| अध्याय क्र. 25
|
 |
चमत्कार त्या क्षणी । श्री विष्णुदास दिसती ॥ श्रीपाद श्रीवल्लभ स्थळी । रुद्राक्ष माळ कंठी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रध्दा निष्ठा ज्यांचे मनी । उपासना ग्रंथ जीवनी ॥ मार्गदर्शन करी त्यासी । इतरांची ना जरूरी ॥1॥ शिक्षणा प्रवेश क्षणी । पालक येती बरोबरी ॥ नांव दाखल करिती । फक्त पहिल्या वर्गी ॥2॥ प्रति वर्षी नोंदणीसी । येती न पालक कधी ॥ पहिला वर्ग होताचि । नाव दाखल दुसऱ्या वर्गी ॥3॥ तुमचा वर्ग तुम्हासी। प्रवेश देतो दुसऱ्या वर्गी ॥ पालकाची न पडते जरुरी । स्वयं प्रगती प्रवेशी ॥4॥ तैशी उपासना ास्थिंती । प्रासादिक ग्रंथ असती ॥ श्रध्दा निष्ठा त्यावरी । मार्गदर्शन क्षणोक्षणी ॥5॥ देवता समजता ग्रंथासी । जबाबदारी असे ग्रंथाची ॥ प्रगती करी त्यांची । चूक बरोबर सांगती ॥6॥ शब्द अर्थ कळे त्यातूनी । शब्दश: अर्थ खरा नाही ॥ मिळे जी प्रेरणा स्फूर्ती । खरा अर्थ असे तो ॥7॥ सारखी न सर्वांची ास्थिंती । तुलना नको दुसऱ्याची ॥ त्याचा अनुभव एक पारायणी । मला कां न तो एकचि ॥8॥ एक पारायणी प्रगती । दुप्पट कशी दुसऱ्या वेळी ॥ सारखे नसे नेहमी । मन चंचल अति ॥9॥ मन ास्थिंती जशी । तशी त्याची प्रगती ॥ ती पूर्व उपासनी । तयारी प्रत्येकाची वेगळी ॥10॥ प्रत्येकाचे जन्म किती । कोणास ठाऊक गणती ॥ कोणाची उपासना किती । मोजदाद त्याची कशी ॥11॥ जन्म उपासना गणती । वृत्तीचा खेळ अंतरी॥ तो कोणत्या दालनी । हे कळे वृत्तीवरुनी ॥12॥ जीवन ही अनंत मजल्याची । इमारत असे उभी ॥ आपले कार्य कोणते मजली । ठरले असे जन्मताचि ॥13॥ अधिकार तैसा उपदेश त्यासी । अधिकार हा अदृश्यी ॥ अधिकार ही वृत्ती । अधिकार हा मजलाचि ॥14॥ जो ज्या असे मजली । दृश्य दिसती त्या मजली ॥ उपयोग नसे कांही । ठोठाविता दुसऱ्या मजली ॥15॥ शिकण्याची इच्छा मनी । अभ्यास करा तुम्ही ॥ उत्तीर्ण व्हा प्रत्येक वर्षी । यश हे निश्चित जीवनी ॥16॥ उपासना अभ्यासी । अध्यात्मी प्रगती निश्चिती ॥ काळवेळ प्रत्येकाची । भिन्न असे यशाची॥17॥ इच्छा, प्राण, निर्धार शक्ती । तिन्ही एकवटूनी ॥ कार्य करण्याची जरुरी । विकल्प अहंकार ठेवा दूरी ॥18॥ अति बुध्दिवादी फसती । प्रेरणे स्फूरती ते तरती ॥ बुध्दीने विकल्प ये मनी । प्रेरणे निर्धार मनी ॥19॥ उपासने येतो मनी । निर्धार या जीवनी ॥ निर्धारे मिळे स्फूर्ती। चित्त शुध्दी निश्चिती ॥20॥ चित्त शुध्दी जितकी । तितकी प्रगती अध्यात्मी ॥ अनुभव ज्याचा त्यासी । आनंदे प्रसन्नता मनी ॥21॥ उपासने करण्या प्रगती । गुरु आग्रह उपासनेसी ॥ दत्तवाडी केंद्र आजी । उपासना स्थळ प्रसिध्दी ॥22॥ एकोणीसशे अठ्ठावन साली । झाली फक्त दत्त जयंती ॥ रामनवमी उत्सावासी । सुरवात झाली एकोणसाठ साली ॥23॥ एक एक उत्सवासी । भर पडू लागली ॥ उपासना दृष्टी समोरी। मार्ग दर्शन अदृश्यी ॥24॥ जागा खरेदी पासुनी । मार्गदर्शन पध्दती ॥ भुयारी दत्त्त मंदिरी । अनुभव पूर्व अध्यायी ॥25॥ प्रदक्षिणा कार्यक्रमी। पूर्व घटना कांही ॥ दोन वर्षा आधी । एकोणीसशे सत्तर साली ॥26॥ भक्त अदृश्यी दर्शनासी । गुरु द्वादशी दिनी ॥ श्रीपाद श्रीवलरूभ फेरी । आली दत्तवाडीवरी ॥27॥ आश्विन वद्य द्वादशीसी । रुद्र अभिषेक पादुकावरी ॥ पादुका औदुंबरा तळी । आवडी त्यांना औदुंबराची ॥28॥ त्रिकाल पूजा आरती । शेजारती सायंकाळी ॥ गुरु द्वादशी एकादशी । एकचि तिथी सोमवारी ॥29॥ संपता सायं आरती । बंद केले दरवाजासी॥ कुलूप लावले भुयारी । आंत नव्हते कोणी ॥30॥ भक्त जाता सर्व घरी । कुलूप बाहेरील फाटकी ॥ सफाई दिवाळीची । करण्या तलरूीन सर्व॥31॥ गुरु हाती काठी । चप्पल असे पायी ॥ लोखंडकार लाविती कंदिलासी । गुरुंना देण्याची तयारी ॥32॥ अचानक वाजली । घंटा दत्त मंदिरी ॥ दोन टोले घंटीवरी । पडला ध्वनी कानी ॥33॥ तर्क करी कोणी । रस्त्यावरी सायकल घंटी ॥ आवाज हा वेगळाचि । शंका ती फिटली ॥34॥ बैल गळयातील घंटी । वाजली असेल कडब्यामध्यी ॥ नाही आवाज तैसा परी । ही सर्वांची खात्री ॥35॥ कोणी गेले कां खाली । आले कां दर्शनासी॥ कुलूप असे फाटकासी । किलरूी असे खिळयासी ॥36॥ पहा म्हणती मंदिरी । कोणी वाजविली घंटी ॥ आले कां कोणी । दर्शना चुकूनी ॥37॥ घडयाळ पाहती त्या क्षणी । दहाला पाच कमी ॥ ऐशा रात्र समयी । कैशी वाजली घंटी ॥38॥ गुरु ऐकती घंटीसी । पाठविती शालीग्रामासी॥ हालता दिसता घंटी । सांगे निरोप गुरुसी ॥39॥ दत्त मंदिरी पाहती । घंटी वाजविली आताचि ॥ ते स्पष्ट झाले त्या क्षणी । आंदोलने लोलकासी॥40॥ गुरु जाती दत्तमंदिरी । टाकती प्रकाश विजेरी ॥ आंदोलने घंटीसी । खात्री गुरु मनी ॥41॥ कोणत्याही घटनी । शंका न रहावी काही ॥ थारा न देती तर्कासी । विकल्प पळे दूरी ॥42॥
|