Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 17
नारळ प्रसाद शिष्यासी । देण्या निघाले दत्तमूर्तीतूनी ॥ चपलता चालण्यात अति । क्षणात घडले हे सर्व ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: ॥ श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्री गणेश गुरूनाथ । गुरूनाथ हे व्यंकटेश ॥ हा प्रत्यय शिष्यास । दिधला मागील कथेत ॥1॥ गुरू हे गुरूनाथ । अवतार हा गुरूनाथ ॥ दत्त अवतार गुरूनाथ । विष्णुरुप हे गुरूनाथ ॥2॥ विष्णू अवतार रामकृष्ण । वैशिष्टय असे जीवनात ॥ श्रेष्ठत्व असे जीवनात । हा अनुभव प्रत्येक अवतारात ॥3॥ श्रीकृष्ण विष्णू अवतार। श्रेष्ठत्व बासरी वादनात ॥ नादब्रह्म गगनात । आकर्षण लहान थोरास ॥4॥ येती गाई गोपी धावत । तलरूीन होती नादात ॥ समाधी सुख त्यात । ऐसा अनुभव सर्वास ॥5॥ गुरूनाथ दत्त अवतार । तलरूीनता नादब्रह्मात ॥ त्यातील एक अनुभव । पाहू या आज आपण ॥6॥ गुरू होते गाडेगावात । मुक्काम असे नारायण मठात ॥ रात्रीचा दुसरा प्रहर । भक्त आले मठात ॥7॥ नित्य येती भांबेरी भक्त । भजनी प्रीती अत्यंत ॥ सवर्ांनी सुरू केले भजन । निर्माण झाले नाद ब्रह्म ॥8॥ गुरूच्या पेटी हातात । गुरू म्हणती भजन ॥ जादू वाटली पेटीत । लय लागली त्यात ॥9॥ भान विसरले सर्व । पेटीतून निघती सप्तस्वर ॥ त्या नाद लहरींची मात । पसरल्या दशदिशात ॥10॥ आदळल्या भक्त कानात । भक्त उठले खळबळून ॥ वाटले काय आज मठात । जमले सर्व आपोआप ॥11॥ जैसे गाय गोपी जमत । ऐकूनी कृष्ण बासरीस॥ तैसे गुरूनाद ऐकून । गोळा झाले सर्व भक्त ॥12॥ कृष्ण तलरूीन वेणूनादात । तैसे गुरू तलरूीन गाण्यात ॥ गुरू तलरूीन दत्तरुपात । भक्त अनुभवती समाधी सुख ॥13॥ अनेक भक्त त्यात । मुग्ध जाहले ऐकून नाद ॥ आनंद त्या नादब्रह्मात । वाटे लागली समाधी सर्वास ॥14॥ ऐसे भजन किती वेळ । चालले नारायण मठात ॥ भक्त जमले बहुत । रात्र असून गावा बाहेर ॥15॥ गुरू विचारिती सर्वास । जमले कंा तुम्ही सर्व ॥ काही काम कां तुम्हास । अपरात्री कां आले येथ ॥16॥ भजन ऐकण्या आलो म्हणत । विशेषत्व वाटले आज ॥ उत्कृष्ट गीत नाद आज । म्हणूनी आलो म्हणती सर्व ॥17॥ नादब्रह्म निर्मिण्यास । शक्ती असे गुरू स्वरात ॥ अद्भूत शक्तिप्रत्यय । दिला नारायण मठात ॥18॥ भजनी प्रीती दत्तात्रेयास । श्री गुरूचरित्री असे वर्णन ॥ करिता दत्त गुरुंचे गायन । त्या घरी गुरू आस्तिंत्व ॥19॥ प्रत्यक्ष गुरूनाथ श्रीदत्त । नाद लहरी प्रचंड ॥ आदळता शरीरावर । रोमांच येती अंगावर ॥20॥ कीर्तनी ऐसा अनुभव । येतो प्रत्येक भक्तास ॥ भाव पाहिजे तेथ ॥ अनुभव त्या भक्तास ॥21॥ एकदा मी सांगता केली । श्री व्यंकटेश स्तोत्र मंडलाची ॥ झाली सुरू श्री गुरूचरित्राची । अखंड पारायणे गुरूमठात ॥22॥ नित्यक्रम भुयारी । पठण एक व्यंकटेश स्तोत्री ॥ मलिनता करण्या कमी । गुरूंची ही नामी युक्ती ॥23॥ पठण करता स्तोत्रासी । श्री दत्तमूर्ती समोरी ॥ श्री गुरू दिसले पद्मासनी । श्री दत्तमूर्तीचे ठिकाणी ॥24॥ गुरू हे दत्तमूर्ती । दत्तमूर्ती व गुरूनाथ एकचि ॥ भेद न दोघांमध्यी । ऐसा अनुभव दिला मजसी ॥25॥ अस्पष्ट होती मूर्ती । कारण मलिनता अंगी ॥ मलिनता होण्या कमी । संस्कार करिती मनावरी ॥26॥ देव पितृ ॠषी । तीन ॠण प्रत्येकावरी ॥ कुळाचार देवॠणासी । उपासना ॠषी ॠणासी ॥27॥ पितृॠण तृप्तीसी । पक्ष सांवत्सरीक श्राध्दाची ॥ योजना असे वैदिकांची । जल भोजन पितरासी ॥28॥ त्यांचे भ्रमण अंतरिक्षी । वासना असे कांही ॥ तृप्त होती श्राध्दपक्षी । सुटका त्यांची त्यातूनी ॥29॥ गुरू मार्गदर्शन मजसी । श्राध्द पक्ष करा म्हणती ॥ दोन वर्षे करितां श्राध्दासी । शंका आली मनी ॥30॥ गुरूसी विचारिले मठी । श्राध्द पक्ष कर्मे आजी ॥ करितो यथाशक्ती । पितृॠण असे किती ॥31॥ ते पावले कां आजवरी । स्वप्नी उत्तर त्याच दिनी ॥ दोन पुरूष व्यक्ती । स्त्री एक आली जेवण्यासी ॥32॥ भव्य चेहरे त्यांचे । जेवण संपता त्यांचे ॥ पात्री काही नव्हते । विचारिले मी स्वप्नी ॥33॥ पाहिजे कां तुम्हा काही । समाधान असे यावरी ॥ तृप्तता असे भोजनी । दोघेही वदले पत्नीसी ॥34॥ श्राध्द कर्मे पितर तृप्ती । प्रश्न ऐसा केला गुरूसी ॥ देऊनिया रात्री स्वप्नासी । उत्तर श्राध्द कर्मे तृप्ती ॥35॥ गुरूकृपे पितृ तृप्ती । आनंद वाटला मनी ॥ मोकळा केला गुरूनी । मोक्ष मार्ग जीवनी ॥36॥ मोक्ष मिळण्या जीवनी । तीव्र इच्छा झाली मनी ॥ गुरू मंत्र घ्यावा आपणही । ज्याची नितांत जरूरी ॥37॥ तीव्र इच्छा होता मनी । गुरू आले स्वप्नी रात्री ॥ विनंती केली गुरूसी । मंत्र द्या मला आजी ॥38॥ गुरू म्हणती स्वप्नी । मंत्र दिला असे तुजसी ॥ व्यंकटेश स्तोत्र मंत्रासी । स्पष्ट उत्तर त्या स्वप्नी ॥39॥ व्यंकटेश विष्णू अवतारी । कुलदैवत असे घरी ॥ व्यंकटेश स्तोत्रावरी प्रीती । विष्णुरुप दर्शन देती ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj