Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 10
उद्या पोष्टात जा तुम्ही । मनीऑर्डर आली तुमची ॥ व्यवस्था असे लक्ष्मीची । सोडवून घ्या तुम्ही ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ दैत्य संहार करावयासी । देवीचा अवतार भूमीवरी ॥ सर्व देवांची अदृश्य शक्ती । होती त्या अवतार कार्यी ॥1॥ कोणी खङ्ग त्रिशूल कोणी । धनुष्य कोणी ढाल कोणी ॥ कोणी डमरु शंख कोणी । कोणी चक्र देती देव शक्ती ॥2॥ प्रत्येक अवतार कार्यी । अदृश्य ऐशी शक्ती ॥ असते त्यांचे बरोबरी । कार्य होती सहज ॥3॥ दत्त्त अवतार भूमीवरी । साथ अदृश्य शक्ती ॥ आयुधे नसती गुरुजवळी । दत्त्ताजवळी आयुधे सर्व ॥4॥ अहिंसा परमोधर्म जरी। तप सामर्थ्य असे जवळी ॥ मन कोणाचे न दुखविती । शिक्षा मन दुखविणाऱ्यासी ॥5॥ इच्छा कार्य करण्यासी । शक्तिविना सर्व व्यर्थचि ॥ धाक असल्या वाचूनी । कार्य होणे कठीण भूमीवरी ॥6॥ देवो दुर्बल घातक: । यज्ञात बली अजापुत्राची ॥ सबल सिंह नसे बली । शक्तीचे कार्य असे जगी ॥7॥ अवतार घेता भूमीवरी । शक्ती घेऊनी येती ॥ कार्य करे अदृश्य शक्ती । कार्य झाल्यावरी कळे सर्व ॥8॥ ऐशी योजना अवतारी । दत्त अवतार कार्यासी ॥ गुरु आले या भागी । विरोधका शिक्षा क्षणोक्षणी ॥9॥ गुरु इच्छा नसे काही । कोणी वागो कसेही ॥ मन न दुखविती कधी । शिक्षेची इच्छा नसे मनी ॥10॥ गुन्हेगाराचा शोध अदृश्यी । शिक्षा मिळे त्याच मार्गी ॥ तप सामर्थ्य किती । तत्पर सर्वात्मे अदृश्यी ॥11॥ केला मनी अपमान जरी । बोलले नसतां कोणाजवळी ॥ अपमान न खपे देवासी । शिक्षा करिती अपराध्यासी ॥12॥ सुष्ट दुष्ट विचार द्वयी । चालत आली आजवरी ॥ सत् धर्म कार्य निमिर्ती । उसळी मारे असत् वृत्ती ॥13॥ प्रतिष्ठा न मिळे त्यासी । विरोध वृत्ती येई अंतरी ॥ विरोध करिती सत्पुरुषासी । खोटी प्रतिष्ठा टिकविण्यासी ॥14॥ सूर्यापुढे न टिके चांदणी । सोन्यापुढे किंमत न पितळेसी ॥ देवा पुढे दानव गती । गुरू पुढे विरोधकाची ास्थिंती ॥15॥ विरोध करितां गुरूसी । सद्गती नाही त्यासी ॥ शिक्षा मिळाली कित्येकासी । व्यर्थ झाले जीवन त्यांचे ॥16॥ समान गुण अंगी । प्रेम निर्मिती लवकरी ॥ भक्तिभाव अंगी । शिष्य करिती गुरू त्यासी ॥17॥ लोखंडकारा सेवेसी। आणिले गुरूनी जाऊनी स्वप्नी ॥ तयार केले वाघासी । सेवा करण्या जीवनभरी ॥18॥ नारायण वाघमारे म्हणूनी । रहिवासी असती गाडेगांवी॥ दोन बंधू त्यासी । जेष्ठ एक धाकटा त्यासी ॥19॥ मधले नारायण असती । पूर्व जन्म पुण्य म्हणूनी ॥ श्रध्दा पूर्ण देवावरी । नित्य स्नान पूजा करिती ॥20॥ अनुग्रह घेण्या इच्छा मनी । ब्राह्मण आदर यांचे मनी ॥ गुरू करावा अधिकारी। हा विचार पक्का मनी ॥21॥ गुरूमंत्राची इच्छा मनी । मनी विचार एकचि ॥ प्रीती ज्याची गुरूचरित्री । गुरू करावे अशा सत्पुरुषासी ॥22॥ ऐसे प्रबल संकल्पासी । पूर्व सुकृत असे साथी ॥ फल मिळावे या जन्मी । ही योजना असे अदृश्यी ॥23॥ नित्य क्रम म्हणूनी । पूजा करिती हनुमंताची ॥ एक पुजारी त्या मंदिरी । दाट ओळख होती त्याची ॥24॥ पुजारी सांगे वाघासी । मी गेलो होतो भांबेरी ॥ सत्पुरुष जटाधारी । आले असती त्या गावी ॥25॥ ठाऊक होते पुजाऱ्यासी । वाघाची वृत्ती कोणती ॥ इच्छा काय असे यांची । सांगण्या प्रेरणा पुजाऱ्यासी ॥26॥ प्रवचन करिती राममंदिरी । दासबोध ग्रंथावरी ॥ सांगण्याची रीत न्यारी । मधुर असे त्यांची वाणी ॥27॥ तुम्ही ऐका जावूनी । तृप्तता होईल श्रवणी ॥ सार्थकता होईल जीवनी । एक वेळ या ऐकूनी ॥28॥ पूर्व सुकृत ज्यांचे पदरी। मार्गदर्शन होते क्षणोक्षणी ॥ पूर्वी संन्याशाची एक दिनी । भेटी झाली वाघबुवाची ॥29॥ शेती वाघांची पारळा ग्रामी । बैल जनावरे जवळी ॥ शेती जनावरासाठी । राहती ते पारळा ग्रामी ॥30॥ शेतीत कष्ट करूनी । झोपले खाटेवरी दुपारी ॥ बैरागी आला जवळी । बैसला त्यांचे खाटेवरी ॥31॥ उपदेश केला त्यांनी । झोपू नये दुपारी ॥ माळ रुपया घ्या ही । राम जप करा सदैव तुम्ही ॥32॥ राम ठसा रुपयावरी । करिती ते पूजा जपासी ॥ फल जपाचे त्यासी । मार्गदर्शक रामदूत पुजारी ॥33॥ ऐकता त्या निरोपासी । निघाले नारायण भांबेरीसी ॥ केले दोन चार साथी । ऐकले दासबोध प्रवचनासी ॥34॥ पुन: भेटले गुरूसी । भटजी होते एक सोबती । वाघबुवा म्हणती भटजीसी । गुरूला आणा गाडेगांवी ॥35॥ प्रवचन प्रभाव मनावरी । गुरूने आकर्षिले शिष्यासी ॥ पूर्व सुकृत फल हेचि । प्रसन्नता वाढली दर्शनी ॥36॥ गुरूचरित्री गुरू प्रीती। समर्थ आहेत म्हणूनी ॥ गुरू करावा यांसी । ही आर्तता नारायण मनी ॥37॥ गुरू आले माडी पौर्णिमेसी । विनंती केली मंत्रासी ॥ मंत्र एकदम देण्याची । प्रथा नाही महाराजांची ॥38॥ आतुरता किती मनी । हे पाहण्या असे युक्ती ॥ पुढे पाहू म्हणूनी सांगती । विसरती तो दिवस कितीतरी ॥39॥ आर्तता ज्यांचे मनी । ते न विसरती कधी ॥ ध्यास लागे तोचि । विचारिती पुन: गुरूसी ॥40॥ उद्यां म्हणता कांही । तीन चार दिवसा नंतरी ॥ आर्तता पाहता नारायणी । मंत्र दिला त्यांना गुरूंनी ॥41॥ नारायण असती संसारी । अनुताप होता जीवनी ॥ एक विवाह जीवनी। दुसऱ्या विवाहाची तयारी ॥42॥

 

Sadguru Vishnudas Maharaj