| अध्याय क्र. 34
|
 |
गुरु सांगती चर्ची । बाजार मांडण्याची ना जरुरी ॥ वस्तू असे जर भाग्यी । मिळेल ती कोठेही ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥चर्चा चालता दोघांची । तीर्थक्षेत्री आज स्थिती ॥ गुरूंनी सहज त्यासी । सांगितला वृत्तांत काही ॥1॥ वस्तूची इच्छा मनी । धरूनी बाह्य देखावा आजी ॥ पोथ्या फोटो मांडूनी । बाजार मांडती जनी ॥2॥ इच्छा लाभ असे मनी । तो नाही उपयोगी ॥ त्याने अध्यात्मी कशी । प्रगती सांगा तुम्ही ॥3॥ वस्तू असेल भाग्यी । मिळेल ती कोठेही ॥ गुहेतही बसले जरी। लाभ निश्चित तेथेही ॥4॥ भाग्यात नसेल जी । वस्तू न मिळे कोठेही॥ प्रयत्न करा तुम्ही किती । उपयोग न त्याचा कांही ॥5॥ एकोणीसशे अठ्ठावन साली । झोपडी विहीर नुसती॥ गेले गुरू अमरकंटकासी। चैनसुख थानवी सेवेसी ॥6॥ अमरकंटकी जाऊनी। आले ते डींडोटीसी । उतरण्या जागेसाठी । भेटले धर्मशाळा प्रमुखासी ॥7॥ न्याहाळुनी जटादाढी । वदला तो शब्दासी ॥ येतात अनेक बैरागी । मांडती बाजार समोरी ॥8॥ गर्दी होते धर्मशाळी । भोडया भाबडया लोकांची ॥ प्रयोग त्यांचे पाहूनी । नादी लागती लोक काही ॥9॥ गर्दी त्रास होतो सर्वांसी । त्यांना लागती खोल्या समोरी ॥ मिळविती बहुत वस्तूसी। तुम्हा पाहिजे कोठे खोली ॥10॥ गुरू म्हणती त्यासी । तुमचा अनुभव खरा जरी ॥ आम्हा नको समोर खोली । द्या आम्हा अगदी मागची ॥11॥ त्याने दिली मागची खोली । प्रातर्विधी स्नानानंतरी ॥ गुरू तल्लीन अनुष्ठानी । बाहेर न दिसले कधी ॥12॥ ऐसा क्रम असता धर्मशाळी । एक गृहस्थ आले खरे नामी ॥पेन्शनर होते स्थायी । विचारिती त्या मालकासी ॥13॥ सत्पुरूष येथे कोणी । आहेत गुरू चरित्र पठणी ॥ त्यांना देण्याची इच्छा मनी । दाणे गुळ फराळासी ॥14॥ त्याचे उत्तर खरेसी । उतरले होते निश्चिती ॥ बाहेर ते न दिसती । खाण्यापिण्यास्तव याचना नाही ।.15॥ तपास करू आताचि । गेले दोघे बरोबरी ॥ गुरू होते अंतरी । चिंतनी मग्न दोघेही ॥16॥ खाण्या पिण्याची । चिंता न त्यांना काही ॥ देईल हरी जरूर जरी । हा विश्वास त्यांचे मनी ॥17॥ खरेची होती वृत्ती । देती ते दान सत्पात्री ॥ दिले त्यांनी गुरुसी । गुळ दाणे फराळासी ॥18॥ त्या दिवसा पासूनी । नित्य येऊनी गुरूसी॥ देत असे तो काही । पूर्ण मुक्कामी डींडोटीसी ॥19॥ गुरू सांगती चर्ची । बाजार मांडण्याची ना जरुरी ॥ वस्तू असे जर भाग्यी । मिळेल ती कोठेही ॥20॥ तुम्ही जा एखादे गुही । तेथेही मिळेल तुम्हासी ॥ प्राणी जन्मा बरोबरी । अन्नाची सोय निश्चिती ॥21॥ ''दाने दाने पर लिखा है । खानेवाले का नाम'' ॥ म्हण नाही खोटी । अनुभव आहे पोटी ॥22॥ तैसे प्रत्येक वस्तूची । आहे स्थिती या जगी ॥ कोणा मिळे कोणती । ठरले आहे निश्चिती ॥23॥ श्री.विष्णुदास स्तोत्रासी । अध्याय करण्याची ॥ इच्छा नसता मनी । चवतीस मनी - भोवती ॥24॥ चवतीस स्फूरण आतूनी । निर्णय घेतला मनी ॥ स्तोत्र अध्यायाची । नांदी असे निश्चिती ॥25॥ आवाक्यात जे नाही। ते गुरूचे आवाकी ॥ अनुभव मागील अध्यायी । स्तोत्र त्यानंतरी ॥26॥ दुःख दैन्य गेल्यावरी । स्तोत्र पठणी गोडी ॥ हा भाव धरूनी मनी । ऐका आता स्तोत्रासी ॥27॥ स्तोत्र प्रारंभ :- ॐ श्री.गणेशाय नम: । गणेश हाच गुरू ॥ विघ्नहर्ता गुरू । मती देणार गुरु ॥28॥ कर्ता करविता गुरू। अष्ट सिध्दी गुरू ॥ सिध्दी प्रत्यय गुरू । नाम मात्र असे मी ॥29॥ शिष्या स्वप्नी विचारिसी । भक्ती लक्ष्मी की लक्ष्मीपतीची ॥ आधिव्याधी हरली त्यांची । स्वप्नी प्रत्यय प्रत्यक्षी ॥30॥ स्वप्नी जाऊनी आणसी । शिष्याला सेवेसी ॥ साधू, ज्ञानी शिष्याची । पूर्वजन्म दोषकर्मे हरसी ॥31॥ दत्तवाडी क्षेत्र निर्मिती । झाली भिन्न प्रयोगी ॥ वर्गणी यादी उत्पन्नी । केले चकीत सर्वांसी ॥32॥ कोणाचे आजार हरसी । कोणा पुत्र देसी ॥ प्रत्यय सतत शिष्यासी । अशक्य जे जगी ॥33॥ कोणा प्राणदान । कोणा आयुष्यदान ॥ अगाध त्या लीलेस । जाणण्या कोण समर्थ ॥34॥ ऐसे गुरुंचे स्तोत्रासी । वाटले आज मनी ॥ करावे ही मती । जे विष्णुदास दत्तवाडी तेल्हारी ॥35॥ अठरा सिध्दी गुरू हाती । शिष्यासी काय कमी । बुध्दी देणार तोचि । जे आकाशी ते घटी ॥36॥ मती नाही माझी । कोण जाणे शब्दी ॥ कोण रचे कवित्वही । हे अर्पण त्या चरणी ॥37॥ दोषाची नसता गणती । गुरू त्यासी स्विकारिती ॥ मन बुध्दी कर्माची । शुध्दी करती सदैव ॥38॥ कपडे धुणाऱ्यांची । वृत्ती असे गुरुची ॥ मल नाही कापडी । तो असे पूर्व कर्मी ॥39॥ तो स्वच्छ करण्यासी । तत्पर गुरू सदैवी ॥ कंटाळा ना कधी । आनंद त्यांना त्यातचि ॥40॥ ऐशा गुरु चरणी । लीन होऊनी ॥ भक्ती होऊ दे काही । सदैव वाटे शिष्यासी ॥ 41॥ दत्त परंपरा जीवनी । कष्ट उपासनेत किती । भ्रमण सतत तीर्थक्षेत्री । सार्थकता त्या सहवासी ॥42॥ पटवर्धन वंशी । माता लक्ष्मीबाई ॥ पिता दत्तात्रेय नामी । साखळीचे रहिवासी ॥43॥ कुल परंपरा ती । वेदमंत्र घरी॥ संस्कार बालपणी । जन्म ऐशा कुटूंबी ॥44॥
|