| अध्याय क्र. 3
|
 |
सुखी ठेवीन पतीसी । काढा मला वरी ॥ ऐसे शब्द येता कानी । आनंद झाला गुरु मनी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ साात्त्विंताचि प्रेमळता । साात्त्विंताचि सज्जनता ॥ साात्त्विंताचि विनयता । साात्त्विंताचि परोपकरिता ॥1॥ फळ बोर मधुर अति । अळी त्यासी ग्रासी ॥ खोबरे मधुर जरी । कवचे सुरक्षितता त्याची ॥2॥ सीता पत्नी रामाची । साात्त्विं भाव अंतरी ॥ याचक येता भिक्षेसी । घालण्या येई भिक्षेसी ॥3॥ याचक नाकारी भिक्षेसी। लक्ष्मण रेषे अंतरी ॥ साात्त्विं भाव एकचि । विन्मुख कैसे यासी ॥4॥ लक्ष्मण रेषा ओलांडूनी । भिक्षा घाली याचकासी ॥ रावण तो याचक वेषी । उचलूनी नेई सीतेसी ॥5॥ साात्त्विंता नुसती । न टिके बाजारी ॥ शिक्षा देती त्यासी । प्राणदंड रावणासी ॥6॥ साात्त्विं वृत्ती गुणी। कवचाची असे जरुरी ॥ साात्त्विंता टिके जगी । ऐसे गुण गुरू अंगी ॥7॥ कार्य करण्या अवतार जगी । गुण पूर्ण त्या रक्ती ॥ चुणूक त्या गुणांची। दिसे क्षणोक्षणी ॥8॥ ग्राम एक ईचलकरंजी । पाठशाळा त्या ग्रामी ॥ वेदपठण शिकती । कितीतरी विद्यार्थी ॥9॥ आज न मिळे एकही । विद्यार्थी वेदपठणासी ॥ बंद झाल्या कितीतरी । वेदशाळा त्या अभावी ॥10॥ त्या काळी आवडी । होती कांहीं ब्राह्मणासी ॥ आवडीने नोंदविंती। नांवे त्या पाठशाळी ॥11॥ वेदविद्या जगी । मुख्य असे ब्राह्मणासी ॥ ब्रह्म तेज अंगी । गुरू पीठ भूषविती ॥12॥ गुरू होते त्यामध्यी । आनंद वाटे वेदपठणी ॥ पटवर्धन म्हणूनी । ओळखती गुरूसी ॥13॥ सर्वांची होती मैत्री । परोपकारी वृत्ती ॥ मित्र एक श्रीपाद नामी । दुकानी पुस्तक विकी ॥14॥ दुकानी बसती कधी । मैत्री त्यांची चांगली ॥ हे सर्वा ठाऊकी । श्रीपाद गुरू मैत्री ॥15॥ ईचलकरंजी ग्रामी । संस्थानिकांची राजधानी ॥ जो करी कारकूनी । संस्थानिक दरबारी ॥16॥ मुलगा त्याचा विद्यार्थी । करी पठण वेदशाळी ॥ पटवर्धनाची मैत्री। होती त्याची चांगली ॥17॥ तो करी विनंती । पटवर्धन नामे गुरूसी ॥ तुझी आहे ओळखी । श्रीपाद दुकानदारासी ॥18॥ मला आहे जरुरी । श्री गुरूचरित्र पोथीची ॥ उधार दे मजसी । श्रीपादाच्या दुकानातूनी ॥19॥ गुरूची परोपकारी वृत्ती । पोथी देती श्रीपाद दुकानी ॥ विचार होते मनी । माझे कोण काय करी ॥20॥ अहंकार वृत्ती मनी । त्याने वर्तन उध्दटी ॥ विसरती विश्वकर्त्यासी । वागती तेथे तैसेचि ॥21॥ ज्याने घातले जन्मासी । त्या समोर नम्रताचि ॥ करी कल्याण जगी । हा नियम सर्व युगी ॥22॥ गांठ कोणाशी विसरला मनी । बोले चार चौघामध्यी॥ श्री गुरूचरित्र पोथी । दिली पटवर्धनानी ॥23॥ साात्त्विं वृत्ती पाहूनी । बोले अहंकारानी ॥ मी नाही घेतली । पोथी श्रीपाद दुकानातूनी ॥24॥ देणार नाही एक पैसाही । किंमत पटवर्धनासी ॥ गुरू होते जवळी । ऐकले सर्व कानी ॥25॥ श्रीपाद म्हणती पटवर्धनासी । ऐकले कां त्याचे वचनासी ॥ गुरू उत्तर श्रीपादासी । पैसे देण्याची नाही मती ॥26॥ किंमत वसुली नाही कैसी । वसुली आपुले हाती ॥ करु आपण वसुली । देऊ शिक्षा त्यासी ॥27॥ गुरू धिप्पाड शरीरी । मनगटी भीमाची शक्ती ॥ परमेश्वरी शक्ती मनी । येऱ्या गबाळयाची काय गती ॥28॥ एक पूर्ण आठवडयासी । जाऊ दिले त्यांनी ॥ विचार मित्रा मनी । पटवर्धन साात्त्विं वृत्ती ॥29॥ मागण्याची नाही वृत्ती । अडीच रुपये किंमतीसी॥ गुरू आले एक दिनी । श्रीपाद पुस्तक दुकानासी ॥30॥ साात्त्विं वृत्तीचा जगी । फायदा घेण्याची वृत्ती ॥ कडकपणा मनी । दाखविण्याची जरुरी ॥31॥ गुरू म्हणती श्रीपादासी । आज करू वसुली ॥ जागा करी मोकळी । आवर तू पुस्तकासी ॥32॥ संसार पसारा जगी । आवरण्या गुरू सांगती ॥ मिळण्या जगी मुक्ती । ऐसे कार्य या जन्मी ॥33॥ पुस्तक पसारा दुकानी । जागा करिती मोकळी ॥ श्रीपाद व्यवहारी । पसारा आवरी दुकानी ॥34॥ वेद शाळा सुटतां क्षणी । घरी जाण्या रस्ता तोचि ॥ मित्र दिसतां समोरी । गुरू बोलाविती त्यासी ॥35॥ इकडे ये म्हणताचि । तो आला दुकानी ॥ येतां दुकानी अंतरी । आला तो गुरूजवळी ॥36॥ तो येता जवळी । गुरू पकडती हातासी ॥ म्हणती गुरू त्यासी । पैसे दे मज आजचि ॥37॥ गुरू चरित्र पोथी । दिली या दुकानातूनी ॥ किंमत त्याची थोडी । फक्त अडीच रुपये इतकी ॥38॥ किंमत देता क्षणी । तयारी हात सोडण्यासी ॥ किंमत न देता पुरी । हात न सुटे आजी ॥39॥ ऐसे ऐकता कानी । घाबरला तो मनी ॥ पाचची वेळां ती । सुट्टी झाली कचेरीसी ॥40॥ रस्ता एकचि घरासी । जमती सर्व दुकानी ॥ म्हणती पटवर्धनासी । ऐसे करु नका तुम्ही ॥41
|