| अध्याय क्र. 47
|
 |
ब्रह्मस्वरुप श्रीगुरु । सदा प्रसन्न श्रीगुरु ॥ सर्वज्ञ श्रीगुरु । तपोनिष्ठ श्रीगुरु ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ सामर्थ्यवान श्रीगुरु । शक्तिमान श्री. गुरु ॥ प्रज्ञावान श्रीगुरु । दैदिप्यमान श्रीगुरु ॥1॥ सामर्थ्यदाता श्रीगुरु । शक्तिदाता श्रीगुरु ॥ प्रज्ञादाता श्रीगुरु। तेजदाता श्रीगुरु ॥2॥ ब्रह्मस्वरुप श्रीगुरु । सदाप्रसन्न श्रीगुरु ॥ सर्वज्ञ श्रीगुरु । तपोनिष्ठ श्रीगुरु ॥3॥ ऐसे गुरुचे असे माहात्म्य । प्रेरणे बेरीज सत्तेचाळीस ॥ अवतरणिका अध्याय । प्रेरणा असे अवतरणिकेस ॥4॥ पहिले अध्यायी प्रेरणे तव । सर्व देवतांचे करुनी स्मरण ॥ गुरु जीवनास सुरवात । देवदर्शन विद्यार्थी रुपात ॥5॥ अध्यात्मी प्रयोगा सुरवात । अनुभूती बहात्तर तासात ॥ दुसऱ्या अध्यायी गुरुजन्म । शीत ग्रीष्म संगमात ॥6॥ शनिप्रदोष मुहूतात । गुरु अवतरले भूमीवर ॥ घरी नित्य वेदपठण । बाळा झाले ते मुखोद्गत ॥7॥ ब्राह्मण्य जीवनात ओत प्रोत । संस्थानिकास उपदेश ॥ ब्राह्मण्य नाही ब्राह्मणात । वैगुण्ये नाव नोंद बंद ॥8॥ तिसऱ्या अध्यायी साात्त्विं वृत्ती । देती मित्राला उधार पोथी ॥ पैसे देण्या नसे मती । फायदा घेती साात्त्विंतेचा ॥9॥ जशास तसे वागण्याची । जरुरी साात्त्विंता टिकण्या जगी ॥ गुरु करिती वसुली । सर्वा समक्ष दुकानी ॥10॥ कथा गुरु मित्र पत्नीची । त्रास देई क्षणोक्षणी ॥ घर वाटे अरण्य त्यासी । गुरु आणिती ताळयावरी॥11॥ प्रेम निर्मळ अंतरी । कठोर शिक्षा बाह्यात्कारी ॥ विहिरीत बुडविती स्वप्नी । वृत्ती बदल तिचे जीवनी ॥12॥ ज्ञानी शिष्य चवथ्या अध्यायी। गुरु करिती मोक्ष प्राप्तीसी ॥ गोविंद नारायण कुळकर्णी । बीडकर महाराज सर्व म्हणती ॥13॥ नळ व्याधी त्यांची । पूर्व कर्म व्याधी ॥ गुरु दृष्टीने गेली व्याधी । रामबाण ही औषधी ॥14॥ पूर्वजन्म दोषी । साप येती स्वप्नी ॥ चवताळूनी अंगावरी । भय वाटे मनी ॥15॥ गुरु आले धावूनी । आर्त भाव मनी ॥ दोष मुक्त करिती । गुरुची ती अगाध शक्ती ॥16॥ स्वप्नी जाऊनी आणती । लोखंडकारासी पाचवे अध्यायी ॥ परीक्षा घेऊनी त्यांची । सेवेसी ठेविती जन्मभरी ॥17॥ पट्ट शिष्य दत्तवाडीसी । सेवाभाव त्यांचे अंतरी ॥ 'लोखंडकार वाचूनी । दुसरा न माझा कोणी' ॥18॥ सखा मम तो एकचि । निष्ठा ओतप्रोत' या शब्दी ॥ गुरु शब्द हे त्यासाठी । शब्द अपुरे वर्णनी ॥19॥ प्रयोग सहाव्या अध्यायी । विचार लहरींचा करविती ॥ आघात अंतर्मनावरी । जावई आणती भांबेरीसी ॥