Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 15
ग्रह तृप्तता स्वाहाकारी । मूर्ती स्थापना पौर्णिमेसी ॥ मुहूर्त होता मार्गशीर्षमासी । श्री दत्तजयंती त्या दिनी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम:। श्री सरस्वत्यै नम: ॥ योजना अदृश्य सृष्टीची । परिपूर्णता त्या योजनी ॥ चूक नसे तिच्यात काही । मनुष्य बुध्दी पडे कमी ॥1॥ मनुष्य बुध्दिमान जगी । त्यास वाटे पाहू हिंडूनी ॥ परमेश्वरी चूका किती । नोंद करुया कागदी ॥2॥ एक विद्वान संशोधनासी । निघाला नोंद करण्यासी ॥ एक वेल त्याच्या दृष्टी । मोठा लाल भोपळा त्यासी॥3॥ म्हणे परमेश्वरी चूक ही । मोठे फळ नको त्या वेली ॥ लहान फळ कवठवृक्षी । मोठे पाहिजे या वृक्षासी ॥4॥ एिहडता थकला दुपारी । झोपला कवठ वृक्षातळी ॥ फळ पडले वरुनी । आदळले ते कपाळावरी ॥5॥ अनुभवे म्हणे त्यावेळी । ईश्वरी चूक नाही काही ॥ मोठे फळ जर वृक्षी । कपाळ मोक्ष माझा आजी ॥6॥ सृष्टी रचना परिपूर्ण ती । चूक नाही त्यात काही ॥ चूक असे आपले विचारी । हा अनुभव विश्रांती वृक्षी ॥7॥ तैसे प्रत्येक घटनी । योजना अदृश्य सृष्टींची ॥ परिपूर्णता असे निश्चिती । हा अनुभव क्षणोक्षणी ॥8॥ बदलण्याची इच्छा जरी । बदल अशक्य त्यामध्यी ॥ ऐसा अनुभव देण्यासी । घटना घडविली या क्षेत्री ॥9॥ योजना अदृश्य सृष्टीची । ढवळा ढवळ न चाले कोणाची ॥ बदल न होई त्यामध्यी । इच्छा असो तुमची काही ॥10॥ हे दाखविण्या जगी । निर्माण करिता या क्षेत्री ॥ घटना घडविली तशी । योजनेत चूक नाही काही॥11॥ अदृश्य सृष्टी योजना कशी । प्रेरणा देण्या शक्ती कशी ॥ पूर्ण करिती ती कशी । हे कळेल या घटनी ॥12॥ जागा पाहिजे मालकीची । विहीर झोपडी त्या जागी ॥ ऐशी योजना मागची । गेले होते अमरकंटकासी ॥13॥ असता अमरकंटकी । तयार झाली झोपडी॥ भव्य बंगला त्या जागी । प्रेरणे दिसतो आजी ॥14॥ बंगला होण्याआधी । गुरु होते अमरकंटकी ॥ शिष्य चैनसुख थानवी । होते त्यांचे बरोबरी ॥15॥ स्वप्न प्रेरणा त्यासी । दत्तमंदिर त्यांचे दृष्टी ॥ सांगितले त्यांने गुरुसी । योजना ती अदृश्यी ॥16॥ योजना असे अदृश्यी । कल्पना नव्हती काही॥ माती होती नुसती । औदुंबर योजना वेगळी ॥17॥ जागेचा विचार करुनी । औदुंबर लाविला त्यांनी ॥ योजना सर्वांच्या मनी । औदुंबर पारायणा जरुरी ॥18॥ मंदिर योजना अजूनी । नव्हती मूर्त स्वरुपी ॥ औदुंबर फोफावला अति । योग्य झाला पारायणासी ॥19॥ पारायण करिती औदुंबरी । ऐसी त्याची ास्थिंती ॥ तो न वृक्ष आजी । ईश योजना असे दुसरी ॥20॥ योजना अदृश्य सृष्टीची । स्वप्नी सूचना चैनसुखासी॥ बुध्दी न चाले योजनी । स्वयंभू पाहिजे इथे सर्व ॥21॥ गुरू स्वयंभू शक्ती । प्रत्येक घटना स्वयंभू ती ॥ विशेषत्व असे घटनी । कायम स्मरण जीवनी ॥22॥ केदारनाथ स्वयंभू मूर्ती । स्थापना विसर्जन नसे त्यासी ॥ बंधन नाही नियमी । नियम असती इतरासी ॥23॥ विद्युत निर्मिती केंद्री । तारेतून पाठविती सर्वत्री ॥ नियम असती वापरण्यासी । कृत्रिम मार्गे शक्ती निर्मिती ॥24॥ हात लागता तारेसी । विद्युत धक्का त्यासी॥ प्राणाशी धोका त्यापासूनी । यासाठी नियम जरूरी ॥25॥ निसर्गी असे विद्युत शक्ती । स्वयंभू संचार कोठेही ॥ नियम नाही काही । बाधा न होई कोणासी ॥26॥ उपयोग करेल त्यासी । लाभ मिळेल त्यापासूनी ॥ इतरांसी त्रास न काही । उपासने लाभ शिष्यासी ॥27॥ स्वयंभू ऐसी शक्ती । स्वयंभू औदुंबर वृक्ष तोही ॥ उगवला त्या तपोभूमीतूनी । सोवळे ओवळे नियम न त्यासी ॥28॥ वाढला सरळ वरी । बाक नसे सात फुटी ॥ पहिला औदुंबर असे मठासी । दुसऱ्याची काय जरुरी ॥29॥ ऐसा विचार शिष्या मनी । गुरू करिती त्यासी युक्ती ॥ नारायण फॉरेस्टर शिष्यासी । सांगती वृक्ष नेण्यासी ॥30॥ भांबेरीसी नेतो सायंकाळी । सांगितले त्यानी गुरूसी ॥ गेले ते तेल्हारा ग्रामी । परत येता झाली रात्री॥31॥ कुदळी घेतली हाती । मारली वृक्ष काढण्यासी ॥ विचार प्रेरणा मनी । रात्री न काढावे वृक्षासी ॥32॥ सांगती श्री गुरूसी । मी पाठवितो उद्या गडी ॥ सकाळी काढीन वृक्षासी । नेतो मी भांबेरीसी ॥33॥ रात्री न काढावे वृक्षासी । प्रेरणा देऊनी नारायणासी ॥ भ्रमण राहिले औदुंबरी । भ्रमण कसे स्वयंभू वृक्षी ॥34॥ तीन प्रहर उलटली रात्री । चवथ्या प्रहरी त्या रात्री ॥ ब्राह्म मुहूर्ती म्हणा तुम्ही । स्वप्न प्रेरणा स्वयंभू वृक्षी ॥35॥ दृश्य एक औदुंबरी । गुरूसी दिसले त्या क्षणी ॥ स्वयंभू औदुंबर वृक्षी । श्री दत्त मंदिर दृष्टी ॥36॥ श्री दत्त स्वयंभू औदुंबरी । प्रकटले त्या मुहूर्ती ॥ प्रेरणा श्री गुरूनाथासी । मंदिर बांधा आता तुम्ही ॥37॥ मार्गदर्शने कार्यासी । वेळ न चाले कधी ॥ योजना अदृश्य सृष्टीची । प्रेरणा ही योग्य समयी ॥38॥ आता अनुकूलता त्यासी । कार्य पूर्ण दत्तजयंतीसी ॥ स्वप्न प्रेरणा दौलतरामजीसी । श्रीगुरू सांगती सकाळी ॥39॥ इच्छा बांधण्या भुयारासी । दर्शविली तेव्हा दौलतरामजीनी ॥ मंदिर संचित जीवनी । विकल्प न आला त्यांचे मनी ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj