Sadguru Vishnudas Maharaj
मुख्य पृष्ट प्रस्तावना अभिप्राय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य आरती चित्र दालन चित्र फिती संपर्क
श्री रामचंद्र सरस्वती स्वामी महाराज (श्री दत्तगुरु कुळकर्णी) अकोला ह्यांचा

अभिप्राय


श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री विष्णूदास महाराजांचे चरणी विनम्र भावाने साष्टांग दंडवत ।
''श्री विष्णूदास महाराज महात्म्य'' हा ग्रंथ त्यांच्याच प्रेरणेने व दृष्टांत देऊन श्री. बाळकृष्ण गोविंद आवदे ह्या, कृपांकित अनुग्रहीत भक्त, शिष्याकडून लिहून पूर्ण करुन घेतला त्याचा उपयोग त्यांच्या अनुग्रहीतांना ज्या प्रमाणे प्रेरणादायी ठरला तसाच आध्यात्मामध्ये श्रध्दा बाळगणाऱ्या साधकांनाही मार्गदर्शक ठरत आहे. महाराजांचा अवतार 1901 साली प्रगट झाला. यथावकाश सर्व भारतभर तिर्थ यात्रा व साधना करित 52 वर्ष भ्रमण करुन व सत् शिष्यांना मार्गदर्शन करीत महाराज विदर्भात तेल्हारा गावी ''दत्तवाडी'' ह्या स्थळी शिष्योध्दारासाठी थांबले व त्यांच्या संपर्कात आलेल्या अज्ञानी जिवांना मार्गदर्शन करीत 8 जून 1990 शुक्रवारी अवतार कार्य पूर्ण करुन देह ठेवला. ह्या अवतार कार्यकाळात ज्या ज्या भक्तांना शिष्यांना महाराजांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली, त्यांची माहीती ह्या ग्रंथात दिलेली आहे. व त्याच्या वाचनाने मानवाचे कल्याण होणार आहे. ह्या ग्रंथरुपाने महाराजांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अशा ह्या पवित्र व उद्बोधक ग्रंथाची अल्पावधित दुसरी आवृत्ती काढण्याची वेळ आली यावरुन त्या ग्रंथाची महती लक्षात येते. अशा ह्या प्रासादिक ग्रंथाचे वाचनाचे वेळी श्री महाराजांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहाणार नाही. श्री बाळकृष्णराव आवदे यांचे कडून ह्या प्रासादिक ग्रंथाच्या वारंवार आवृत्या काढल्या जावोत ही सद्ईच्छा ।

''दत्तकृपा'' उमरी अकोला दत्तसेवक
रामचंद्र नारायण कुळकर्णी
Sadguru Vishnudas Maharaj