Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 43
श्रीपाद श्रीवल्लभ त्याक्षणी । येऊनी बसले औदुंबरी ॥ प्रत्यक्ष दर्शन श्रीगुरुसी । आनंदे गुरु गहिवरती ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ विशिष्ट ध्येयाने प्रेरित । एक प्रयोगात्मक जीवन ॥ गुरु योजने नुसार दैनंदिन । कार्यक्रम होती दत्तवाडीवर ॥1॥ प्रमुख हेतू त्यातील । गुरु स्पष्टता असे त्यात ॥ सदा मनुष्य जीवन। असावे ते तपोनिष्ठ ॥2॥ नको त्यात थारा काही । नैराश्य व आळसाशी ॥ ठेवूनी सातत्य वृत्ती । करावे नित्य उपासनेसी ॥3॥ सामाजिक व धार्मीक कार्यी । व्हावे आपण सहभागी ॥ परि हेतू नसावा प्रसिध्दी । प्रतिष्ठा, पैसा व सत्ता कार्यी ॥4॥ तिरस्कारु नये पर पंथासी । बुध्दिभेदाने वळवू नये कवणासी ॥ आणावया स्वपंथासी । निंद्य मानावे या प्रयत्नासी ॥5॥ असूनी सदा अनासक्त । व्यवहारी असावे चाणाक्ष ॥ अनासक्त कर्तव्य कुशलता । हीच जाणा भगवत् गीता ॥6॥ आर्थिक शुचिता सदैव । असावी साधक जीवनात ॥ ठेवण्या नित्य अनुसंधान । इष्ट देवता, इष्ट ध्येयाप्रत ॥7॥ मनास पुष्ट करावे। प्रबल इच्छा शक्तीने ॥ मन शाश्वत विचारावर ते । करावे केंद्रीत नित्य ॥8॥ नश्वर देहावरी या । मन अपुले जडवू नका ॥ श्री गुरु ऐसे तत्त्वज्ञाना । उपदेशीती शिष्यासी जाणा ॥9॥ आचार विचार करण्या शुध्द । गुरुचरित्र उपासना नित्य ॥ असूनी अगाध ज्ञान । गुरु ठेविती मौन ॥10॥ असूनी शक्ती अगाध । क्षमा करिती शिष्यास ॥ असूनी ऐश्वर्य सर्व । त्याग संपूर्ण जीवनात ॥11॥ ऐसे परस्पर विरुध्द । गुण असती गुरुजवळ ॥ केवळ आात्मिंक बळावर । निर्माण दत्तवाडी क्षेत्र ॥12॥ ''स्वयमेव मृगेन्द्रता'' जाण । पटते लोकोक्ति तेथ ॥ भारतभर हिंडता यात्रेत । दत्तवाडी प्रयोग वेगळाच ॥13॥ शांत वातावरण निर्मिती । अनुभवतो प्रत्येक यात्री ॥ अयाचक वृत्ती गुरुंची । ही पध्दत नाही कोठे ॥14॥ पैशासाठी हात पुढती । मंदिरी मंदिरी अनुभूती ॥ इथे वेगळेच आहे सर्वही । शांत प्रसन्नता निर्मिती॥15॥ गुरु सांगती शिष्यासी । मठ, मंदिर, आश्रम नाही ॥ हा एक प्रयोग जगी । त्याचे वेगळेपण म्हणुनी ॥16॥ मठ नसता दत्तवाडी । मठ कसा असावा आजी ॥ मंदिर नसता दत्तवाडी । मंदिर कसे असावे प्रयोग हाचि ॥17॥ आश्रम नसता दत्तवाडी । आश्रम ास्थिंती कळे दत्तवाडीसी॥ स्वच्छता, उपासना करुनी । वातावरण निर्मिती दत्तवाडीसी ॥18॥ देवाची जी देण्याची वृत्ती । मागणे नसे दत्तवाडीवरी ॥ उपासना उपासना उपदेशचि । गुरु देती सर्व शिष्यासी ॥19॥ जैसे चिंतन असे मनी । तैसे फल त्याचे जीवनी ॥ यासाठी शुभ चिंतावे मनी । शुभ होते आपुले जगी ॥20॥ कोणाचे अशुभ चिंतता मनी । अशुभ होते आपुलेचि ॥ जैसे चिंतन आपुले मनी । तैसेचि येते आपुले भाग्यी ॥21॥ जपून वागावे या कारणी । उगीच चावटपणा व्यर्थचि ॥ सत्पुरुष वेग कार्यासी । बरे वाईट घडते वेगी ॥22॥ उपासनेसी घातक विचारासी । करु नये उपासकाने कधी ॥ श्रीगुरुची ती अगाध शक्ती । वर्णन करण्या देई मती ॥23॥ योगात्मे अदृश्य सृष्टीमध्यी । संभाषण करिती गुरुसोबती ॥ प्रत्यय दिला एक दिनी । उठता एक वाजता रात्री ॥24॥ दिसले श्री गजानन महाराज । अदृश्यी दत्तवाडी समोरुन ॥ गुरु विचारिती गजाननास । कोठे जाता वेगेसी ॥25॥ गजानन म्हणती गुरुंसी । भक्त एक बेलखेड ग्रामी ॥ आत्महत्या करण्या विहिरीसी । गेला आहे खचित ॥26॥ त्याला जातो तारण्यासी । ऐसे संभाषण गुरु सोबती ॥ करुनी गजानन योगी । निघूनी गेले बेलखेडासी ॥27॥ प्रात:काळी आली काही । मंडळी बेलखेडची दर्शनासी ॥ गुरु विचारीती रात्रीसी । घडले कंा विशेष बेलखेडी ॥28॥ मंडळी सांगे आश्चर्यासी । उडी मारता एकानी ॥ आत्महत्ये करिता विहिरीसी । वाचविले कोणी रात्रीसी ॥29॥ कोण होती व्यक्ती ती । कळले नाही कोणासी ॥ शेगावचे गजानन योगी । गेले तारण्या भक्तासी ॥30॥ ते कळले गुरुसी । गुरु सांगती निज शिष्यासी ॥ संदर्भ लागला प्रत्यक्षचि । खात्री होते यातूनी ॥31॥ अदृश्यातील घडामोडी । सहज कळतात गुरुसी ॥ ऐशा अनेक घटनांची। अनुभूती आहे शिष्यांसी ॥32॥ साखरेत आहे गोडी । तुम्ही मान्य करण्यात नाही ॥ तुम्ही केली अमान्य जरी । साखर ती गोडच लागेल॥33॥ अनुष्ठान उत्सव जोडी । दत्तवाडीत असे प्रसिध्दी ॥ अदृश्य सृष्टी मार्गदर्शनी ॥ उत्सव सतत दत्तवाडीवरी ॥34॥ उत्सव असो नसो काही । गुरुचरित्र नित्यचि ॥ गुरूंची औदुंबरी प्रीती । प्रेरणा गुरुचरित्र औदुंबरी ॥35॥

 

Sadguru Vishnudas Maharaj