20॥ गुरु गाणगापूर पारायणी। शक्ती निर्मिती प्रचिती ॥ तेज दिसे मुखी । पूर्ण शुध्दी ईश दर्शनी ॥21॥ अनुष्ठान दत्तमंदिरी । स्वप्न दत्त पुजाऱ्यासी ॥ व्यवस्थापकासी स्वप्न तेचि। व्यवस्था करिती गुरुची ॥22॥ पातोळे भेट मथुरेसी । प्रवास आंधळया सोबती ॥ पायी प्रवास वनातूनी । उरळ मुक्काम एकादशीसी॥23॥ सकाळी रुद्र महादेवासी । द्वादशी रात्री भांबेरीसी ॥ शनिप्रदोष जन्म मुहूर्ती । आंधळयाने आणिले गुरुसी ॥24॥ सातव्या अध्यायी भांबेरीसी । पांडव प्रताप सांगतेसी ॥ गुरुंचे आमंत्रण भालेरावासी । गुरु भोगती भालेराव ताप ॥25॥ वत्सला पंढरी कन्या ती । सेवा करी बालपणी ॥ नित्य प्रसाद तिच्या भाग्यी । गुरुकृपा पूर्ण जीवनी ॥26॥ विचारिता अनुभूती । औदुंबर वृक्ष अनुष्ठानी ॥ प्रेरणे सांगे गुराखी। औदुंबरातूनी निघाल्या गाई ॥27॥ दासबोध राममंदिरी । ऐकण्या येता ग्रंथासी ॥ पालट गुलाबराव जीवनी । गुरुकृपा त्यांचेवरी ॥28॥ आठवे अध्यायी । हरिश्चंद्र आमले अनुभूती ॥ रुद्राक्ष माळ सुगंधी । तृप्तता प्रसाद भोजनी ॥29॥ तुकाराम ठोकळ कन्येसी । पिसाळलेले कुत्रे चावूनी॥ श्रध्दे तीर्थ घेऊनी । गुण आला कन्येसी ॥30॥ भूत भविष्य अनुभूती । भांबेरी गजानन कुळकर्णीसी ॥ आईचे मृत्यूची वेळ दिवसही । प्रचिती शब्दा शब्दाची ॥31॥ अण्णा देशमुख पत्नीसी । अनुभव कांही अध्यायी ॥ गुरुसी होता शौच्य व्याधी । उपचार केले डॉक्टरांनी ॥32॥ भाऊ भिडे डॉक्टर तेल्हारी । कीर्तनकार केले त्यांचे मुलासी ॥ भाऊ नंतरी आशीर्वादानी । पुत्र अरिष्ट टाळले गुरुंनी ॥33॥ पहिली दत्तजयंती भांबेरीसी । तुळशीराम पाटला अनुभूती ॥ शक्ती पाहूनी शिष्य होती । गुरु हनुमान स्थापने मनब्दी ॥34॥ नववे अध्यायी गुरुंनी । पंढरपूर केले गाडेगांवासी॥ मूर्ती आणण्या मुरलीधरासी । पाठविता अनुभूती गुरुंची ॥35॥ गुरु सोबत क्षणोक्षणी । मूर्ती आणली वेळेवरी ॥ गाडेगांव दत्त जयंती उत्सवी। दार ठोठावूनी 'कृष्णराव चला ' ॥36॥ हाक देती गाडेगांवहूनी । शक्तिप्रत्यय कृष्णरावसी ॥ प्रसाद, शिक्षा अनुभूती । क्षणात घडवती सर्व॥37॥ दहाव्या अध्यायी गाडेगांवी । वाघबुवा संबंध जन्मभरी ॥ मन विचार बीडकरा विचारिती । 'भक्ती लक्ष्मी की लक्ष्मीपतीची' ॥38॥ अकरावे अध्यायी । नळकांडे रामविजय पारायणी ॥ रामनवमी उत्सवी । श्रध्दे निष्ठे घडे सर्व ॥39॥ डॉक्टर देशपांडे गुरुकृपेनी । कीर्तनकार या जीवनी॥ बारावे अध्यायी स्वप्न राधाबाईसी । गुरु रजिष्ट्रार कचेरीत ॥40॥
|