Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 29
प्रकाशमान तेजस्वी । गुरु चेहरा त्यांनी ॥ पाहिला नागफणी जागी । गुरु सर्वाभूती प्रचिती ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ गुरू सांगती सर्वांसी । गवगवा नको उपासनी ॥ सातत्य नाही म्हणूनी । जरूरी वाटे प्रसिध्दीची ॥1॥ सातत्य जर उपासनी । जाहिरातीची न वाटे जरूरी ॥ देखाव्यात न राहे गोडी । अनुभवातचि वाटे गोडी ॥2॥ सातत्याचा कंटाळा जीवनी । पत्र पत्रकावरी आवडी ॥ अनुभव कसा त्यातूनी । कटकटी येती नशिबी ॥3॥ जाहिरात प्रसिध्दी । विरोधकाची करी जागृती ॥ आव्हान मिळे त्यासी । ज्याची न कांही जरूरी ॥4॥ सातत्ये करा काही । कार्य होते सहजचि ॥ विरोध होतो कमी । प्रगती होते उपासकाची ॥5॥ थेंबे थेंबे तळे साची । म्हण असे मराठी ॥ तैसे होते अध्यात्मी । शक्ती वाढे सातत्यी ॥6॥ इच्छा यज्ञाची जरी । आहुती वैश्वदेवकुंडी ॥ सातत्ये करिता थोडेही । पूर्ण होती आहुती ॥7। नित्यक्रमाची जरूरी । पुरश्चरण जर मनी ॥ नित्य करिता काही । होते पूर्ण पुरश्चरण ॥8॥ मुख्य अडचण एकचि । आवड नसे सातत्याची ॥ प्रसिध्दीची हाव मनी । यश न मिळे कार्यी ॥9॥ इतका खर्च करूनी । कार्य न होते म्हणूनी ॥ निराशा येते मनी । विश्वास ढळतो त्यातूनी ॥10॥ गुरूची सातत्य वृत्ती । अनुभवा येते क्षणोक्षणी॥ कार्य सांगू किती । अनुष्ठान केले कितीतरी ॥11॥ पर्जन्यासाठी मठासी । अनुष्ठान झाले कांही ॥ गवगवा नाही काही । अनुष्ठाने यश पाठी ॥12॥ अनुष्ठानाची पध्दती । ॠषी प्रतिमा करूनी ॥ ठेविती महादेवा समोरी । भृगू ॠषी पाटावरी ॥13॥ कपडा बांधूनी सभोवती। जनता संपर्क कमी ॥ अभिषेक औदुंबरी । धार सतत पादुकावरी ॥14॥ पत्ता नसे कोणासी । अनुष्ठान कशासाठी ॥ दिनरात अखंडी । धार ती पादुकावरी ॥15॥ पर्जन्य वृष्टीसाठी । सुरू करिता अनुष्ठानासी ॥ पाऊस वर्षवी शक्ती। तिसरे दिनी अनुष्ठानी ॥16॥ ॠषी अवयव काही । नष्ट होता जलानी॥ अनुष्ठान संपते नंतरी । ॠषी पूजा नैवेद्यी ॥17॥ एक साली ऐसेचि । पाऊस नाही म्हणूनी ॥ गुरू इच्छा मनी । तयारी ती चालली ॥18॥ पंचांगकर्ते विदर्भी । राजंदेकर आकोला रहिवासी ॥ आले दर्शना मठासी । पाऊसाची चर्चा कांही ॥19॥ ते सांगती गुरूसी । मुहूर्त नाही पंचांगी॥ पंधरा दिवस अजूनी । पाऊस नसे विदर्भी ॥20॥ त्याच दिनी तयारी । ॠषी पूजा करूनी ॥ आरंभिले गुरूंनी । अनुष्ठान औदुंबरी ॥21॥ प्रत्येकाची भिन्न पाळी । गुरू फक्त तीर्थावरी ॥ संदेश तो देवासी । संधान ते अदृश्यी ॥22॥ पाऊस आला लवकरी । कार्य झाले सहजचि ॥ गवगव्याची नसे जरूरी । कार्य होते निश्चिती ॥23॥ तिथी मुहूर्त नसूनी । पाऊस आला म्हणूनी ॥ गुरू पटविती सर्वासी । सातत्ये होते सर्वही ॥24॥ पर्जन्य अनुष्ठानी । यश आले नाही ॥ ऐसे न झाले कधी । श्रध्दा ठेवा सातत्यी ॥25॥ ऐसेच अनुष्ठान एक साली । केले अटकळी मंदिरी ॥ गवगवा नको म्हणूनी । गावाहूनी दूर स्थळी ॥26॥ रहावे निवांत स्थळी । इच्छा गुरूची एकचि ॥ विश्रांती घ्यावी कांही । करावे अखंड जपासी ॥27॥ दिवस ठरला त्यासी । सप्ताह कार्यक्रम म्हणूनी ॥ ट्रॉली आली नेण्यासी । अटकळी ग्राम वासी ॥28॥ योग आला मजसी । गुरू सहवास प्रारंभी ॥ पोहचलो आम्ही रात्री । अटकळी निवांत मंदिरी ॥29॥ जंगम सत्पुरूष पूर्वी । होऊन गेले त्या स्थळी ॥ उपासने साठी त्यांनी । बांधिले होते मंदिरासी ॥30॥ लिंगायत आप्पाची । उपासना शंकराची । शंकरा आवड नागाची । प्रतिमा नागनाथाची ॥31॥ कथा ऐकल्या काही । पाण्याच्या दीपाची ॥ प्रसिध्दी त्या मंदिरी । नाग भव्य त्या भागी ॥32॥ बाधा न कोणासी । ऐसे ऐकियेले कानी ॥ मंदिरा शेती काही । त्याने जीर्णोध्दार मंदिरी ॥33॥ मंदिरी एक पुजारी । पूजा करूनी सकाळी ॥ बंद मंदिर दिनभरी । उपासना आज न काही ॥34॥ ऐशा त्या मंदिरी । मुक्काम गुरू करिती ॥ काय योजना त्यांची । न कळे कोणासी ॥35॥ दुसरे दिनी उठूनी । स्नान पूजा सूर्योदयी ॥ उजळली नागमूर्ती । गुरू इच्छे सर्वही ॥36॥ गुरू संकल्पे आज्ञी । सुरू केले मी जपासी ॥ अनुभव त्याच क्षणी । सत्पुरुष बैसले समोरी ॥37॥ नागफणी जागी । सप्तफणी नाग दृष्टी ॥ साध्वी स्त्रीने येऊनी । दर्शन घेतले आनंदी ॥38॥ विद्युत लहरी शक्ती । शिरली बोटातूनी ॥ ऐसा अनुभव गुरू संन्निधी । शंकर पिंड दृष्टी ॥39॥ गुरूची अगाध शक्ती । येती अनेक भक्त जपासी ॥ स्वयंपाक नाही कांही । डबे येती सर्व बाजूनी ॥40॥ जेवती शिष्य किती । पन्नास पासून दोनशेवरी ॥ चहाची तर नाही गणती । अखंड उपासनेची शक्ती ॥41॥ गुरू म्हणती शिष्यासी । किलरूी देता घडयाळासी ॥ चालते ती आठवडाभरी । किलरूी देणारा असो नसो जवळी ॥42॥

 

Sadguru Vishnudas Maharaj