह्म । तेच तत्त्व वसे पूर्ण ॥12॥ म्हणून विरोधकाचेही स्वागत। दत्तवाडीत होत असे ॥ हे तत्त्व कळेल कसे । अनुभव प्रमाण असे ॥13॥ अनेक विरोधक आज । गुरुचरणी कसे लीन ॥ विचारा तुम्ही त्यास । सांगण्या हिंमत नसे ॥14॥ त्या शक्तीचे आस्तिंत्व । असे प्रत्येकात निश्चित ॥ त्या प्रत्येकाच्या कार्यात । आनंद गुरु मनी असे ॥15॥ 'गंगेचे गंगेत सोडा ' ऐसे । तत्त्व फार सोपे असे ॥ पाणी वर काढण्या गंगेचे। आधी कष्ट पडे ॥16॥ वर उचललेले पाणी जैसे। सोडण्या त्याग लागे॥ मन शरीर बुध्दी पैसे । या सर्वाची झीज असे ॥17॥ झीज सर्व कशाला । असे माझ्याच करितां ॥ कारण हे सर्व माझेच हा । जिव्हाळा गुरु अंगा ॥18॥ नवी सृष्टी निर्मिती येथे । सतत जागृती कार्या लागे ॥ अखंड कष्ट करिता येथे । विश्रांती येथे अशक्य असे ॥19॥ विद्युत केंद्र दिनरात । सुरु पाहिजे अखंडीत ॥ केंद्र प्रमुख व्यक्तीस । झोपून चालणार कसे ॥20॥ बटन झोपेतून उठून लावा । की जागे असता लावा ॥ कार्य होते एक क्षणा । विद्युत प्रवाह सुरु असता ॥21॥ पंखा लावा की दिवा । वीज केंद्र बंद पडता ॥ ना पंखा ना दिवा । तुम्ही जागे असा की झोपा ॥22॥ गुरु शक्ती केंद्र असता। मिळे प्रत्येक शिष्या कार्या ॥ जोवरी प्रवाह शक्तीचा । तोवरी कार्य सर्व ॥23॥ गुरु अगाध शक्ती । दिनरात असे जागृती ॥ हाडामांसाची दिसे मूर्ती । परी शक्ती ही वेगळी ॥24॥ विद्युत शक्ती केंद्र तेचि । त्याने होते कार्य किती ॥ विचारा प्रत्येक शिष्यासी । तुम्ही कां येता दत्तवाडीसी ॥25॥ प्रत्येक शिष्या अनुभूती । त्या शक्ती केंद्रातूनी ॥ शक्ती प्रवाह येऊनी । कार्य केले श्रध्दा बटनी ॥26॥ गुरुची अगाध शक्ती । पाहूनी थक्क होतो मनी ॥ अपघात मोठा होऊनी । काही न झाले वाटे गुरुसी ॥27॥ वय त्र्याएंशी जरी । विश्रांती ना ठाऊकी ॥ चपलता बहू शरीरी । ती प्रत्यक्ष दत्तमूर्ती ॥28॥ पुन: एकदा अनुभूती । आली खरी शक्तीची ॥ वर्णन करु या समयी । कर्म रेखा बदलण्या शक्ती ॥29॥ ब्रह्मा विष्णू महेश शक्ती । असती गुरु अंगी ॥ उत्पत्ती ास्थिंती लय तिन्ही । कार्य करिती सहज॥30॥ दत्तवाडी दत्तबाग उत्पत्ती । ब्रह्मा वृत्ती कार्यी ॥ चालविता ती शिस्त मोठी । विष्णू वृत्ती कळे जीवनी ॥31॥ लय घडामोडी किती । सतत ते मग्न कार्यी ॥ तिन्ही कार्याची महती । घटना प्रमाण त्यासी ॥32॥ किरण मराठे नामी । उपासक एक अकोला ग्रामी ॥ पूर्व ॠणानुबंध काही । असे त्यांचा पूर्व जीवनी ॥33॥ किरणला पांच बहिणी । लग्ने झाली दोघींची ॥ थोरली गोंधळेकर घरी । तीन मुली तिसी ॥34॥ कोणाचे न चाले मृत्यूपुढती । दैवयोग आला तसाचि ॥ सोडूनी गेली ती देवाघरी । तान्हे मूल जरी त्यावेळी ॥35॥ इच्छा किती प्रेम किती। कळे तिच्या कृतीतूनी ॥ झोका देई बाळाला ती । त्रास न त्याचा कोणासी ॥36॥ गुरु सांगती गोंधळेकरासी । लग्न विचार सोडा तुम्ही ॥ सोडूनी दिले त्या विचारासी । अपत्याकडे लक्ष देती ॥37॥ तिसरी बहिण लता नामी । विवाह ठरावा इच्छा मनी ॥ प्रयत्न केले अनेक रीती। यश आले एक दिनी ॥38॥ गुरुंची संमती घेण्यासी । आले सर्व दत्तवाडीसी ॥ गुरुसी सांगती सर्वही । पसंती आली लतेची ॥39॥ व्यवहार ठरविण्या मनी । ठरवूनी आलो आम्ही ॥ काय करावे सांगा तुम्ही । योग्य आहे कां योग हा ॥40॥
|