Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७


अध्याय क्र. 27
विष्णुदास विष्णुदास स्मरणी । पुत्र झाला आनंदी ॥ कावीळ गेला दूरी । हा अनुभव या अध्यायी ॥


श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ देवाची प्रचंड शक्ती । त्या सर्व शक्तीचेही ॥ काम आहे कां प्रत्येकासी । उत्तर गुरुचे त्यासी ॥1॥ येवढया शक्तीचे कार्यासी । जरुर नसे मानवासी ॥ लागे त्याचे कार्यासी । कितीतरी कमी शक्ती ॥2॥ पंप तीन अश्वशक्ती । असे दत्तवाडी विहिरीवरी ॥ पाणी येई त्यातूनी । धो धो करीत धार मोठी ॥3॥ पाणी पाहिजे जर लोटाभरी । पूर्ण धारेची ना जरुरी ॥ धारेच्या एका कोपऱ्याशी । भरते तुमची कळशी ॥4॥ कळशी धरता मध्यभागी । धार शक्तीने कळशी खाली ॥ तोल जातो कधी । शरीर कळशी दोन्ही कलंडती ॥5॥ देवाच्या अति सूक्ष्म शक्ती । कार्य होती कितीतरी ॥ आपल्या अपेक्षा पूर्तीसी । जरुर ना पूर्ण शक्तीची ॥6॥ देव कशाला येई । लहान सहान कार्यासी ॥ तो न येताचि । करितो कित्येक भक्त कार्यासी ॥7॥ प्रत्यक्ष येण्या देवाची । निकड ज्या भक्तामनी ॥ त्या भक्ता दर्शन देती । इतरांची करिती इच्छापूर्ती ॥8॥ धु्रव प्रल्हादासी । दिले प्रत्यक्ष दर्शनासी॥ अनेक भक्तांची देवांनी । केली कामे कितीतरी ॥9॥ इच्छा शक्ती संबंध मनी । मन ही प्रचंड शक्ती ॥ इच्छा मात्रे सृष्टी निर्मिती । इच्छा मात्रे घडे सर्वही ॥10॥ इच्छा असे अंतर्मनी । मन विचार करण्यासी ॥ उपासनाचि कार्य करी । सूक्ष्म कार्य ते जगी ॥11॥ वीज चमकते आकाशी। गडगडाट होतो त्याच क्षणी ॥ प्रकाश दिसतो आधी । गडगडाट त्या नंतरी ॥12॥ प्रकाश गडगडाटा आधी । प्रकाश वेग जास्त ध्वनीहूनी ॥ सूक्ष्म मन वेग अति । बुध्दी वेग असे कमी ॥13॥ पुढील घटना नोंदी । घेऊ शकती सूक्ष्म मनी ॥ आगामी घटना ग्रहणी । सामर्थ्य असे सूक्ष्म मनी ॥14॥ भूवरी लोकवस्ती । सूक्ष्म कवच भोवती ॥ त्यात असे शक्ती । उपासने वाढे सूक्ष्म शक्ती ॥15॥ सर्व मन नसे कार्यी । जप उपासना वेळी ॥ मन गुंतले विकल्पी । जपात ते फार कमी ॥16॥ मनाचे होती भाग काही । त्यातील थोडे असे जपी ॥ थोडे नसते जर जपी । बंद पडता जप तोही ॥17॥ उपासने विकल्पाचे मनी । प्रमाण होते कमी ॥ जप प्रमाण वाढूनी । प्रगती साधे त्यातूनी ॥18॥ उपासना करा काही । शक्ती वाढते सहजचि ॥ अपेक्षा वाढता काही । संपे ती त्या पूर्तीसाठी ॥19॥ देवांना आनंद यातचि । अपेक्षा पूर्ती भक्ताची ॥ ॠणमुक्त होतो देवही । अपेक्षा रहिताची करी चाकरी ॥20॥ कळते शिष्या काही । कृती न घडे तशी ॥ गुरू दत्त अवतारी । कळते पण वळत नाही ॥21॥ गुरू शक्ती किती । हे कळते अनुभवानी ॥ स्वप्न पाडण्या शक्ती । हा अनुभव शिष्यासी ॥22॥ मन विचार कळती । हा अनुभव अनेकासी॥ घरचे दृष्य सांगती । हा अनुभव ज्याचा त्यासी ॥23॥ रुपे बदलूनी गुरूनी । शिष्या - संकटी धावती ॥ हा अनुभव या पूर्वी । कळेल आणखी पुढती ॥24॥ गुरू संकल्प शक्ती । प्रभावी असे किती ॥ दत्तवाडी ही नित्यचि । असे प्रत्यक्ष अनुभूती ॥25॥ असे राम अवतारी ॥ कथा सेतू बांधण्याची ॥ राम नामे तरती । दगड समुद्र जली ॥26॥ कथा या अध्यायी । स्मरता गुरू नामी ॥ विष्णुदास या अक्षरी । सुखरुप पुत्र प्राप्ती ॥27॥ हे सामर्थ्य गुरू स्मरणी । परंपरा थोर त्यांची ॥ उपासना परंपरा कोणती । विचारिता सांगती त्यासी ॥28॥ श्री वासुदेवानंद सरस्वती। टेंबे स्वामी प्रसिध्दी ॥ त्यांचे शिष्य काशी क्षेत्री । मोघे आडनावी संन्यासी ॥29॥ आश्रम त्यांचा दुर्गाघाटी । गंगा किनारी वसती ॥ त्यांचा उपदेश गुरूंनी । घेतला एकविसावे वर्षी ॥30॥ बीज मंत्र घेऊनी । जप करिती अंत:करणी ॥ दोन भाग त्यामध्यी । कोणी करिती अर्थ समजूनी ॥31॥ गुरू सांगती त्यासी । बुध्दीने आकलन करूनी ॥ जे करिती जप - पाठासी । याला म्हणती अर्थ समजूनी ॥32॥ दुसरा अर्थ जपातूनी। प्रेरणे कळे भक्तासी ॥ अर्थ प्रत्यक्ष अनुभूती । श्रेष्ठ प्रेरणा पध्दती ॥33॥ ऐसे उत्तर नागपूरी । सूर्य पुत्र प्रकाशन भेटी ॥ विजय देशमुख घरी । श्रध्दा ज्यांची गुरूवरी ॥34॥ तेल्हारा गाडेगांव रहिवासी । शेती घर गाडेगांवी ॥ पिता यशवंत नामी । दादा पाटील ख्याती ॥35॥ गुरू मुभ्क्काम गाडेगांवी । विजयचा संबंध बालपणी ॥ श्रध्दा ती त्यावेळी । वाढली ती नंतरी ॥36॥ रिझर्व बँक नोकरी । पदवीधर झाल्यावरी॥ प्रेरणा प्रवचनासी । शिव कथाकार तया म्हणती ॥37॥ सूर्य पुत्र ग्रंथी । प्रेरणा कर्ण चरित्रासी ॥ गुरू प्रेरणा सर्व ती । ही श्रध्दा त्यांचे मनी ॥38॥ परमोच्च आनंद क्षणाची । अनुभूती सूर्यपुत्र लिखाणी ॥ आग्रह गुरूंना विशेषी । ग्रंथ प्रकाशनासी ॥39॥ ग्रंथ प्रकाशन भाषणी । गुरू सांगती सर्वासी ॥ सतत ध्यास मनातूनी । निर्मिती झाली सूर्यपुत्र ग्रंथाची ॥40॥

 

Sadguru Vishnudas Maharaj