| अध्याय क्र. 7
|
 |
औदुंबर वृक्ष दुभंगूनी । शुभ्र गाई निघाल्या त्यातूनी ॥ कामधेनू त्या न थांबती । रोखु कसे वाटे मनी ॥ |
श्री गणेशाय नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥ श्री कुलदेवताभ्यो नम:॥ श्री महालक्ष्म्यै नम:॥ श्री सरस्वत्यै नम:॥ मनुष्य जन्म विशेष । येत नसे वारंवार ॥ जन्मोजन्मीचे सुकृत । फळा येते नर देहांत ॥1॥ अमरत्व असे आत्म्यास । प्रवेश करी स्थूलदेहांत ॥ कारण देह असे सोबत । वासना देह पाठोपाठ ॥2॥ पूर्व जन्माचे संस्कार । पूर्ण असती कारण देहांत ॥ स्मरण देती वारंवार । प्रेरणा देती इष्ट कार्यास ॥3॥ अदृश्य कारण देहांत । असे कार्य साकार ॥ अदृश्य रुपे दिसे साकार । जरी गुरु मनुष्य देहांत ॥4॥ ऐसे दत्तरुप साकार । पातोळे करुनी निमित्तास ॥ आले कार्य करण्यास । आंधळयाने आणले डोळसास ॥5॥ मुक्काम हनुमंत मंदिरात । कळले वृत्त्त गावांत ॥ कुतूहले येती दर्शनास । ठेवा म्हणती पूजा करण्यास ॥6॥ दर्शना येता मंदिरात । प्रश्नोत्तरे चालती दिनरात ॥ योग्यता कळली सर्वास । उघडले ज्ञान सत्रास ॥7॥ सत्पुरुष योग्यता फार । हे न राहती पूजा करण्यास ॥ योग्यता असे विशेष । आनंद झाला भांबेरीकरास ॥8॥ नुसत्या चर्चेत नसे सार । एखाद्या ग्रंथाचे करावे वाचन ॥ सर्वांचे झाले मन प्रसन्न । सुरू केला पांडव प्रताप॥9॥ निमित्त होते पांडव प्रताप । प्रवचन चाले एक प्रहर ॥ दुमदुमले सर्व मंदिर। श्रोते वाढले दिन प्रतिदिन ॥10॥ लोहचुंबक आकर्षी लोह । गुरुंनी आकर्षिले भक्त ॥ जो ऐके पोथी एक दिन । तो कधी न राहिला गैरहजर ॥11॥ भेदिला मनी जाऊन अर्थ । वाटे माझेचसाठी सर्व ॥ तलरूीन झाले अंत:करण । ऐकत रहावे वाटे सतत ॥12॥ सुरू केला जो ग्रंथ। पूर्ण होईल तो निश्चित ॥ समाप्तीचा ठरला दिवस । आनंद सर्वा मनात ॥13॥ श्रोता नारायण फॉरेस्टर । गुरू विचारिती त्यास ॥ कोण हस्ते स्थापिला राम । कोणे स्थापिली पंचायतन ॥14॥ देवमास्तर एक सत्पुरुष । होऊन गेले भांबेरीत ॥ त्यांचा अधिकार थोर । बांधिले राम मंदिरास ॥15॥ देवमास्तरांचे शिष्य एक । आज राहती अडगांवात ॥ नांव भालेराव डॉक्टर । स्थापिली राम पंचायतन ॥16॥ ऐसे सांगता नारायणराव । गुरू म्हणती फॉरेस्टरास ॥ बोलावून आणा डॉक्टरास । पोथीच्या या समाप्तीस ॥17॥ गुरू इच्छा होता जाण । निघाले ते गाडी घेऊन ॥ आले अडगांव ग्रामात । नमस्कार केला भालेरावास ॥18॥ डॉक्टरा वाटले नवल । कैसे आले फॉरेस्टर ॥ प्रश्न करिती डॉक्टर । उद्देश काय येण्यात ॥19॥ उत्तर देती फॉरेस्टर । एक सत्पुरुष विष्णुदास ॥ आले असती भांबेरीस । योग्यता त्यांची विशेष ॥20॥ पातोळे निमित्त येण्यास । मुक्काम हनुमान मंदिरात ॥ सुरू केला पांडव प्रताप । समाप्तीचे आमंत्रण तुम्हास ॥21॥ आनंद भालेराव मनात । दर्शन इच्छा चित्तात ॥ होकार भरला येण्यास । ताप होता शरीरात ॥22॥ फॉरेस्टर विचारिती त्यास । घरी कां तुम्ही आज ॥ दोन अंशाहून ताप । विश्रांती घेतली आज ॥23॥ फॉरेस्टर जातां क्षणांत । ताप उतरण्या सुरवात ॥ ऐसे कैसे झाले देहात । होकाराची किमया यात ॥24॥ गुरू होते मंदिरात । शक्ती असे सूक्ष्म देहांत ॥ सुटा होई क्षणात । फिरत येई अंतराळात ॥25॥ सूक्ष्म देही अडगांवात । निष्ठा देखिली भालेरावात ॥ भक्त भोग भोगण्यास । शक्ती असे गुरू देहात ॥26॥ उतरता भालेराव ताप । चढू लागला गुरूसी ताप ॥ करण्या शिष्या निकोप । घेतला डॉक्टरांचा ताप ॥27॥ डॉक्टर येता भांबेरीस । आनंद झाला गुरू भेटीत ॥ अंग होते फणफणत । ताप होता शरीरात ॥28॥ चौकशी करितां त्यास । कळला तापाचा काळवेळ ॥ ते कळता झाले थक्क । गदगदले अंत:करण ॥29॥ गुरूस ताप येण्याची वेळ । तीच त्यांची उतरण्या ज्वर ॥ गुरूने घेतला आजार । हे कळले भालेरावास ॥30॥ कंठ दाटला क्षणात । शब्द न फुटला मुखातून ॥ गुरू म्हणती त्यास । बरे वाटेल आपोआप ॥31॥ कळला गुरूंचा अधिकार । शिष्याचा घेतला आजार ॥ भोगला आपण अंगावर । गुरूशक्ती असे अपार ॥32॥ संकल्प होता गुरू मनी। समाप्ती भालेराव हाती ॥ ज्याने स्थापिली मूर्ती । देवमास्तरा संकल्पी ॥33॥ गुरू संकल्पे भाव मनी । असे जीवन जगण्या तयारी ॥ संकल्प पूर्ण करण्यासी । गुरूजवळी शक्ती ॥34॥ होकार देता गुरू संकल्पी । पूर्ण करण्या संकल्पासी ॥ जबाबदारी असे गुरूवरी । दूर सारती अडचणीसी ॥35॥ अडचण आजार जरी । दूर करिती तापासी ॥ स्वत: घेतला अंगावरी । बरे करण्या भक्तासी ॥36॥ गुरू संकल्पे जगता जगी । अडचणी होती दूरी ॥ जबाबदारी घेती गुरू त्याची । पूर्ण करविती आपण ॥37॥ यथासांग झाली समाप्ती । पूर्णता भालेरावा हस्ती ॥ धन्य डॉक्टर जीवनी । गुरू आशीर्वाद शिरी ॥38॥ ऐशा आशीर्वादे जीवनी । कृपा अनुभविली गुरूची ॥ साफल्य निश्चित जीवनी । गुरू संकल्पे जाणे जरुरी ॥39॥ गुरू सेवेचे फल त्यासी । गुरू सेवा कलियुगी ॥ साफल्य करी जीवनी । गुरूप्रसाद मिळे त्यासी ॥40॥ कलियुगी आयुष्य कमी । बुध्दी नसे अनुष्ठानी ॥ गुरू सेवेचि लवकरी । सार्थकता होई जीवनी ॥41॥
|