| अध्याय क्र. 30
|
 |
विश्वास पूर्ण अंतरी । दुसरे तिसरे नसे कोणी ॥ गुरु असती बरोबरी । म्हातारा रुप घेऊनी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ गुरु सांगती चर्चा, कीर्तनी। स्वल्प रुपे पाहू त्यासी ॥ दोन तऱ्हेचे मानव जगती । अनुभवावीण तत्त्व सांगती ॥1॥ कर्ता हर्ता तो आहे म्हणती । अनुभव त्याचा कधी न घेती ॥ भक्त सुखरुप जोवरी । विश्वास राहे तोवरी ॥2॥ संकट पडता शिरावरी । चिंता करिती अंतरी ॥ विश्वास त्यांचा डळमळी । अल्पबुध्दी म्हणती त्यासी ॥3॥ दुसरे अथांग ज्ञान सागरी । अहंकार नसे तिळभरी ॥ तत्त्व अनुभवती जीवनी । विश्वास न तुटे संकटी ॥4॥ दोन भक्तांची कां वेगळी । अवस्था असे जीवनी ॥ एक असे प्रवृत्ती । दुसरीस म्हणती निवृत्ती ॥5॥ मन आपुले अपेक्षी । सतत अपेक्षा मनी ॥ लक्ष असे त्यावरी । सतत चमत्कारावरी ॥6॥ हे काम झाले आजी । दुसरे येई मनी ॥ ऐसे सतत त्या पूर्तीसी । दुसरे न येई मनी ॥7॥ ही असे प्रवृत्ती । भक्त करितो भक्ती ॥ सतत कामना मनी । अनुष्ठानही त्यासाठी ॥8॥ ऐसे जन्म कितीतरी । प्रवृत्ती होते कमी ॥ एक एक इच्छा संपूनी । निवृत्ती येते मनी ॥9॥ जबरदस्ती कशी ती । प्रवृत्ती जाते सहजचि ॥ सहज निवृत्ती ती खरी । ओढून ताणून न काही ॥10॥ राग आला घरी । संन्यास घेती जरी ॥ निवृत्ती नाही खरी । मना ओढ घरची ॥11॥ गुरू नसती संन्यासी । निवृत्ती पूर्ण मनी ॥ नाही संग्रही वृत्ती । गंगेचे गंगेत ही वृत्ती ॥12॥ वैभव इतके जरी । त्यांचेसाठी खर्च नाही ॥ भक्तासाठी सर्व काही । सतत काळजी भक्तांची ॥13॥ कुत्रा, गाय आजारी । दहा वेळ पाहती ॥ खाणे पिणे औषधी । जातीने लक्ष देती ॥14॥ भक्ताची काळजी किती । हे कसे सांगू लेखी ॥ अनुभव ही शिदोरी । असे शिष्या जवळी ॥15॥ गुरू सांगती शिष्यासी । लक्षणे प्रवृत्तीमय शिष्याची ॥ भक्त अपेक्षा पूर्तीसी । वाट पाहती देवाची ॥16॥ भौतिक इच्छा तृप्तीसी । परमेश्वराची वाट मनी ॥ ही अवस्था प्रवृत्तीची । तेथे नसे निवृत्ती ॥17॥ जोवरी प्रवृत्ती मनी । तोवरी अहंकार मनी ॥ ऐहिक इच्छा धडपड मनी । तोवर अनुभूती नाही ॥18॥ निवृत्ती नाही मनी । आसक्तीसी नाही सुट्टी ॥ सोडायची नसते आसक्ती । सुटायची असते सहज ॥19॥ उपासना करिता कांही । बदलते हळूहळू प्रवृत्ती ॥ निवृत्ती येते मनी । अनुभूती येते त्या क्षणी ॥20॥ संत सखू कथी । जन्म तिचा निवृत्तीमय ॥ विठ्ठल पाहे वाट तिची । असा अनुभव जगी ॥21॥ प्रेम सखा पांडुरंग तोही । स्त्री रुपा घेऊनी ॥ सखूचा धावा ऐकूनी । प्रभूच मग भक्तांच्या बंधनी ॥22॥ अंतर मन विरली । ऐशा घटना घडती ॥ गाजावाजा तेथे नाही । लक्ष नसे चमत्कारी ॥23॥ गुरूचे अनुभव काही। कथिले हया पूर्वी ॥ निवृत्ती जरी मनी । गुरू अति दक्ष व्यवहारी ॥24॥ संतांना काय जरूरी । संसारी व्यवहाराची ॥ आसक्ती न कशाची । हा अनुभव त्यामध्यी ॥25॥ बारसे म्हणती काही । नामकरण कार्यक्रमी ॥ अपेक्षा काय गुरूकडूनी । दक्षिणा घ्यावी गुरूंनी ॥26॥ अनुभव किती ठिकाणी । सोन्याची अंगठी बाळासी ॥ नांवे सांगु कोणा कोणाची । स्मरण असे ज्याचे त्यासी ॥27॥ लग्न कांही भक्ता घरी । गडगनेर त्याला करिती ॥ केळवण त्यांचे भाषी । अंगठी वधू वरासी ॥28॥ व्रतबंध कार्यक्रमी । उत्साह जास्त मनी ॥ दत्तात्रेय परंपरा ती । संध्येपात्र पंचपळी त्यासी ॥29॥ अहो बदली झाली भक्ताची । बोलाविती भोजनासी ॥ मिष्टांन्न देऊनी सर्वासी । निरोप देती त्यासी ॥30॥ भक्त येता परगावाहूनी । बडदास्त त्याची किती ॥ जावाई बडदास्त कोणी । ठेवणे अशक्य घरी ॥31॥ नागपूरकर आले रात्री । मिष्टांन्न भोजन रात्री ॥ सकाळी थाट मिष्टांन्नी । शिस्त त्यात क्षणोक्षणी ॥32॥ चमत्कार वाटे सर्वांसी । होते कसे हे सर्वही ॥ उत्पन्न नाही काही । वर्गणी यादी नाही ॥33॥ दुसरी शिस्त ठायी ठायी । तळमळ गुरू अंगी ॥ शब्द आणावे कोठूनी । प्रत्यक्ष कळते तेथे ॥34॥ ही ईश्वरी शक्ती । गुण घ्यावे किती । विचार घ्यावे किती । कळत नसे मजसी ॥35॥ प्रवृत्ती जन्मा येऊनी । गुरूराया घेऊ किती ॥ तुझे हाती सर्वही । मी जरी कर्म विपाकी ॥36॥ निवृत्ती नाही मनी । चिंता कशी कमी ॥ गुरूसी चिंता सर्वांची । सवर्ांसाठी धावती ॥37॥ नागोराव धोंडोपंत जोशी । दहिगांवचे रहिवासी ॥ आजोळ त्यांचे भांबेरी । मामा कृष्णराव कुळकर्णी ॥38॥ पहिले दर्शन मामा घरी । काही काळ गुरू सन्निधी ॥ रुप देखिले डोळे भरूनी । गुरू दिसती ध्यानी मनी ॥39॥ घरी जाता दहिगांवी । अर्धवट झोपता रात्री ॥ गुरू दर्शन होऊनी । अत्यानंदे हंसु येई प्रत्यक्षी ॥40॥ ऐसे झाले दोन वेळी । पत्नीने उठविले त्यासी ॥ ते सांगती पत्नीसी । गुरू दर्शने हर्ष मनी ॥41॥
|