Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र.1
घनदाट जंगली । सहल परमेश्वराची ॥ भक्ता आणिली शिदोरी । भक्त मनोरथ पूर्ती ॥



गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम: ॥

ॐ श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ प्रथम नमन गणपतीसी । विघ्नेश्वर विनायकासी ॥  तुज ठाऊक सर्व गाथेसी । प्रेरणा मज देई ॥1॥  चिन्मय चिंतामणी तुझी । स्फूर्ती जगता प्रसिध्दी ॥  तुझी बुध्दी किती । हे वर्णण्या नाही जरुरी ॥2॥  तुझ्या स्मरणे विघ्ने जाती । विद्या येई झडकरी ॥  लिखाणा येई गती । स्मरणशक्ती आगळी ॥3॥  व्यासे लिखाणी । योजिले तुम्हासी ॥ त्याने लिखाणे पूर्ण झाली । तैसे माझे करी ॥4॥  लंबोदर तुला स्मरता । ठाऊक मज नसता गाथा ॥  प्रेरणा तुझी होता ।  उणीव नाही जाणा ॥5॥  गुरु आपुले स्मरणी । कार्य साधे सर्व निश्चिती ॥ सर्व देव आपुलेचि ठायी । कांहीं न पडे कमी या कार्यी ॥6॥  गजानन गणपती आपणचि । विष्णू रुद्र आपणचि ॥ श्री दत्त आपणचि । परब्रह्म आपणचि ॥7॥  आपुले होता स्मरण । सर्व देवतांचे स्मरण ॥  आपुले होता दर्शन । सर्व तीर्थांचे दर्शन ॥8॥  प्रेरणा, कवित्व आपण । बुध्दी देणार आपण ॥ लिखाण करविता आपण । सुसूत्र जीवन गाथा आपण ॥9॥  झाडाचे न हाले पान । जीवन नाही तुज आज्ञेवीण ॥  गुरू कृपेचि चाले क्षणक्षण । गुरूकृपेचि हे सर्व जाण ॥10॥  होता रवि उदया । अंधकारा नाही जागा ॥  गुरू कृपा होता । अज्ञाना नसे थारा ॥11॥  नौका सागर उल्लघवी । तरणे नसता जीवनी ॥ गुण नसतां कांहीं । करी गुरु कृपाच सर्वही ॥12॥  गुरू प्रकाशी जे दिसे । ते लिखाणही गुरुकृपे ॥  नाही कांही त्यात माझे । असती चुका दोष माझे ॥13॥  नमस्कार शेगांववासी । गजानन महाराजांसी ॥ नवजीवन देऊनी । दाखविले अगाध लीलेसी ॥14॥ साष्टांग नमस्कार करूनी । श्री लक्ष्मी व्यंकटेश कुलदैवतासी॥  जे स्वर्गातून आले गिरीवरी । भक्त मनोरथ पूर्ण करण्यासी ॥15॥  माझ्या कुलाशी नेण्या स्वर्गासी । कुलदैवत शक्ती पाठी ॥  स्व इच्छे ब्रह्मा निर्मिती । स्व इच्छे कार्या दे पूर्ण शक्ती ॥16॥  कोल्हापूरवासी महालक्ष्मी । भक्त काजा गणोजा प्रकटसी ॥ लोटांगण माते तुज पुढती । मायेचि करा इच्छा पूर्ती ॥17॥  साष्टांग प्रणाम ॠषिमुनींसी । ज्यांनी अवतरविले ब्रह्मा विष्णू महेशासी ॥  आपली परंपरा गुरुनाथ जीवनी । करी साहाय्य वर्णण्या ऐसे जीवनासी ॥18॥ प्रणाम त्रिवार संतासी । आशीर्वाद द्या सदैव मजसी ॥ संतकृपे श्रेष्ठता भारी । कार्य पूर्ण करी तव कृपेचि ॥19॥ नमस्कार करिता सरस्वतीसी । विद्या दे मज गुरू वर्णण्यासी ॥ मी योग्य नसे ठाऊक मजसी । बोबडे बोल गोड करिशी ॥20॥  नमस्कार साष्टांग करुनी । श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वतीसी ॥ श्री शंकर नरहरी दैवती । प्रारंभ करितो गुरुनाथ गायनासी ॥21॥  नतमस्तक माता पिता चरणी । नमन कुलवंश पूर्वजांसी ॥  श्री विष्णुदास महाराज तेल्हारावासी । ही ज्यांची आज प्रसिध्दी ॥22॥ त्यांचे जीवन गाया शक्ती। द्या सर्व मिळूनी मजसी ॥ प्रेरणा सर्व परब्रह्माची । मधुरता आणा त्यामध्यी ॥23॥  कलियुगात सत्ययुग निर्मिती । ब्रह्मा, विष्णू, महेशाचे कार्यी ॥  असे ज्यांची अद्भुत शक्ती । दे प्रसन्नता गुरुगाथा श्रवणी ॥24॥  जन्म असे साखळीग्रामी । पटवर्धन नाम कुलवंशी ॥  वंश परंपरा कौडिण्य गोत्री । कुलदैवत असे ती अंबाजोगाई ॥25॥  कुलदैवत स्थान देवी । उपासना देव गुरू श्री दत्तात्रेयाची ॥ श्री गुरुचरित्र पारायणी प्रीती । ॠषिमुनी जीवनी प्रचिती ॥26॥  प्रिचती जीवनी घेण्याची । वृत्ती अति बालवयापासुनी ॥ पहिली प्रचिती बाल जीवनी । प्रारंभ ऐसा त्या जीवनी ॥27॥  प्रचिती येण्या पूर्व वृत्तासी । थोडे करु श्रवण कानी ॥  वातावरण निर्मिती । पूर्व कथेतुनी निश्चिती ॥28॥  निसर्ग सृष्टी सौंदर्यी । रमण्यात आनंद मनी ॥ घनदाट अरण्य भोवती । नद्या ओढे स्वानंदे गाती ॥29॥ कंद फळे शोभा मधुरही । रंगी बेरंगी फुले सुगंधी॥  फुले पाखरे त्यावरती । वन्य पशू सदा बागडती ॥30॥  ऐशा घनदाट अरण्यी । मार्ग चालणे असे शाळेसी ॥ कधी ओढयांचा नाद कानी । कधी हिंस्र पशूची डरकाळी ॥31॥  जाणे सहा मैल प्रतिदिनी । दप्तर शिदोरी घेऊनी ॥  भारावलेली ास्थिंती मनाची । भय कैसे मग त्या मनी ॥32॥  निर्धार, निर्भयता मनी । कार्याची निश्चितता मनी ॥  परमेश्वर सर्वा ठायी । स्वाभिमान ठायी ठायी ॥33॥  होता दुपारची सुट्टी । सोडावी शिदोरी ओढयावरी ॥ वाहे झुळझुळ मधुर पाणी । त्याने व्हावी मनाची तृप्ती ॥34॥ शाळेची होता घंटी । वाटचाल करावी शाळेची ॥ घंटी होता पुन: शाळेची । निघूनी जावे घरासी ॥35॥  निर्भयता जाण्या येण्यामध्यी । मन सदा प्रभू चरणासी ॥  ऐसा नित्य क्रम जीवनी । परब्रह्म वृत्ती मनी ॥36॥  सिंहाचा छावा गुण सिंहाचे अंगी । शेळीची वृत्ती कशी आवडी ॥  स्वाभिमानी गुरूसी । स्वाभिमान शून्यता नावडी ॥37॥ मरण्या जिथे तयारी । इच्छा अगतिक जगण्याची कैसी ॥  निर्भिडता असे अंगी । निर्लज्जता असेल कैसी ॥38॥  शाळा एक सोडूनी । शाळा सुरू झाली दुसरी ॥  टाकण्या नांव शाळेसी । दाखल्याची असे जरुरी ॥39॥ पंधरवाडा जाता तसाचि । दाखला आला मुख्याध्यापका जवळी॥  वागणूक नाही बरी । शेरा असे दाखल्यावरी ॥40

 

Sadguru Vishnudas Maharaj