Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 16
श्री लक्ष्मी व्यंकटेश मूर्ती । गुरु असती त्यामध्यी ॥ निघूनी त्या मूर्तीतूनी । अभिषेक पावला गुरुसी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ अनुभव उत्तर अनुभवासी । खंडन त्याचे व्यर्थचि ॥ अनुभव खंडन मंडनानी । हाती न लागे कांही ॥1॥ एकाचा अनुभव न दुसऱ्यासी । अनुभव ज्याचा त्यासी ॥ साक्षात्कार जर एकासी । अशक्य तो दुसऱ्याशी ॥2॥ दोन्ही ास्थिंती न सारखी । भिन्न प्रकृती प्रत्येकी ॥ भिन्नता सर्वा ठायी । भिन्नता असे अनुभवी ॥3॥ श्रध्दा निष्ठा ज्याची जशी । त्यावरी गुरूकृपा तशी ॥ देवदर्शन एकासी । दुसऱ्यासी नसे त्याच क्षणी ॥4॥ ही भिन्नता क्षणोक्षणी । एक गुरू जरी सवर्ांसी ॥ दृष्टी ज्याची जशी । तसे असती गुरूमूर्ती ॥5॥ अनुभव सांगता दुसऱ्यासी । त्यावरी चर्चा ते करिती ॥ चर्चे न मिळे कांही । उपासने मिळे ईश शिदोरी ॥6॥ ईश उपासना मार्गी । शााब्दिंक चर्चा न उपयोगी ॥ एरंडाचे गुऱ्हाळ म्हणा त्यासी । ना गुळ ना मध ना गोडी ॥7॥ चिकित्सक वृत्ती आजी । प्रयत्ना कंटाळा भारी ॥ सातत्य फार कमी । विकल्प सदा मनी ॥8॥ असे उपासक मनास्थिंती । चिकित्सक सदा जरी ॥ नम्रता पाहिजे मनी । प्रामाणिक प्रयत्न जरूरी ॥9॥ अनेक मजले इमारतीसी । एकावर एक असती ॥ स्वतंत्रता प्रत्येक मजली । संबंध न दुसऱ्यासी कांही ॥10॥ मानव मेंदू ास्थिंती । अनेक दालने त्यामध्यी ॥ स्वतंत्र दालने सर्वही । अदृश्य सृष्टीत दालने ती ॥11॥ स्वतंत्र बिऱ्हाड प्रत्येकी । दिसती आपुल्या मजली ॥ न दिसती अन्य रहिवासी । हा अनुभव नित्य सवर्ांसी ॥12॥ अनेक दालने अध्यात्मी । प्रत्येकाची भिन्न ास्थिंती ॥ तो कोणत्या दालनी । हे कळे अनुभवानी ॥13॥ उपासना करिता एकाग्री । अनुभव येती सर्वांसी ॥ दृश्य येती डोळयापुढती । ऐकू येई कोणासी ॥14॥ सूक्ष्म देह सुटा होऊनी । सोडूनी क्षण एक देहासी ॥ जाऊनी अध्यात्म दालनी । दृश्ये पाही त्या दालनी ॥15॥ दृश्य भिन्न प्रत्येकी । त्याने तो कोणत्या दालनी ॥ हे कळे गुरूनाथासी । प्रगती साधती गुरू त्याची ॥16॥ कोणा दिसती प्रकाश काही । कोणा दिसती रंग काही ॥ कोणा दृश्ये कोणा व्यक्ती । कोणा ईश रुपे अंतरी ॥17॥ कोणा ध्वनी कानी । सुगंध येई कोणासी ॥ अनुभव भिन्न प्रत्येकासी। जैसी ज्याची ास्थिंती ॥18॥ गुरू लक्ष सर्वाभूती । गुरू सर्व देव असती ॥ गुरू गणेश गणपती । ही अनुभूती शिष्यासी ॥19॥ अज्ञान अति अध्यात्मी । दहा वर्षे लागले अर्थासी ॥ गुरूपदी हीच विनंती । मन राहू दे सदा चरणी ॥20॥ तात्या आवदे शिष्यासी । जीवित पुत्र मी एकचि ॥ गुरूकृपे तरण्यासी । पुनर्जीवन मिळाले मजसी ॥21॥ अशक्तता महिनाभरी । गेलो नंतर दर्शनासी ॥ वृत्तांत सांगितला गुरूसी । कुलदैवत शांती जरूरी ॥22॥ गुरू सांगती मजसी । श्री लक्ष्मी व्यंकटेशासी ॥ करा पंचसूक्त पवमानासी । अष्टोत्तर शत आवर्तनासी ॥23॥ सवय नसे व्यकंटेश स्तोत्राची । इतके पवमान ऐकताचि॥ कसे होतील वाटे मनी । पुढे न होईल काही ॥24॥ शरीरा विश्रांती जोवरी। शक्यता पवमान तोवरी ॥ वेळ न मिळेल काही । समाज कार्य सुरू झाल्यावरी ॥25॥ प्रेरणा गुरू शब्दांची । प्रबल इच्छा करण्यासी ॥ ब्राह्मण मिळाला पवमानासी । खात्री नव्हती टिकण्याची ॥26॥ काम येता जाईन म्हणे गावी । आश्चर्य घडले त्यातही ॥ काम येता नाकारले त्यांनी । गुरू प्रेरणा प्रबळ अदृश्यी ॥27॥ मुहूर्त सोन्याची एकादशी । गुरू मान्यता त्यासी ॥ गुरूदर्शन विजया दशमीसी । गुरू आशीर्वाद अनुष्ठानासी ॥28॥ चमत्कार त्याच रात्री । श्री लक्ष्मी व्यंकटेश मूर्ती ॥ दिसल्या समोर सुमुहूर्ती । गुरूकृपा ही खरी ॥29॥ अदृश्य सृष्टी दृश्यासी । गुरूकृपा देव दर्शनी ॥ नित्य तीन पवमानासी । सुरू केले एकादशीसी ॥30॥ गुरू असती दत्तवाडीसी । सूक्ष्म रुपे येती घरी ॥ हा अनुभव दिला त्यांनी । गुरूकृपा ही खरी ॥31॥ दर्शने सर्व देवांची । गुरुंनी घडविली अदृश्यी ॥ सर्व देवात गुरू एकचि । पटविती या तत्त्वासी ॥32॥ ते न पटले त्यावेळी । पटू लागले आज थोडे काही ॥ पूर्ण पटण्या मनी । स्पष्टीकरण हे असे आज ॥33॥ अनुष्ठान समाप्तीसी । गुरू सांगती मजसी ॥ रौप्य ध्वज देवपाटी । असे परंपरा आवदे घराणी ॥34॥ परंपरा काय तुमची । गुरूसी कळले ते सांगती । प्रथा एकादशी शुक्रवारी । मंजूरी माला व्यंकटेशासी ॥35॥ एकशे आठ पवमानासी । अकरा मेव्हण सांगतेसी ॥ पुरण नैवेद्य देवासी । पवमान केला एक शेवटी ॥36॥ ओटी भरली सुवासिनीची । खण नारळ देऊनी ॥ संन्यासी सांगता भोजनी । रात्री कीर्तन गुरूकृपा ही खरी ॥37॥ चमत्कारात देव मानती । उदो उदो त्यांचा करिती ॥ इच्छा नाही तशी । उपयोग त्यांचा न कांही ॥38॥ गुरू असती दत्तवाडीसी । लक्ष त्यांचे सर्व क्षेत्री ॥ रक्षिती ते शिष्यासी । सूक्ष्म रुपे भ्रमण सर्वा घरी ॥39॥ मला तीन मुली । आशा मिरा विजू धाकटी ॥ त्यांची माता धुण्यासी । गेली असे विहिरीवरी ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj